डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी
चित्रकाव्य
– क्षण सौख्याचा… –
☆ सुश्री मधुवन्ती कुलकर्णी ☆
☆
तप्त येतसे ज्वाळा आता अवतीभवती
सूर्य ओकतो आग न साहे पिके करपती
*
आयुष्य गेले माझे निसटून काय राहिले?
बहर संपले कितिक वर्षे कसे फुलले?
*
येता जाता पांथस्थांना देत विसावा
उभा तरी मी धरितो छाया ॠतू फुलावा
*
रात्रंदिन मी गातो गाणी साथीने वाऱ्याच्या
पक्षांसाठी घरटे जपतो गोष्टी वेल्हाळांच्या
*
असेच सरता दिवस मग तो क्षण येई सौख्याचा
मुक्तेसम मी विरघळेन तो हक्कही सौदामिनीचा
☆
© सुश्री मधुवंती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




