श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆  एक छान विचार… ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

एक छान विचार, आवडतोय का बघा –

व्यक्ती तितक्या प्रकृती हे वचन आपण जाणतोच. आपण बघतोच प्रत्येकाची प्रकृती काहीतरी फरकानी वेगळी असते.

असंच अजून एक वचन आहे – व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे स्वभाव किंवा वागण्याचा कल. आणि जसं वय वाढतं तसं तसं प्रत्येक जण आपापली प्रवृत्ती स्वतःच तयार करत असतो. आपल्यावरचे संस्कार, आपल्या आसपासची परिस्थिती, आपले अनुभव यामुळे प्रवृत्ती बदलत जाते आणि प्रत्येक जण त्या त्या प्रवृत्ती प्रमाणे वागत असतो.

आणि आपल्यासकट प्रत्येकालाच वाटत असतं की आपला स्वभाव खूपच छान आहे.

आपण जर रोज पाच ते दहा मिनिटं स्वतःचीच संवाद साधला, तर आपल्यातले इतरांना न आवडणारे कुठले पैलू आहेत हे आपल्याला सहज समजून शकते आणि आपण ते दूर करू शकतो.

आपल्या समोरच्या व्यक्तीने, मग ते आपले नातेवाईक असोत; मित्र असोत; सहकारी असोत; आपल्याशी किंवा इतरांशी त्यांनी कसे वागावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आणि हे जर आपल्याला समजले तर आपण सगळ्यांबरोबरच आनंदाने राहू शकतो.

आपण मात्र नेहमी सगळ्यांशी छानच वागावे, त्यांना आनंद मिळेल असे वागावे, त्यांना मदत होईल असे वागावे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येईल असे वागावे.

आणि आपण देवाला सतत एकच प्रार्थना करावी – हे देवा सगळ्यांचे नेहमी भले होवो, सगळ्यांचे कल्याण होवो…

श्री स्वामी समर्थ

 © श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted