डॉ. मधुवंती कुलकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ सूक्ष्मजीव… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

💐जागतिक कविता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐

(सूक्ष्मजीव शास्त्र व कविता यांचा समवाय साधण्याचा प्रयत्न. कोणत्याही विज्ञान शाखेतील पुस्तकांच्या निर्मितीसाठी, परस्पर मैत्रीपूर्ण संबंध राखण्यासाठी, ज्ञानाची देवाणघेवाण यशस्वी होण्यासाठी भाषा ही महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.)

सूक्ष्मजीव असति जळी स्थळी काष्ठी आणि पाषाणी

करावी लागते सूक्ष्मदर्शकातून त्यांची नेमकी पहाणी

*

सुंदर निर्मियले जग हे परमेश्वराने चित्र मनोवेधक जाहले

मानवा बरोबर जीवाणू, विषाणू, अल्गी प्रोटोझोआ अवतरले

*

विरजण लावत, इडलीचे पीठ आंबवत आई-आजी मोठ्या झाल्या.

लॅक्टोबॅसिलस आणि यीस्ट त्यांच्या प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडू लागल्या

*

ॲंटोनी, पाश्चर, ॲलेक्झांडर, रॉबर्ट यांनी आयुष्य सर्व वाहिले.

सूक्ष्मजीवांवर संशोधन करताना जीवन समर्पित जाहले.

*

आरोग्य, उद्योग, औषधे, अन्न सुरक्षा यांना विस्तारते सूक्ष्मजीवशास्त्र

अथांग पसरलेले सखोल, शाश्वत असे हे मार्गदर्शक तत्त्वांचे शास्त्र

*

महाकुंभ मेळ्यात भरला माणसांच्या गर्दीचा अपूर्व हाट

कोडे सुटेना साथीचे रोग नाहीत गंगेचे गुण आवडीने गाई भाट

*

ठेवला प्रश्न पुढे उत्तर शोधण्या सर्व ज्ञानी संशोधक प्रतिभावान

उत्तर मिळता सुदिन म्हणूया संसाधने असती ही गुणवान

*

जागतिक कविता दिनी प्रसन्नतेने वाहते ओंजळभर कृतज्ञ फुले

आशिर्वाद गुरूंचे घेऊनि विस्तारू विज्ञान कक्षा वेचूनि ज्ञान फुले

© डॉ. मधुवंती कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments