सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

💐 अ भि नं द न 💐

तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांनी आयोजित केलेल्या नवरात्री काव्यलेखन स्पर्धेत,आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तावडे यांना त्यांच्या महिषासुरमर्दिनी जोगवा या काव्यरचनेसाठी उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे सौ. तानवडे यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐

पुरस्कार प्राप्त कविता ‘अंबे जोगवा मागते आज प्रकाशित होत आहे. 🪻

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? कवितेचा उत्सव ?

☆ “अंबे जोगवा मागते” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित नवरात्र विशेष काव्यलेखन महोत्सव – उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त)

विषय  – महिषासुरमर्दिनी जोगवा

निर्गुणाचे रुप सगुण भगवती पातली

महिषासुरा मर्दुनी आई साक्षात प्रकटली

दिव्य रुप अवतारी हे पायी तव लागते

जोगवा घाली अंबे जोगवा मागते

जोगवा मागते आई जोगवा मागते ||ध्रु||

 *

षडविकारी असुर निर्दालनास बळ दे

सदविचारी सद्बुद्धीचे दान मजला दे

असंग सोडून निसंग होऊन शरणागत होते

जोगवा घाली अंबे जोगवा मागते

जोगवा मागते आई जोगवा मागते ||

 *

अनन्य भक्तिच्या अंतरी लावूनिया ज्योती

तुझ्या रूपाची मनोभावे करते मी आरती

तुझ्या कृपेचा घरादारा आशीर्वाद मागते

जोगवा घाली अंबे जोगवा मागते

जोगवा मागते आई जोगवा मागते ||

 *

नातीगोती जपुनिया सांभाळी अनुबंधा

कामक्रोधांना जिंकत दूर करी अंधश्रद्धा

ज्ञानाचा प्रकाश आई तुझ्याकडे मागते

जोगवा घाली अंबे जोगावा मागते

जोगवा मागते आई जोगवा मागते

 *

जोगवा मागते अंबेचा जोगवा मागते

जोगवा मागते आईचा जोगवा मागते

उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे

उदो उदो उदो उदो उदो उदो उदो ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments