श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 विनवणी ! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

खळ नाही आभाळाला

अविरत धरली धार

ओल्या दुष्काळाचे सावट

करू लागे मनी घर

 

घे उसंत आता जराशी

नदी नाल्या आले पूर

वावरात शिरे पाणी

तोडूनिया त्याची मेर

 

धीर सुटे बळीराजाचा

पाणी डोळ्याचे खळेना

उघड्या डोळ्यांनी पाहे

पेरणीच्या शेताची दैना

 

कर उपकार आम्हावर

पुन्हा एकदा विनवितो

भाकर तुकडा लेकरांचा

सांग कशास पळवतो ?

© श्री प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted