श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३०८
☆ रातभर जागलात का? ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
चांदोबा रातभर जागलात का?
चुकीचं असं तुम्ही वागलात का?
यानाने येण्याची दिली संधी
तिथे नाही वाडा चिरेबंदी
*
आम्हा खाली बघून हसलात का?
आमची वाट बघत बसलात का?
ढगाच्या मागुन निघताल का?
गोरा गोरा चेहरा दावताल का?
*
चांदोबा एकटे फिरता तुम्ही
सोबत का हो नसते मामी
सांगा तिला माहेरी धाडलंत का?
वा कुठं दडवून ठेवलंत का?
*
अवचीत पाऊस कसा आला
आणि तुम्ही गायब कुठे झाला
दामिनीला पाहून दडलात का?
खरं सांगा चांदोबा रडलात का?
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





