श्री सुनील देशपांडे
विविधा
☆ गाव महत्वाचे आहे काय? ☆ श्री सुनील देशपांडे ☆
“पूर्वी असे वाटायचे की चांगले शिक्षण घेतले, मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली की आयुष्य सुरक्षित झाले. विशेषत : I. T. , software, finance, design, support अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना वाटायचे की ही career lifetime सुरक्षित आहे”…!!!
पण आता परिस्थिती बदलत आहे.
“पूर्वी software industry मध्ये हजारो freshers घेतले जायचे. Training देऊन projects वर बसवले जायचे. आता AI काही सेकंदांत coding, debugging, documentation, testing, reporting अशी अनेक कामे करत आहे “…!!!
खरं सांगायचं तर आता फक्त fresher नाही, तर अनेक experienced लोकांची गरज सुद्धा कमी होत चालली आहे.
आणि ही फक्त सुरुवात आहे.
पुढच्या ५ ते १० वर्षांत लाखो white-collar jobs कमी होणार हे जवळजवळ निश्चित आहे. कारण कंपन्यांना भावना नसतात. खर्च कमी झाला की माणसं कमी होतात.
मग प्रश्न पडतो :
या साऱ्यांचं काय होणार?
पण इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल.
AI coding करू शकतो.
Design करू शकतो.
Accounts करू शकतो.
Reports लिहू शकतो.
पण AI भाकरी बनवू शकत नाही.
Server farm मध्ये गहू उगवत नाही.
Chatbot टोमॅटो पिकवत नाही.
म्हणूनच पुढच्या २०-३० वर्षांत जगातील सर्वात महत्वाचा sector कोणता असेल तर तो अन्न उत्पादन.
हे भावनिक विधान नाही.
ही वस्तुस्थिती आहे.
जगात कितीही technology आली तरी तीन गोष्टी कायम लागणार :
★ अन्न,
★ पाणी आणि
★ ऊर्जा.
बाकी सगळे luxury आहेत.
आजचा सर्वात मोठा भ्रम म्हणजे :
“Digital economy म्हणजे future.”
नाही.
Digital economy वर civilisation उभे राहत नाही.
Civilisation उभे राहते:
माती, पाणी, अन्न आणि ऊर्जेवर.
म्हणून पुढच्या काही वर्षांमध्ये एक मोठा सामाजिक बदल होणार आहे.
आणि तो बदल शांतपणे सुरू सुद्धा झाला आहे.
शहरातून गावाकडे परत येणाऱ्या लोकांचे लोंढे वाढणार आहेत.
आज अनेकांना हे अतिशयोक्ती वाटेल. पण AI आणि automation किती वेगाने पुढे जात आहे हे ज्यांनी जवळून पाहिले आहे त्यांना परिस्थितीची गंभीरता समजते.
पुढच्या काळात लाखो तरुण शहरात टिकू शकणार नाहीत. कारण शहरातील संपूर्ण जीवन monthly cashflow वर चालते. Job गेली की EMI थांबते. EMI थांबली की संपूर्ण व्यवस्था कोसळते.
मग हे लोक कुठे जाणार?
ते परत गावाकडे येणार.
कारण शेवटी शहर हे consumption economy वर चालते. पण गाव अजूनही production economy वर उभे आहे.
शहर पैसा छापू शकते.
Software बनवू शकते.
पण अन्न तयार करू शकत नाही.
म्हणूनच गावांचे महत्व पुन्हा वाढणार आहे.
पण इथे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे :
आपण या बदलासाठी तयार आहोत का?
आज बहुतेक गावे रिकामी होत आहेत. तरुण शहरात गेले. शेती वृद्धांच्या हातात राहिली. गावातील कौशल्य, उद्योग, जनावरे, तेलघाण्या, प्रक्रिया उद्योग, स्थानिक अन्न व्यवस्था हळूहळू संपत गेली.
आता उलट प्रवाह सुरू होणार आहे.
आणि जर सरकार, समाज आणि गावांनी यासाठी तयारी केली नाही तर प्रचंड सामाजिक अस्थिरता निर्माण होईल.
कारण बेरोजगार, कर्जबाजारी आणि मानसिक तणावाखाली असलेली मोठी लोकसंख्या ही कोणत्याही समाजासाठी धोक्याची घंटा असते.
म्हणून आजपासूनच गावांसाठी नवीन vision तयार करावे लागेल.
गाव म्हणजे फक्त शेती नाही. गाव म्हणजे :
– अन्न उत्पादन
– दूध उत्पादन
– तेलबिया उत्पादन
– स्थानिक प्रक्रिया उद्योग
– पाणी व्यवस्थापन
– ऊर्जा निर्मिती
– कौशल्य आधारित छोटे उद्योग
– स्थानिक रोजगार
– decentralised economy
आज आपण खाद्यतेलासाठी प्रचंड प्रमाणात बाहेरच्या देशांवर अवलंबून आहोत. एक Hormuz बंद झाला तरी संपूर्ण देश हादरतो. हे धोकादायक आहे.
म्हणून गावागावात :
– शेंगदाणा
– तीळ
– करडई
– सूर्यफूल
– मोहरी
– नारळ
यांचे स्थानिक उत्पादन आणि प्रक्रिया पुन्हा उभी करावी लागेल.
उत्तम दूध उत्पादन, स्थानिक धान्य, डाळी, भाज्या, फळे यामध्ये स्वयंपूर्णता निर्माण करावी लागेल.
हे फक्त शेतीचे प्रश्न नाहीत.
हे राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न आहेत.
भविष्यात मजबूत देश तोच असेल जो :
– स्वतःचे अन्न तयार करेल
– स्वतःचे तेल तयार करेल
– स्वतःचे बियाणे जपेल
– स्वतःचे पाणी जपेल
– स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत ठेवेल
बाकी फक्त GDP ने समाज टिकत नाही.
आज अनेक तरुणांना वाटते की शेती म्हणजे backward profession. पण पुढच्या काळात उलट होऊ शकते.
कारण AI मुळे information based jobs कमी होतील.
पण real-world production ची गरज कायम राहील.
शेती कठीण आहे.
अनिश्चित आहे.
कधी तोटा होतो.
कधी पाऊस फसवतो.
कधी बाजार पाडतो.
पण एक गोष्ट लक्षात घ्या. जगातील कोणत्याही संकटात अन्न उत्पादकाची गरज संपत नाही.
Corona मध्ये सर्व उद्योग बंद झाले, पण शेती चालू होती.
★ युद्ध झाले तरी अन्न लागते.
★ मंदी आली तरी अन्न लागते.
★ AI आले तरी अन्न लागते.
म्हणून शेतीकडे आता फक्त पारंपरिक व्यवसाय म्हणून पाहून चालणार नाही.
ती future survival system म्हणून पाहावी लागेल.
पण यासाठी शेतीची पद्धत सुद्धा बदलावी लागेल.
पुढच्या काळातील शेती म्हणजे :
– direct customer model
– residue free food
– local food processing
– multi cropping
– natural farming
– seed saving
– agro forestry
– community supported agriculture
– on-farm value addition
आणि महत्वाचे म्हणजे AI चा वापर करून शेती अधिक efficient करता येईल.
भविष्यात सर्वात सुरक्षित लोक कोण असतील?
ज्यांच्याकडे :
– जमीन आहे
– पाणी आहे
– अन्न उत्पादन क्षमता आहे
– कौशल्य आहे
– अनेक income sources आहेत
– community network आहे
आजचा सर्वात मोठा trap म्हणजे :
मोठा पगार + मोठे EMI + एकच income source.
“Job गेला की सगळे कोसळते”…!!!
पण ग्रामीण भागात अजूनही माणूस काही प्रमाणात स्वतःचे अन्न उगवू शकतो. जनावरे ठेवू शकतो. कमी खर्चात जगू शकतो. हे future security आहे.
म्हणून पुढचा काळ हा गावांचा असू शकतो.
पण त्यासाठी गावांनी फक्त शहराची स्वस्त copy बनून चालणार नाही.
गावांनी उत्पादन केंद्र बनावे लागेल.
आणि हे काम सरकार एकटे करू शकत नाही.
शेतकरी, तरुण, उद्योग, ग्रामपंचायत, सहकारी संस्था, स्थानिक उद्योजक सगळ्यांना मिळून नवीन ग्रामीण अर्थव्यवस्था उभी करावी लागेल.
नाहीतर पुढच्या दशकात आपण एक विचित्र समाज पाहू :
शहरात नोकऱ्या नाहीत,
गावात उत्पादन नाही,
आणि लोकांकडे कौशल्य असूनही उपयोग नाही.
ही वेळ अजून गेलेली नाही.
पण तयारी आत्ताच सुरू करावी लागेल…!
– समाप्त –
© श्री सुनील देशपांडे
पुणे, मो – 9657709640 ईमेल : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





