डाॅ. मीना श्रीवास्तव
इंद्रधनुष्य
☆ ‘कँडी यांचा अदृश्य स्पर्श…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
मेजर जेम्स थॉमस कँडी
कँडी यांचा अदृश्य स्पर्श – –
*
मराठी भाषेत आपण किती सहज वापरतो – –
स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह.. …
*
– – या विरामचिन्हांची शिस्तबद्ध सुरुवात एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केली!
ते डेक्कन कॉलेज पुणे चे प्राचार्य सुद्धा होते..
त्यांचे नाव “मेजर जेम्स थॉमस कँडी”
१८व्या-१९व्या शतकात मराठी लेखन सलग असायचे…
दंड (|) आणि द्विदंड (||) एवढीच चिन्हे वापरली जात.
इंग्रजी भाषेच्या प्रभावानंतर पुढील चिन्हे मराठीत रूढ झाली :
स्वल्पविराम (,)अर्धविराम (;) पूर्णविराम (.) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) इत्यादी…
– – मात्र कँडी यांनी १८५० साली ‘विरामचिन्हांची परिभाषा’ ही पुस्तिका लिहून मराठी लेखनाला नवा श्वास दिला.
– – वाक्याचा अर्थ स्पष्ट व्हावा, वाचन सुलभ व्हावे, आणि लेखनाला शिस्त लाभावी, यासाठी त्यांनी नियम तयार केले.
आज आपण लिहितो त्या प्रत्येक वाक्यात कँडींचा अदृश्य स्पर्श आहे!
विरामचिन्हांची परिभाषा ही १६ पानी पुस्तिकाच त्यांनी लिहीली, मराठी इंग्लिश शब्दकोश निर्मीतीमधे
त्यांचे अमुल्य योगदान आहे
२६ फेब्रुवारी रोजी त्यांचे १५० वे स्मृतिवर्ष असेल.
मराठी लेखन समृद्ध करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन!!!
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





