सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? चित्र एकच.. विचार दोन… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

[ एक – झाड बोलाया लागले.. ]

शिशिर आला, पानगळ झाली 

तरी महत्व आले पानाला 

पुत्र मरे बापा आधी जाणून 

सांगा काय वाटत असेल झाडाला?

*
पिकले पान झाले, गळणारंच कधीतरी 

हीच शिकवण मानवाला द्यावी 

असेल का पानाच्या हृदयांतरी?

*

गळून पडले पान 

पण शाबूत औषधी गुण 

म्हणूनच गोळा करती पान न पान 

तेलरूपे ठेवती बाटल्या भरून ||

*

तसेच जगावे हे माणसा

घे तू छोट्या कृतीतून जाणून

मरावे परी कार्यरूपे उरावे

आदर्श द्यावा आठवांमधून ||

*

झाड परी सांगे जीव तोडून

जाऊ नका संकटांना घाबरून

जाणार हे पण क्षण निघोन

येणार सुख जीवनी वसंत होऊन ||

[ दोन – बागेतला बाक]

बागे मधला बाक एकला 

काय सांगतो जरा ऐक 

विसावली किती पिकली पाने 

गळून गेली करीत एक एक ||

*
झाडावरुनी मग गळली पाने

आठव सांगत विसावली थोडी

हळवी झाली मग ती ही वेडी

सांत्वन बाकाचे करीत धागे जोडी||

*

पिकल्या पानांच्या बाकावरुनी

चाललेल्या अनेक गप्पा

मागचे झाड ऐकत होते सारे

साक्षी ठेवत हृदय कप्पा||

*

गेली कित्येक पाने सोडून

बाक एकला रडू लागला

पान रूपी शब्द झाडाचे

आले धावून सांत्वनाला||

*
संगतीला कोणी नाही 

म्हणून उदास का व्हायचे?

कोणत्या रूपे देव येऊन

साथ देईल हेच आशेने बघायचे||

*

हसला बाक हळूच गाली

दुसरी पाने येतील कोणी

देव साथीला आहे विश्वास ठेऊनी

पानांना कुरवाळे सद्गतीत होऊनी||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
प्रज्ञा

खूप सुंदर ताई