मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पुढचं पाऊल ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ पुढचं पाऊल ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

“दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त ज्या आमदार-खासदारांना शिक्षा झाली असेल,  त्यांचं विधानसभा वा संसदेतील सदस्यत्व आपोआप रद्द होईल.”  सुप्रीम कोर्टाने जाहीर केले

“राजकारणातील अपराध्यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हे चांगले पाऊल आहे.” एक कार्यकर्ता दुसर्‍यायाला म्हणाला.

“हा निर्णय राजकीय पक्षांनी मानला तर ना! उमेदवारांना तिकीट देण्याची वेळ आली की ते म्हणणार, जिंकणार्‍या उमेदवारालाच तिकीट देण्याचा विचार केला जाईल.”

“हां! हेही खरं आहे.”

“असं कळतं, कोणत्याच गोष्टीबाबत एकमत न होणारे सर्व राजकीय एकत्र येऊन त्यांनी  बैठक घेऊन निर्णय घेतलाय की याच सत्रात सरकार सुप्रीम कोर्टाचा आदेश निष्प्रभ बनवण्यासाठी संशोधन विधेयक मांडणार आहे. त्या विधेयकाचं सर्वच राजकीय पक्षांनी समर्थन करावं. राजकीय पक्ष गुन्हेगारांच्या पकडीत आहे आणि संसद राजकीय पक्षांच्या. त्यामुळे संशोधन विधेयक पारीत होणारच!”

“तर मग संसदेच्या पुढल्या सत्रात संसद आणि विधानसभेत अपराध्यांसठी काही सीटचं आरक्षण असावं, असंही विधेयक मांडलं जाईल.” दोघांचं बोलणं ऐकणारा सामान्य माणूस म्हणाला.

 

मूळ कथा – अगला कदम        मूळ लेखक – श्री अतुल मोहन प्रसाद

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रिंइन्व्हेंट ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ जीवनरंग ☆ रिंइन्व्हेंट ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

 

आज रविवार… म्हणून सहजच विद्याला सकाळ सकाळी फोन केला.

“काय विद्या काय चाललंय?”

“काही नाही गं !नेहमीचच जगण्यासाठीची धडपड …..

तिच्या या उत्तराने मी सटपटले.

” का ग ,काय झालं ?बरं नाही का?”

” मला काय धाड झाली.” पुन्हा तसाच सूर विद्याचा….

“गडबडीत आहेस का? नंतर फोन करते.”

तिचा मूड खराब आहे हे लक्षात आलं.

“नाही गडबड कसली? पण जिवाला शांतपणा म्हणून नाही बघ! सकाळी उठल्यापासून…….

“नुसती जगण्यासाठी धडपड असंच ना ?” मी तिला टोकले.

“नाहीतर काय अगं !”

पण झालं तरी काय सांगशील…..

“अगं अगदी रेसचा घोडा झाले बघ !!थांबायचं कुठं हे मला समजलं पण उपयोग काय त्याचा? लगाम ज्याच्या हाती त्याला तर समजायला हवं ना ?”

म्हणजे कामानं थकली आहेस म्हण….

“मला वाटलंच तुला असच वाटलं असणार!!”

सोड ना आता ती बँकेची नोकरी…व्हीआरएस घे . काय प्रॉब्लेम आहे ?

“तेच तर मला करायचं नाहीये ना”

दोन्हीकडून बोलतेस बाई! मनात तरी काय आहे तुझ्या? तुझा प्रॉब्लेम सोडवायचा तरी कसा?

“मला रिंइन्व्हेंट व्हायचयं ”

मी आ वासला .

“अगं खरंच फ्रस्ट्रेशन आलयं. इतकी वर्ष काम करते मी बँकेत .कधी म्हणून मला कंटाळा आला नाही ….अगदी आवडीचं काम आहे ते माझं. ना बॉसची कटकट न सहकाऱ्यांची पण आताशा नकोच वाटायला लागलयं सगळं .कधी एकदा आठवडा संपतो असं वाटतं आणि रविवारी सगळा राग घरातल्यावर निघतो ”

मला तरी अजून तुझा विषय समजलेला नाही. बोलून मोकळी हो बरं आणि री इन्व्हेंट म्हणजे काय हे ही सांग. “अगं काळाशी मिळतंजुळतं न घेणारी माणसे कालबाह्य होतात स्वतः ला री इन्व्हेंट न करणारी माणसे स्पर्धेतून बाद होतात”

अच्छा म्हणजे कामाचं प्रेशर आहे तर …मी अजून कोड्यातच !!

“तसं म्हण हवं तर!” असं म्हणून ती बोलू लागली.

” काय झालंय आताशा कोर बँकिंग सुरू झाले आहे. सगळं काही डिजिटल कॉम्प्युटराईजड!!… पेनलेस आणि पेपरलेस असं कामाचं स्वरूप आहे. इतके दिवस आम्ही जे मॅन्युअली करत होतो ते सगळं आता कॉम्प्युटर वर करावे लागते आम्हाला ते जमत नाही. बँकेने कॉम्प्युटर हाताळणारी प्रशिक्षित टीम अपॉईंट केली आहे आम्हा प्रत्येकाच्या मागे त्यातील एक कॅंडिडेट असतो. दिवसभर त्यांची मदत घेऊन आम्हाला काम करावे लागते .”

मग तुला प्रॉब्लेम काय आहे ?नवीन पिढीला महत्व दिलं म्हणून इतकी चिडली आहेस का ?

“जखमेवर मीठ चोळलसं माझ्या! तसं नाही गं, स्वतःबद्दल आम्ही मंडळी साशंक झालो आहोत. आम्हाला हे जमेल का? आकलन होईल का ?या मुलां इतका स्पीड येईल का? कस्टमर समोर सुद्धा बऱ्याच वेळेला की बोर्ड सहज हाताळता येत नसल्याने अपमान होतो .

बालवाडीत असल्यासारखं वाटतं. फरक इतकाच की त्यावेळी आम्ही निरागस होतो त्यामुळे अपमान हा शब्द आमच्या शब्दकोशात आलेला नव्हता .पण आताशा ‘इगो ”अपमान ‘असे शब्द आमच्या शरीराला चिकटलेले आहेत .एकदा वाटतं बस झालं व्हीआरएस घ्यावी पण मन हार मानायला तयार नाही .तुला काय वाटतं ?”विद्यानं मला बोलायला वाट करून दिली .

‘ विद्या मी तुला एक उदाहरण सांगते. बघ पटतंय का ते हरिणाला ठाऊक असतं की अत्यंत वेगवान अशा सिंहा पेक्षा जोरात पळाव लागेल नाहीतर आपण शिकार झालोच म्हणून समजा.त्याच प्रमाणे सिंहालाही ठाऊक असते की आपल्या पेक्षा जोरात पळणाऱ्या हरणाला गाठायचं असेल तर वेग वाढवायला हवा नाहीतर आपला उपवास ठरलेला! तुला वाटणारी ही रेस ही स्पर्धा म्हणजे जीवनाचा अपरिहार्य अविभाज्य असा भाग आहे. यथाशक्ती प्रयत्न करत राहणं हेच आपल्या हातात आहे. तुझ्या वयात एक्सेप्टन्स असणं जरुरी आहे .

मन हार मानायला तयार नाही हे तुझं वाक्य सकारात्मक आहे….. मनाला ऊर्जा देणारे औषध आपल्या शरीरात आहे हे ध्यानात असू दे.

“थोडक्यात काय बँकेच्या दारा बाहेर अपमान अहंकार सोडून आत प्रवेश करते आणि स्वतःला युवापिढीच्या मदतीने रिंइन्व्हेंट करते. इतकं सोपं आहे ते”.

माझ्या एका सहज केलेल्या फोन मुळे विद्याचे चित्त शांत झालं याचं मला आत्यंतिक सुख वाटलं.

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

jvilasjoshi@yahoo.co.in

9822553857

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ संदेश (भावानुवाद) ☆ सुश्री माया महाजन

श्रीमती माया सुरेश महाजन

☆ जीवनरंग ☆ संदेश ☆ श्रीमती माया सुरेश महाजन 

मूक-बधिर असलेल्या त्या आकर्षक तरुणीने स्वत:चे बुटिक उघडले होते. ज्यात रेडिमेड कपडे, सोफा कव्हर्स, चादरी, टॉवेल्स वगैरे बरोबरच महिलांच्या प्रसाधनाच्याही वस्तु ठेवल्या होत्या. तिची छोटी बहीण, जी मेडिकल प्रवेशाची तयारी करत होती, नेहमी आपल्या मैत्रिणीबरोबर रमा बरोबर, बुटिकमध्ये यायची तिची मैत्रीण आली की काही न काही वस्तु खरेदी करायचीच गप्पा मारता-मारता एकदा तिने सांगितले की तिला फॅशन डिझायनर बनायची इच्छा आहे, पण आई-वडिलांची इच्छा तिला डॉक्टर बनवायची आहे. परीक्षा झाल्यावर असे समजले की रमाचे पेपर्स काही चांगले नाही गेले. तिला अंदाज आला होता की तिला मेडिकलला प्रवेश मिळणे अशक्यच आहे. दोनच दिवसांनंतर तिने फॅनला लटकून आत्महत्या केली.

मूक-बधिर तरुणीला फारच धक्का बसला. तिने आपल्या डायरीत लिहिले, ‘निसर्गाने ज्यांना स्वस्थ, सुंदर आणि पूर्ण शरीर दिले आहे, अशी माणसेदेखील लहान-मोठ्या अपयशांना घाबरून इतके कुंठित, अवसान घातकी, तणावग्रस्त होऊन जातात की आपली जीवन यात्राच संपवून टाकतात. परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्यच त्यांच्यात नसते. याउलट आमच्यासारखे विकलांग मात्र कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार असतात, कदाचित जीवन-संघर्षाचा धडा आपल्या अपंगत्वामुळे ते लहानपणापासून शिकत असतात. कोणाचाही जरासा स्नेह, सहयोग आणि प्रोत्साहन मिळताच आम्ही स्वत:ला खूप सुखी मानून घेतो तुम्ही कधी ऐकले आहे का कोण्या विकलांग व्यक्तिने जीवनात निराश होऊन, तणावग्रस्त किंवा मतिकुंठित होऊन आत्महत्या केली?’

तिने डायरीत ते पान फाडले आणि डिंकाने आपल्या बुटिकाच्या प्रवेशद्वारावर चिकटवून टाकले.

 

मूळ हिंदी कथा – लड़का-लड़की – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

मो.- ९३२५२६१०७९

अनुवाद – सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गांधी ना येऊ दे ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ गांधींना येऊ दे ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

`वर्मा सर,  आपण या कार्यालयात सगळ्यात ईमानदार ऑफीसर म्हणून सुप्रसिद्ध आहात. म्हणूनच आपण आपल्या केबीनमध्ये गांधिजींच्या दोन तसबिरी लावल्या आहेत का?  एक मागे आणि एक पुढे?  वर्मांच्या हाताखाली काम करणारे शर्मा आपल्या वरिष्ठांना विचारत होते.

`ते अशासाठी शर्मा,  माझ्यासमोर बसलेल्या अपरिचिताने माझ्यामागे लावलेला गांधीजींचा फोटो बघून खोटे बलू नये आणि मी जेव्हा खोटे बोलेन, तेव्हा निश्चिंत असेन,  की मला खोटं बोलताना गांधीजी बघत नाही आहेत. ‘आता काय सांगायचं,  दहात आठ वेळा तरी मला खोटं बोलावं लागतं’  वर्मांच्या मनात आलं,  पण ते बोलले नाहीत.

`पण सर, गांधीजींचा फोटो तर आपल्या पुढेही लावलेला आहे. त्याचं काय?’

`त्याचं काय आहे,  मी. शर्मा, तुम्ही बघितलं असेल, की मी शिपायाला वारंवार बोलावून फोटो स्वच्छ पुसून आणायला सांगतो.’

`होय! बर्‍याचवेळा… म्हणूनच आपल्या समोरील फोटावर कधी धूळ दिसत नाही. पण मागचा फोटो मात्र धुळीनं भरलेला आहे.’

`त्याचं असं आहे शर्मा,  जेव्हा मला खोटं बोलण्याची वेळ येते,  तेव्हा, त्यापूर्वी मी शिपायाला बोलवून फोटो स्वच्छ पुसून आणायला सांगतो. शिपाई तसंही कुठलंही काम दोन तासांच्या आधी करतच नाही. भिंतीवरून फोटो हटवला जाताच,  मी दोन-तीन फ्रॉड ठेके निपटून टाकतो.

‘वा:! काय बोललात! आता यावर चहा झालाच पाहिजे.’

`जरा थांबा. गांधीजी येऊ देत. तसंही कुठल्याही सरकारी कार्यालयात चहा पिण्याइतकं  खरं काम दुसरं कोणतं होत असेल?’  आणि दोघेही हास्य-विनोदात बुडून गेले.

मूळ हिंदी कथा – गांधी को आने दो         मूळ लेखिका- मृदुला श्रीवास्तव

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रेमाचा रंग ☆ डाॅ. मेधा फणसळकर

डाॅ. मेधा फणसळकर

☆ जीवनरंग ☆ प्रेमाचा रंग ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆ 

आई, मी तुझीच मुलगी ना?” रियाच्या या प्रश्नाने निशा दचकली. तिने झटकन रियाला जवळ घेतले व विचारले,“का ग बेटा? असे का विचारतेस? तू तर माझे लाडके पिल्लू आहेस.” “शेजारची रिमाकाकू म्हणते की तू आईची खरी मुलगी नाहीस. तुझी आई बघ किती गोरी आहे आणि तू बघ किती काळी ते!” चिमुकल्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत निशाने रिमाला अधिकच जवळ ओढून घेतले. वास्तविक रियाला तिने अनाथाश्रमातून दत्तक घेतले होते आणि ती जरा मोठी झाली की तिला सर्व सांगणारच होती. पण शेजारच्या रिमाने त्या आधीच त्या बालमनाला घायाळ केले होते. तिला शांतपणे थोपटत निशा म्हणाली,“ बाळा, आपला रंग आपल्या हातात थोडाच असतो?आणि तुला आठवते?  परवा तुला पायाला ठेच लागली आणि रक्त आले होते. तसेच आज भाजी चिरताना माझे बोट कापले. तेव्हा रक्त आले. आपल्या दोघींच्या रक्ताचा रंग लालच होता किनई? मग तू माझी मुलगी कशी नाहीस?” त्या अजाण बालमनाला ते लगेच पटले आणि तिने आईला घट्ट मिठी मारली . निशा मनात म्हणाली,“ आमच्या बाह्यरंगात फरक असेल, पण माझ्या या पिल्लाच्या आणि माझ्या नात्यातील प्रेमाचा रंग नेहमी गहिराच असेल.”

 

©  डाॅ. मेधा फणसळकर

9423019961

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ || मानस कन्या || ☆ सौ. नीला देवल

सौ. नीला देवल

शिक्षा – एम ए, बी एड

अनेक प्रसिध्द मासिकातून बक्षिस पात्र कथा प्रसिध्द झल्या आहेत.

‘परीसस्पर्श ‘ हा कथा संग्रह प्रकाशित.

☆ जीवनरंग ☆ || मानस कन्या || ☆ सौ. नीला देवल ☆

आज सरलाचे सुखदाच्या मानस कन्येचे लग्न लावून, तिची पाठवणी करून शांत तृप्त समाधानाने सुखदा घरी परतली पण एकटेपणाच्या जाणिवेने; सरला शिवाय हे घर, या विचारानेच सारे मोठ घर तिला खायला उठल.

दोन वर्षांपूर्वी दुपारी अखंड कर्कश्श वाजणाऱ्या बेलने  सुखदाची वामकुक्षी भंग पावली, दार उघडताच “आजी मला आसरा द्या, मला वाचवा. मी निराधार आहे मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही”. त्या वीस बावीस वर्षाच्या मुलीने सुखदाचे पाय घट्ट धरले. मुली थांब म्हणत सुखदाने फोन लावला.

“पोलीस दादा तुम्ही आलात बर झाले, यांना सांगा माझी तक्रार तुम्हाला माहीतच आहे, निराधार आवास योजनेतून फुकट घर, गॅस, जनधन योजना फुकट मिळाला, पैसा नवऱ्याने जुगार, दारुमधे सारं फूंकून टाकल. डोक्यावरलं छप्पर गुंडांनी ताब्यात घेतलं, त्याच्या व्यसनाच्या कर्जापाई फुकट मिळाल्याची किंमत नाही म्हणून फुकापासरी फुंकून मला निराधार करून नवरा कुठे उलथला त्याचा पत्ता नाही. मला आसरा देऊन गुंडांपासून वाचवा. मी तुमचे सारे काम करीन, कामाला मी वाघ आहे. तुम्हाला तोशिष नाही लावू देणार.

निराधार योजनेतून फुकट मिळणारं काही नको मला, मला स्वतः राबून कष्ट करून जे मिळेल त्यात स्वाभिमानाने जगायचयं, माझ्या हाताला काम द्या, आसरा द्या, साऱ्याच चीज करेन मी, माझी एवढी नड काढा आजी”.

पोलीसांच्या मध्यस्थीने सरलाला सुखदाने ठेऊन घेतले. चाळीस वर्षाच्या सहजीवनानंतर इथला धागा तुटला गेला बाकी पुढील नात्यांचे बंध परदेशी बांधले गेले होते. सुखदाच्या एकाकी जीवनात आता सरलेच्या अस्तित्वाने नवेच अतूट नात्याचे बंध निर्माण झाले, दोघींनी एकमेकीस आधार दिला. सुखदाच्या घरचे सारे करून फिरून इतर बिल्डिंगमधे कामे करून सरला महिन्याला पंधरा वीस हजार मिळवू लागली.

पण आपल्यासाठी या तरुण मुलीचे आयुष्य असे खर्ची पडून उपयोगी नाही. तिलाही तिचे आयुष्य, हौस, उत्तम भविष्यकाळांतील उत्तम जोडीदार मिळायला हवा या विचाराने सुखदाच्या मनाने उचल खाल्ली. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून सालस सत्वशील सुरेशशी तिचे लग्न लावून दिले. आता तिचा उज्वल भविष्यकाळ व सुखी संसाराचे चित्र सुखदाच्या दृष्टीपुढे स्पष्टपणे तरळू लागले.

 

© सौ. नीला देवल

९६७३०१२०९०

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मूर्ती ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ मूर्ती ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

तो एक कलाकार होता. त्याने खूप सुंदर सुंदर मूर्ती घडवल्या होत्या. मातीच्या मूर्ती, दगडाच्या मूर्ती,  खडकांवर भीत्तीचित्राप्रमाणे कोरलेल्या मूर्ती. काही मूर्ती लहान होत्या. काही खूपच भव्य होत्या. पण सगळ्याच मूर्ती सुंदर होत्या. मूर्ती जीवंत आहेत , एकमेकींशी बोलताहेत, असं वाटत होतं. किती प्रकारच्या मूर्ती बनवल्या होत्या त्याने. दंतविहीन निरागसबालके. त्यांची फुलांसारखी कोमलता मनाला मोहून टाकायची. काहींमध्ये उफाळणारं तारुण्य,  प्रणयाचं आमंत्रण असायचं. प्रकाशाची चमक त्यात असायची. काही विरह व्यथा प्रकट करणार्‍या असायच्या. काही मूर्ती जरा-जर्जर वृद्धांच्याअसायच्या. भूतकाळाचीआठवणकरणारे त्यांचे डोळे पाणवलेले असायचे.

फुलांचा मोसम होता. सगळ्या मूर्ती आपल्या लावण्याच्या तोर्‍यात होत्या. पण लवकरच मौसम बदलला. फुले आणि ऊबदार वातावरण दूर सारत ढग गडगडू लागले. विजा चमकू लागल्या. धो धो पाऊस सुरू झाला. मातीच्या मूर्तीरडू लागल्या. रडता-रडता  हळूहळू विरघळून गेल्या. त्यांचं नामोनिशाणही राहीलं नाही.

दुसर्‍या दिवशी ऊन पडलं. टणक दगडावरच्याआणि खडकांवर कोरलेल्या मूर्तींनाआपल्या दृढतेचाआणि लावण्याचा अभिमान वाटूलागला. दूर दूर विखुरलेल्या छिन्न-भिन्न झालेल्या मूर्तींना त्यांच्या अभिमानाची तीक्ष्ण धार अधीकच वेदना देऊन गेली.

एक दिवस धरतीच्या पोटातून एक विलक्षण थरथर, भयानक, विचित्र आवाज ऐकू  येऊ लागला. जमीन सरकली. तिचा वक्ष भग्न होऊन विदीर्ण झाला. मोठमोठ्या शीलाखंडांसमवेतलोखंडासारख्या टणक मूर्ती त्यात सामावल्या.

दुसर्‍याच दिवशी तो कलंदर कलाकार पुन्हा तिथे आला. नव्या उगवत्या सूर्याबरोबर तिथलं वातावरण त्याला इतकं अद्भूत वाटलं, की तोपुन्हाआपल्याकामाला लागला. बघता मूर्तींची एक भव्य सृष्टी पुन्हा तिथे स्थापित झाली. काही कच्च्या मातीच्या मूर्ती, काही दगडांच्या, लोखंडासरख्या टणक… पण सगळ्याच सुंदर… अति सुंदर…

 

मूळ हिंदी कथा – मूर्तियाँ    मूळ लेखिका – सुश्री शकुन्त दीपमाला

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झोका ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ विविधा  ☆ झोका ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

गणेश वाडी सारख खेडगाव. बरीच भावंड मिळून झोका खेळत होती वेंण्णाला कोणीतरी मोठा झोका दिला. आणि ती खाली पडली त्या झोक्याने तीच आयुष्यच बदलवून टाकलं डावा हात मोडला. कोणताच उपचार  लागू पडेना.  सात आठ वर्षाची वेण्णा कळा सहन करत होती. अखेर मिरजेच्या मिशन हॉस्पिटल मध्ये  नेलं. डॉक्टरांनी हात  कुमारला लागल्याने तो काढण्याचा निर्णय सांगितला. अर्ध्या दंडापर्यंत हात काढला. मुलीची जात, सगळं आयुष्य जायचं कसं? सगळे काळजीत पडलेप.

रोज वेण्णा आणि आई एकमेकीला धीराचे शब्द देत होत्या. हळूहळू उजवा हात आणि पुढचे दात यांनी परकर बांधता यायला लागला. पोलक्याची बटण लावता यायला लागली. निसर्गनियमाप्रमाणे वेण्णा वयात आली. 9 वारी लुगडं दात पोटाजवळ नेऊन गाठ बांधून, चापून-चोपून नेसायला लागली.

मोठे भाऊ पुण्याला घेऊन गेले. सेवासदन शाळेत घातले. सातवीपर्यंत शिकली. सुंदर मोत्यासारख अक्षर होत . काही दिवसांनी परत आईकडे आली. आणि आणि आता ती भाकरी, पोळ्या, विणकाम, भरत काम पायाच्या अंगठ्याच्या मदतीने करू लागली प्रत्येक काम सुबक करण्यात तिचा कटाक्ष असे. भांडी,धुणं अगदी चकाचक असायचं. आता प्रश्न लग्नाचा.

गजानन गोडबोले नावाचा देखणा, आई-वडील नसलेला मुलगा सांगलीला अग्निहोत्री नातूंकडे रहायला होता. पूजा आणि प्रवचन हेच उत्पन्न. त्याचा आर्थिक प्रश्न आणि देण्याचा व्यंगाचा प्रश्न दोन्ही एकत्र येऊन उत्तर मिळाले. लग्न ठरलं. आणि आणि झालंही. एका हाताने सगळे विधी पार पडले. संसार सुरू झाला. शांत गजाननराव  थोडी तापट वेण्णा. पण रसायन छान आलो होत. कमाईही वाढली होती.वेण्णाला तीन मुली नंतर मुलगा झाला. स्वतः च  घर झालं. दुसरे महायुद्ध झालं आणि आर्थिक सुरु झाली. थोडा भाग भाड्याने दिला.धाकटी मुलगी 8 महिन्याची लहान. गजानन रावांना हृदयविकाराच्या झटक्याने देवाज्ञा झाली.वेण्णा हात पाय गाळणारी नव्हती. खंबीर झाली. प्रवचनाला येणारे गुजराती लोक महिना शिधा द्यायला लागले जोडीला घर भाडे होते. मुलींची लग्न, बाळंतपण सगळं सगळं एक हात कष्ट करत होता. मुलगा नोकरीला लागला. आता तिला आयुष्याची संध्याकाळ दिसायला लागली

आता वेण्णा एका खोलीत एकटीच रहायला लागली. सत्तर वर्ष काम केलेला हात आणि पुढचे दात दुखायला लागले. दोन्ही काम करेनासे झाले तर मी परस्वाधीन म्हणून रोज देवाला प्रार्थना करायची. सांगलीची नाळ सुटत नव्हती. थोडे दिवस मुलाकडे हरिहरेश्वरला निघाली.

बस भरलेली होती. गाव जवळ आल आणि काय झालं कळायच्या आत बस उतारावरून खाली पडली. आरडा ओरडा चालू झाला. कुणीतरी वेण्णाला उचलून खाली दगडावर बसवले. डोक्याला मार लागला होता. मोडके तोडके शब्द तोंडून बाहेर पडले. ‘सर्वजण सुखी रहा’. दुसरा हात उभा राहू शकत नव्हता. पण पण अर्ध्या दंडा पर्यंतचा थोटुक,लेण्याला परस्वाधीन न करता सर्वांचा कायमचा निरोप घेत होतं. वर खाली वर खाली होत होता. एखाद्या झोक्या सारखा! झोका

गणेश वाडी सारख खेडगाव. बरीच भावंड मिळून झोका खेळत होती वेंण्णाला कोणीतरी मोठा झोका दिला. आणि ती खाली पडली त्या झोक्याने तीच आयुष्यच बदलवून टाकलं डावा हात मोडला. कोणताच उपचार  लागू पडेना.  सात आठ वर्षाची वेण्णा कळा सहन करत होती. अखेर मिरजेच्या मिशन हॉस्पिटल मध्ये  नेलं. डॉक्टरांनी हात  कुमारला लागल्याने तो काढण्याचा निर्णय सांगितला. अर्ध्या दंडापर्यंत हात काढला. मुलीची जात, सगळं आयुष्य जायचं कसं? सगळे काळजीत पडलेप.

रोज वेण्णा आणि आई एकमेकीला धीराचे शब्द देत होत्या. हळूहळू उजवा हात आणि पुढचे दात यांनी परकर बांधता यायला लागला. पोलक्याची बटण लावता यायला लागली. निसर्गनियमाप्रमाणे वेण्णा वयात आली. 9 वारी लुगडं दात पोटाजवळ नेऊन गाठ बांधून, चापून-चोपून नेसायला लागली.

मोठे भाऊ पुण्याला घेऊन गेले. सेवासदन शाळेत घातले. सातवीपर्यंत शिकली. सुंदर मोत्यासारख अक्षर होत . काही दिवसांनी परत आईकडे आली. आणि आणि आता ती भाकरी, पोळ्या, विणकाम, भरत काम पायाच्या अंगठ्याच्या मदतीने करू लागली प्रत्येक काम सुबक करण्यात तिचा कटाक्ष असे. भांडी,धुणं अगदी चकाचक असायचं. आता प्रश्न लग्नाचा.

गजानन गोडबोले नावाचा देखणा, आई-वडील नसलेला मुलगा सांगलीला अग्निहोत्री नातूंकडे रहायला होता. पूजा आणि प्रवचन हेच उत्पन्न. त्याचा आर्थिक प्रश्न आणि देण्याचा व्यंगाचा प्रश्न दोन्ही एकत्र येऊन उत्तर मिळाले. लग्न ठरलं. आणि आणि झालंही. एका हाताने सगळे विधी पार पडले. संसार सुरू झाला. शांत गजाननराव  थोडी तापट वेण्णा. पण रसायन छान आलो होत. कमाईही वाढली होती.वेण्णाला तीन मुली नंतर मुलगा झाला. स्वतः च  घर झालं. दुसरे महायुद्ध झालं आणि आर्थिक सुरु झाली. थोडा भाग भाड्याने दिला.धाकटी मुलगी 8 महिन्याची लहान. गजानन रावांना हृदयविकाराच्या झटक्याने देवाज्ञा झाली.वेण्णा हात पाय गाळणारी नव्हती. खंबीर झाली. प्रवचनाला येणारे गुजराती लोक महिना शिधा द्यायला लागले जोडीला घर भाडे होते. मुलींची लग्न, बाळंतपण सगळं सगळं एक हात कष्ट करत होता. मुलगा नोकरीला लागला. आता तिला आयुष्याची संध्याकाळ दिसायला लागली

आता वेण्णा एका खोलीत एकटीच रहायला लागली. सत्तर वर्ष काम केलेला हात आणि पुढचे दात दुखायला लागले. दोन्ही काम करेनासे झाले तर मी परस्वाधीन म्हणून रोज देवाला प्रार्थना करायची. सांगलीची नाळ सुटत नव्हती. थोडे दिवस मुलाकडे हरिहरेश्वरला निघाली.

बस भरलेली होती. गाव जवळ आल आणि काय झालं कळायच्या आत बस उतारावरून खाली पडली. आरडा ओरडा चालू झाला. कुणीतरी वेण्णाला उचलून खाली दगडावर बसवले. डोक्याला मार लागला होता. मोडके तोडके शब्द तोंडून बाहेर पडले. ‘सर्वजण सुखी रहा’. दुसरा हात उभा राहू शकत नव्हता. पण पण अर्ध्या दंडा पर्यंतचा थोटुक, लेण्याला परस्वाधीन न करता सर्वांचा कायमचा निरोप घेत होतं. वर खाली वर खाली होत होता. एखाद्या झोक्या सारखा!

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली

फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ मुलगा-मुलगी (भावानुवाद) ☆ श्रीमती माया सुरेश महाजन

श्रीमती माया सुरेश महाजन

☆ जीवनरंग ☆ मुलगा-मुलगी ☆ श्रीमती माया सुरेश महाजन

रेल्वेत आमच्या समोर सीटवर एक मध्यमवयीन जोडपे त्यांच्या तीन मुली व एक मुलगा असे बसलेले होते. ती भावंड कधी खाण्याच्या वस्तुवरून, नाही तर एखाद्या खेळण्यावरून आपसात भांडत होती. मुलगा सर्वात मोठा म्हणजे बारा-तेरा वर्षांचा असेल त्यानंतरच्या तिघी मुली दोन-तीन वर्षांच्या अंतराने दिसत होत्या. भावाच्या पाठची मोठी मुलगी दहा वर्षाची वाटत होती. सुंदर, निरोगी, कानात बहुतेक नुकतेच टोचून घेऊन डूल घातलेले होते, कारण कानांच्या पाळीवर तेल हळद लावलेले दिसत होते. खेळता-खेळता मुलांच्यात परत भांडण झाले आणि मुलाने बहिणीच्या कानावरच जोरात थप्पड मारली. मुलगी किंचाळली. तिच्या कानाच्या पाळीवरून रक्ताचे थेंब ओघळले. आईने जरा रागानेच मुलाकडे पाहिले. पण तोपर्यंत मुलीने भावाच्या मनगटाचा चावा घेतला, दात उमटले अगदी.

तो पण किंचाळला मनगटावर व्रण पाहून आईने लेकीलाच जोरात चापट मारली,

‘‘का गं? लाज नाही वाटत? भावाला इतक्या जोराने चावलीस? तो काय शत्रू आहे का तुझा?’’

‘‘त्याने का इतक्या जोराने मारले मला?’’

‘‘त्याच्या मारण्याने काय मरत होतीस का लगेच? येऊन-जाऊन एकुलता एक मुलगा आहे, त्याच्याच मागे अगदी हात धुऊन लागता तुम्ही सगळ्या,’’ आई अजूनही रागाने बडबडत होती.

‘‘मी चावल्यानेदेखील तो काय मरणार होता?’’

 

मूळ हिंदी कथा – लड़का-लड़की – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

मो.- ९३२५२६१०७९

अनुवाद – सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – आशीर्वाद ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – आशीर्वाद सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

 

“आजी नमस्कार करते ग,”

” ये ये. दीर्घायुषी हो बाळ. देवीमातेच्या आशिर्वादाने तुला रामासारखा नवरा मिळू दे “.

आजी नातीला आशिर्वाद देत म्हणाली.

” नको आजी. मुळीच नको. ज्याने कोणा त्रयस्थाच्या सांगण्यावरून स्वतःच्या बायकोला घराच्या बाहेर काढलं, आणि पदोपदी ठेचकाळत जगण्यासाठी जंगलात सोडून दिलं, त्याच्या सारखा नवरा अजिबात नको आहे मला.”

“बरं बाई, तुला कृष्णासारखा नवरा मिळू दे. आता तरी खूश?”

“नको ग , तसा तर मुळीच नको.  जो कुठल्या एकाच स्त्रीचा नवरा होऊन राहिला नाही, त्याच्यासारख्या मुलाशी लग्न करून काय करू मी? तसा नवरा तर नकोच.”

“कमाल आहे तुझी. रामासारखा नको, कृष्णासारखाही नको, मग नेमका कसा नवरा पाहिजे बाई तुला?”

” हे बघ, मला असा नवरा पाहिजे जो मला एखादी निर्जीव पाषाणमूर्ती समजणार नाही. किंवा एखादं खेळणंही समजणार नाही. माझ्या नवऱ्याने माझ्याकडे एक माणूस

म्हणून पहावं- वागावं….बस… एवढीच इच्छा आणि अपेक्षा आहे माझी. ”

 

मूळ हिंदी कथा : डॉ. लता अग्रवाल

अनुवाद :…… सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares