बिल्वा शुभम् अकोलकर
इंद्रधनुष्य
☆ ऊरुग्वे आणि ‘इंडियन काऊ’… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – बिल्वा शुभम् अकोलकर ☆
☆
उरुग्वे हा एक असा देश आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीकडे सरासरी चार गायी आहेत, आणि कृषी क्षेत्रात तो जगात पहिल्या क्रमांकावर आहे!! हा फक्त ३३ लाख लोकसंख्येचा देश आहे आणि तिथे १ कोटी २० लाख गायी आहेत!
प्रत्येक गायीच्या कानात एक इलेक्ट्रॉनिक चिप बसवलेली आहे, ज्यामुळे प्रत्येक गाय कुठे आहे याचा मागोवा घेता येतो. एक शेतकरी कापणीच्या यंत्रामागे बसून काम करत असताना, दुसरा पिकाची आकडेवारी पाहण्यासाठी स्क्रीनवर डेटा जोडत असतो.
देशातील गोळा केलेल्या सर्व डेटाचा वापर करून प्रति चौरस मीटर पिकाचे विश्लेषण करतात. २००५ मध्ये, ३३ लाख लोकसंख्येचा हा देश ९० लाख लोकांसाठी अन्न उत्पादन करत होता, आणि आज तो २ कोटी ८० लाख लोकांसाठी अन्न उत्पादन करतो!
उरुग्वेच्या या यशस्वी कामगिरीमागे देश, शेतकरी आणि पशुपालकांचा अनेक दशकांचा अभ्यास आहे. संपूर्ण कृषी क्षेत्रावर देखरेख ठेवण्यासाठी ५०० कृषी अभियंत्यांना तैनात करण्यात आले आहे, आणि ते ड्रोन व उपग्रहांच्या साहाय्याने शेतकऱ्यांवर लक्ष ठेवतात. जेणेकरून ते विहित शेती पद्धतींचा अवलंब करत आहेत याची खात्री करता येते. म्हणजेच, देशाच्या अनेक पटींहून अधिक लोकसंख्येसाठी धान्य, दूध, दही, तूप आणि लोणी यांचे उत्पादन करणे.
सर्व धान्य, दूध, दही, तूप आणि लोणी यांची सहजपणे निर्यात केली जाते आणि प्रत्येक शेतकरी लाखो रुपये कमावतो. एका व्यक्तीचे किमान उत्पन्न दरमहा १, २५, ००० रुपये किंवा वार्षिक १, ९०, ००० डॉलर्स आहे!!
या देशाचे राष्ट्रीय चिन्ह सूर्य आहे, आणि प्रगतीची राष्ट्रीय चिन्हे गाय आणि घोडा आहेत! उरुग्वेमध्ये गाय मारल्यास तात्काळ मृत्युदंडाची शिक्षा आहे! या गायप्रेमी देशाचे अभिनंदन!!
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व जनावरे भारतीय वंशाची आहेत, ज्यांना तिथे ‘इंडियन काऊ’ म्हणून ओळखले जाते!!
☆
लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात
प्रस्तुती : बिल्वा शुभम् अकोलकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




