सुश्री सुरेखा चिखलकर

? इंद्रधनुष्य ?

भावनेचा उद्रेक होणे म्हणजे काय? ☆ सुश्री सुरेखा चिखलकर

भावनेचा उद्रेक होणे म्हणजे काय असते, असे जेव्हा कोणी विचारत तेव्हा असंख्य उदाहरण सांगता येतील.

अनेकदा आपणही रागाच्या भरात आपल्या जवळच्या व्यक्तीला वाटेल तसे बोलतो, प्रसंगी हात सुद्धा उचलतो.खरच हा राग व्यक्त करायचा योग्य मार्ग आहे का? राग हा व्यक्त करणे खरच गरजेचे आहे का? खर तर राग ही सुद्धा एक भावना आहे आणि कोणतीही भावना व्यक्त न करता दाबून ठेवल्याने नुकसान होतच असते.भावना सगळ्याच वेळीच व्यक्त करणे जरूरी असते, राग ही वेळेवर व्यक्त करणे तसेच जरूरी आहे.पण कुठलीही गोष्ट अति प्रमाणात व्यक्त करणे वाईटच.

राग असो वा प्रेम किंवा अजून कुठलीही भावना जर अति प्रमाणात दाबून ठेवली तर, तेवढीच ती उफाळून वर येते.पण आपल्या भावना जर आपल्या हातात नसल्या तर, मग आपल्याला नीट जगता येत नाही.माणसाच्या भावना ह्या त्याच्या जगण्यातला सगळ्यात मोठा मार्ग आहे.माणसाच्या भावना ह्या त्याच्या जगण्याचा मोठा आधार आहेत.त्या मनात दाबून ठेवल्याने किंवा वेळीच न व्यक्त न केल्यास त्याचा त्रासच होतो.

भावना व्यक्त करण्याचं सगळ्यात मोठं साधन आहे ते म्हणजे शब्द, बोलणे.आता या क्षणी मला काय वाटते ते शब्दातून बोलून टाकावे.बोलणे, संवाद साधणे हे भावना व्यक्त करण्याचे चांगले साधन आहे, किंवा मला आता याक्षणी काय करावेसे वाटतेय ते करून मोकळे व्हावे.आपल्याकडे असणारे पाळीव प्राणी नाही का, त्यांच्या भावना पूर्ण करूनच घेतात.जसे एखादा कुत्रा मांजर आपण त्याला जवळ घ्यावे म्हणून उड्या मारतच राहतो.राग आला की भुंकतो, मग आपण तर माणूस आहोत आपल्याकडे भावना व्यक्त करायला अनेक मार्ग आहेत अगदी आनंद झाला की उड्या मारव्यात, ओरडावे.पण, आपण माणूस स्वतःच्या खोट्या प्रतिष्ठेचा एवढा बाऊ करतो की विचारू नये. आपण आपल्या खोट्या कल्पना, खोट्या धारणा एवढ्या जीवापाड जपत राहतो.खऱ्या खुऱ्या भावना जगायचं विसरूनच जातो आणि मग एका क्षणी त्या भावनांचा उद्रेक होतो, आपला राग सगळ्या सदसदबुद्धीला बाजूला सारतो आणि त्वेषाने बाहेर पडतो.त्या क्षणी आपण कोणताही विचार करूच शकत नाही.ही कृती घडून गेल्यावर काय उरते फक्त आणि फक्त पश्चाताप.. पण, त्याचा उपयोग काय?

– – भावनेशिवाय माणूस जगू शकत नाही.. पण त्या भावनांचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे आणि तेही वेळेवर.

” मित्रांनो काळजी घ्या….” 

 सुश्री सुरेखा चिखलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments