कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २९० – विजय साहित्य ?

☆ विचारगाथा…!

माणूस नाही,धर्मा करीता

धर्म पाहिजे, माणूसकीचा

गेले सांगून‌‌, बाबासाहेब

मार्ग दावीला, विश्व शांतीचा.

*

मानव मूल्ये, हवी एकता

भाव असावा,‌ विश्व‌बंधुता

संघर्ष न्यारा, मार्ग अनोखा

नको कुणाच्या,‌मनी कटूता.

*

शिका लढा नी, संघटीत व्हा 

शिका लोकहो, सुशिक्षीत व्हा

करा स्वतःला, पदवीधर

दिली प्रेरणा, संरक्षीत व्हा.

*

शिक्षण आहे, वाघीण माया

जाईल कैसे, पोषण वाया

हक्क माणसा, मिळवायाला

स्वावलंबनी, झिजवा काया.

*

लोकशाहीची, तंत्र प्रणाली

कसे जगावे, तत्व कळाली

जबाबदारी, कर्तव्ये‌ सारी

मानवतेच्या, पदी वळाली.

*

आत्म बलाने, वावरणारी

सक्षम व्हावी समाज नारी

माया ममता, शांती करूणा

बुद्धिनिष्ठता, जगता भारी.

*

नको कुणाची, साहू गुलामी

संविधान‌ ही, घटना नामी

वैज्ञानिकता, ध्येय ठेवूनी

रहा सुखाच्या, सदैव धामी.

*

महामानवी, विचार गाथा

आठवताना, झुकतो माथा

शब्द बोलती, भीमरायाचे

नका खाऊरे,‌ जुलमी लाथा.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments