सुश्री शीला पतकी 

? कवितेचा उत्सव ?

☆ “थोडा उशीर झाला…” ☆ सुश्री शीला पतकी 

सुखाशी वैर कायमचे.. व्यथांचे सोयरे आपण

सुखाला वाट ना आमची.. कधी ठाऊक हो झाली

*

व्यथांची नित्य ये -जा ती.. तयांची सोय छान झाली

व्यथेने मित्र ते आणले..  दुःखाची ओळख की झाली

*     

लळा त्यांचाच मज लागे.. आता ते मित्र की झाले

ठाऊक आहे मजला.. आता ते सोडणार नाहीत

*

मैत्री अशी सहज ते..  तोडणार नाहीत

सुखाला ना उमगले हे..  म्हणून ते आले कधी न दारी

*

म्हणे एकदा कधी तरी ते..  कडी वाजवून गेले

दुःखात चूर  इतका.. ऐकू न काही आले

*

उघडण्यास कवाड मजला.. थोडा उशीर झाला

किंचित पाठमोरे … मी पाहिले तयाला

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments