श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ जगातील सर्वात मोठा शब्द… ☆माहिती संग्राहक : श्री दिवाकर बुरसे ☆
संस्कृत भाषेतच असे चमत्कार घडू शकतात!
संस्कृत भाषेतील एका अतिविशाल शब्दाचा परिचय करून घेण्यापूर्वी या शब्दाच्या लेखिकेविषयी सांगणे आवश्यक आहे.
*राणी तिरुमलाम्बिका*
विजयनगर साम्राज्याने भारतीय कला, साहित्य, संस्कृति, संगीत याला महत्वपूर्ण आश्रय दिला होता. १५२९ ते १५४२ या काळात अच्युतदेवराय हे सम्राट होते. त्यांची राणी तिरुमलाम्बिका या अतिविदुषी होत्या. तिरुमलाम्बिका यांना “राजाधिराजाच्युतरायसार्वभौमप्रेमसर्वस्वविश्वासभुवा” (राजाधिराज अच्युतराय सार्वभौम यांचे प्रेम व सर्वस्व विश्वास संपादन केलेली) असे म्हटले गेले आहे. त्यांचे संस्कृत भाषेखेरीज अनेक भाषांवर प्रभुत्व होते. त्या काव्ये नाटके, काव्यशास्त्र, वेद आणि पुराणांच्या ज्ञात्या होत्या. चम्पू काव्य शैलीत त्यांनी लिहिलेला – *वरदाम्बिकापरिणयचम्पूः*
(वरदाम्बिकाच्या विवाहाचे गद्यपद्यमय काव्य) हे संस्कृतातील मनोहरी काव्यांपैकी एक काव्य आहे.
कवी बाणभट्ट हे संस्कृत गद्यात दीर्घ सामासिक शब्दांच्या प्रयोगासाठी विख्यात आहेत पण तिरुमलाम्बिका सुद्धा या कलेत त्यांच्या तुलनेत जराही मागे नाहीत. चम्पू काव्याच्या रूपातील दीर्घ शब्दप्रयोग केलेली ही कृती पद्यमय असल्याने फार सरस आणि वाचनीय झाली आहे.
या काव्यातील एक खण्ड ‘तुण्डीरदेशवर्णनम्’, यात पुढे दिलेला प्रसिद्ध शब्द मिळतो. याला संस्कृत भाषेतला सर्वात मोठा शब्द मानतात. *छप्पन्न शब्दांशांनी आणि एकशे एक्याण्णव अक्षरांनी रचलेला हा शब्द* अनेक विशेषणे उपसर्ग, प्रत्ययांनी विभूषित आहे :—
*निरन्तरान्धकारितदिगन्तरकन्दलदमन्दसुधारसबिन्दुसान्द्रतरघनाघनवृन्दसन्देहकरस्यन्दमानमकरन्दबिन्दुबन्धुरतरमाकन्दतरुकुलतल्पकल्पमृदुलसिकताजालजटिलमूलतलमरुवकमिलदलघुलघुलयकलितरमणीयपानीयशालिकाबालिकाकरारविन्दगलन्तिकागलदलालवङ्गपाटलघनसारकस्तूरिकातिसौरभमेदुरलघुतरमधुरशीतलतरसलिलधारानिराकरिष्णुतदीयविमलविलोचनमयूखरेखापसारितपिपासायासपथिकलोकान्*
वरील अति दीर्घ सामासिक शब्दातील एकेका शब्दाचा /शब्दांशाचा अर्थ:
- निरन्तरान्धकारित (सदा अंधारात वास्तव्य करणारा)
- दिगन्तर (अन्यत्र)
- कन्दलदमन्द (फळा फुलांनी युक्त)
- सुधारस (फुलांतील मध)
- बिन्दु (थेंब, कण)
- सान्द्रतर (उत्कट, प्रबळ)
- घनाघन (इन्द्र; वर्षाव करणारे मेघ)
- वृन्द (दल)
- सन्देहकर (सन्देह, संशय उत्त्पन्न करणारा)
- स्यन्दमान (चन्द्रमा; प्रवाहित, वाहणारा)
- मकरन्द (फुलातील मध)
- बिन्दु (थेंब, कण)
- बन्धुरतर (सुखद, सुदर, आकर्षक)
- माकन्द (आम्र वृक्ष; माकन्दी पिवळे चन्दन)
- तरु (वृक्ष)
- कुल
- तल्प (आसन, रक्षक)
- कल्प (सक्षम, नृत्य)
- मृदुल (सुकोमल, जल)
- सिकता (वाळू)
- जाल (जाळे)
- जटिल (गुंतागुंतीचे)
- मूल (मूळ)
- तल
- मरुवक (एक प्रकारची तुळस)
- मिलद (मिळत असलेले)
- लघु (लहान)
- लघु (लहान)
- लय (स्वराची मधुरता)
- कलित (गुणगुणणारे, प्रेरित)
- रमणीय (मनोरम)
- पानीय (पोषित, संरक्षित, पाणी)
- शालिका (कुटि, घर)
- बालिका (कन्या)
- करारविन्द (कमळासारखे हात.)
- गलन्तिका (पाण्याचा झरा)
- गलदेला (एक प्रकारचे गवत)
- लवङ्ग (लवंग वृक्ष)
- पाटल (गुलाब)
- घनसार (कर्पूर, कपूर)
- कस्तूरिकातिसौरभ (अतिशय सुगंधितत कस्तुरी)
- मेदुर (चिकणे, घने)
- लघुतर (लहान)
- मधुर (गोड)
- शीतलतर (अधिक गार)
- सलिलधारा (जलधारा)
- निराकरिष्णु (निरोधक, अडवणारा)
- तदीय (त्यांचे)
- विमल (स्वच्छ, सुन्दर)
- विलोचन (नेत्र, दर्शन)
- मयूख (प्रकाश किरणें)
- रेखापसारित (रेषांनी विखुरले (अपसारित))
- पिपासायास (तहानेलेले (पिपासु), थकलेले (आयास))
- पथिक (प्रवासी)
- लोकान् (मनुष्य)
खरे तर या शब्दाची संपूर्ण व्याख्या लिहायला अनेक पृष्ठे लागतील. पण याचा भावार्थ सांगायचा झाला तर तो असा सांगता येईल :
या प्रवाश्यांना तहानेमुळे होणा-या त्रासाचे निवारण या कन्यांच्या वेधक नेत्रांतील किरणांच्या गुच्छामुळे केले, प्रकाशकिरणे जी जलधारांवर हिलोरत होती, वेलची, लवंग, केशर, कापूर आणि कस्तुरी यांनी सुगंधित झालेल्या मधुर व शीतल जलाला कुमारींच्या कमळासारख्या हातात धारण केलेल्या घड्यांत, त्यांची पावले सुकोमल रेतीच्या पायघड्यांवर पडत होती नवमंजि-यांनी डवरलेल्या आम्रतरूंराजीमधे असलेल्या भूभागावर अंधार करीत होते आणि गुलाबादि फुलांतून टपकणा-या रसाच्या थेंबांमुळे आधिकच आकर्षक वाटत होती जशी मेघांची रांग घनदाट वर्षायुक्त मेघांची रांगेचा भ्रम निर्माण करते ज्यात विपुल प्रमाणात अमृतासम जल ओथंबले आहे.
माहिती संग्राहक : श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





