सुश्री संध्या बेडेकर

? विविधा ?

☆ “ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

 सहजच मनातल शब्दात – जेष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे

ज्येष्ठत्व म्हणजे वय वर्ष ६० च्या नंतरचा काळ. आजकाल लाईफस्पॅन वाढले आहे. त्यामुळे हा काळ पण चांगला लांबलचक असू शकतो. फक्त थोडा वेगळा, म्हणजे आतापर्यंत व्यतीत केलेल्या काळा पेक्षा वेगळा.

श्रेष्ठत्व म्हणजे आपले काम /नोकरी, पद, हुद्दा यात वरच्या पायरीवर असणे.

ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे ही वाटचाल येथे याचा अर्थ, माझ्या मते त्यांच्या विचारांचा दर्जा, त्यांची वागणूक, त्यांचे एकंदर सोशल लाईफ, घरच्यांशी संबंध, तडजोड, समाजात त्यांचे वावरणे, समाजाप्रती त्यांची जबाबदारी मुख्यतः रिटायर्ड लाईफस्टाईल. कसे जगतात? या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो.

या सर्व गोष्टी ज्येष्ठांच्या श्रेष्ठत्वाचे मोजमाप करणारे पॅरामीटर्स आहेत.

वयाच्या साधारण पंचविसाव्या वर्षांपासून नोकरी करणारा माणूस किंवा स्त्री जेंव्हा वयाच्या अठ्ठावन किंवा साठाव्या वर्षी रिटायर्ड होते, तेंव्हा एक वेगळेच जग त्यांच्या समोर असत.

आता पर्यंत नोकरी, पगार, मानसन्मान, बिझी लाईफ, एक ठराविक दिनचर्या अचानक एक दिवस सर्व बंद होणार, ही गोष्ट सर्वांच्या बाबतीत खरी असली तरी पचायला जड असते. दिवसभर बाहेर राहण्याची सवय असल्याने, पूर्ण वेळ घरी राहणे जमत नाही. अचानक मिळालेला रिकामा वेळ कसा काढायचा? हा प्रश्न सोडविणे सोपं काम नाही. Post retirement manage करायला शिकावेच लागेल. दुसरा पर्यायही नाही.

या post retired management वरच तुमचे श्रेष्ठत्व अवलंबून असते.

एव्हाना घरातील चित्र ही बदलेले असते. घरात सून आलेली असते, मुल आपापल्या कामात बिझी असतात. खरं तर History Repeat होतं असते. दिवसभर घराबाहेर राहणाऱ्या ला आपलेच घर नव्याने दिसते. घरातील सकाळ ते संध्याकाळ पर्यंत घडणाऱ्या घटनांना तो प्रथमच दररोज बघत असतो. घरातील अगदी सामान्य घडणाऱ्या गोष्टी बघून घरातील प्रमुख व्यक्तीला म्हणजे मला आता दुय्यम स्थान मिळतय की काय? अशी शंका मनात येऊ शकते.

बाबा! तुम्हाला घरातच रहाचंय ना, मग घाई करू नका. थांबा जरा.

अहो! तुम्ही नंतर जा ना आंघोळीला.

जरा थोड्या वेळ थांबा. मुलांचे डबे झाले की देते चहा तुम्हाला.

अशी अगदी साधी वाक्यं जरी कानावर पडली तर ती मनाला लागतात.

आता नोकरी नाही ना मला, तर मला कोणी विचारत नाहीये, आता माझी या घरात किंमत राहिली नाही. आधी असं कधी कोणी काही म्हंटल नाही. हा एक निगेटिव्ह विचार तुमची मानसिक शांतता घालवू शकतो. विचारांची दिशा बदलू शकतो

असे विचार म्हणजे तुमची श्रेष्ठत्वाकडे वाटचाल नाही तर खडूस म्हातारा कॅटेगरीत आपली मेंबरशीप नोंदविण्याची तयारी तुम्ही स्वतः च करत आहात एवढं नक्की. आणि त्याबरोबरच पूढच्या संभावित कठीण दिवसांच्या दस्तावेजां वर तुम्ही स्वतः च सही करत आहात. हे लक्षात असू द्यावे.

जेष्ठत्वाबरोबर श्रेष्ठत्व सांभाळणे तेवढं सोपं काम नाही.

एका स्त्रीला हा काळ तेवढा कठीण नसतो कारण नोकरी करत असतानाही ती होम फ्रंट वर काम करत होतीच. फक्त सूनेबरोबर जमायला हवं. माझ्या पेक्षा लहान छान, हुषार, शिकलेली मुलगी माझी स्पर्धक नाही तर माझ्या बरोबर या घराची जबाबदारी घेणारी आहे. माझ्या मुलाची यापुढे मला काळजी करायची गरज नाही. आम्ही दोघी म्हणजे नवीन आणि जून्या चे combination आहे. मी पारंपरिक तर ती नवीन आधुनिक. मस्त मजा करू आम्ही. दोघी मिळून छान घर सांभाळू.

हा एक विचार सहजच तुमचा दर्जा वाढवेल.

बरे असो,

आयुष्याचा आतापर्यंतचा काळ व्यवहाराचा होता, जेष्ठत्वाचा काळ भावनांचा, नात्यांचा असतो. डोळ्यापुढे काहीही goal नसताना दिवस घालविण्यासाठी पुन्हा एकदा काही तरी नवीन करण्याचा, वेळेचे, कामाचे नियोजन करण्याची आवश्यकता असते..

I am retired from work not from Fun.

हे लक्षात ठेवून Rethink, Rebuild, Redesign करून पूढची जीवनशैली Reset करायची वेळ असते.

तुम्ही आपल्या नोकरीत किती ही हुषार, उच्च पदावर असला तरी ही post retirement management ची परीक्षा वेगळीच आहे, याचा सिलेबसही वेगळाच. यात Ego, Maths या विषयात नापास झाले तरच distinction मिळते. येथे व्यवहार नाही दृष्टीकोन महत्वाचा असतो.

आता घरचा प्रमुख असला तरी नवीन पीढी ला बरोबर समजून त्यांच्या बरोबर चालायची जबाबदारी असते. आता कधी सारथी, कधी senior advisor ची भूमिका करायची असते.

मी म्हणेन तेच, तसंच, मी बोलणार तुम्ही ऐका, I know everything असा हेकेखोर पणा जेवढा कंट्रोल मध्ये ठेवता येईल तेवढंच जीवन सुखकर होत. घरातील आणि घराच्या बाहेरही.

 तुम भी चलो हम भी चले, चलती रहे जिंदगी हा approach असावा.

लग्नानंतर नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर तुम्ही दोघे किती तरी वर्ष आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यातच बिझी होता. आपल्या अर्धांगिनी बरोबर quality time spend करण्याचे दिवस पुन्हा एकदा अनुभवायचे आहेत. सहजीवन पार्ट II पण मजेतच जगायचा आहे ना.

ते जाऊ दे

तुम्ही स्वतः तरी या आधी मनसोक्त स्ट्रेस फ्री आयुष्य जगला आहात का? वर्षानुवर्षे घड्याळाच्या काट्या कडे बघत दिवस काढले. किती तरी चांगले कार्यक्रम ऑफिस मध्ये महत्वाचे काम आहे म्हणून अटेंड केले नाही.. आजारी असतानाही महत्वाची मिटिंग आहे म्हणून ऑफिसात गेला आहात.

रिटायर्ड झाल्यावर घरचे वातावरण तर ऑफिस पेक्षा नक्कीच चांगले स्ट्रेसफ्री असणार आहे. येथे तुमचे स्पर्धक नाही तर तुमची आपली माणसं आहेत. येथे तुमचे पाय ओढणारे कोणी नसेल.

आज जेंव्हा ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे जायची तयारी करायची आहे, तेंव्हा या सर्व गोष्टींचा विचार करा आणि मग काय ते ठरवा. बिनधास्त जगण्याचा हा काळ आहे.

ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे जाताना खूप काही मोठे मेहनतीचे काम करायची गरज नाही. भारी वजन वगैरे उचलावे लागत नाही. शारीरिक कसरत नाही, पण मानसिक कसरत करायची गरज मात्र असते.. फक्त थोडासा वेगळा विचार करायची गरज आहे. सवयीत थोडे बदल करायची गरज आहे.

विचारांचे मॅनेजमेंट जमले तर, retired आयुष्याचे मॅनेजमेंट जमलेच म्हणून समजा.

थोडक्यात काय ज्येष्ठत्वात पाऊल टाकले की एक वेगळीच नियमावली तयार करायची असते. आता खडूस म्हातारा की graceful आजोबा कोणत्या संघात प्रवेश घ्यायचा हे स्वतः च ठरवायचे असते.

या नियमावली वरच तुमचं श्रेष्ठत्व अवलंबून असते. अशी नियमावली आयुष्यात बऱ्याच टप्प्यावर करावीच लागते. नोकरी लागल्यावर, घरी बाळाचा जन्म झाल्यावर.

मी असाच आहे. असं म्हणून चालणार नाही.

Growing old is mandatory but getting old is optional.

अगदी म्हाताऱ्या माणसारखं वागायची काहीच गरज नाही. म्हातारपण graceful पण नक्कीच असू शकत. आपले छंद जोपासण्याची हीच तर ती वेळ आहे.

स्वतः वर थोडे नियंत्रण ही ठेवावे लागते. आजपर्यंत घरची कामं केली नाही, पण आता वेळ आहे तर केली तर काय हरकत आहे.? तुमच्या मुळे कोणाला हातभार लागत असेल, मदत होत असेल तर काय हरकत आहे.?

भाजी चिरणे, कपडे मशीन मध्ये लावणे, सर्वांसाठी चहा करणे, नातवांना गोष्टी सांगणे, त्यांचा अभ्यास घेणे, त्यांना खेळायला बाहेर घेऊन जाणे.

म्हणतात ना

धुन बदलके तो देखो,

या सर्व कामांचा आनंद वेगळाच आहे.

मोठेपणा गाजवायचा नसतो तो वागण्यात दाखवायचा असतो.

तुमचा मुलगा सून तुमचे प्रतिस्पर्धी नाही. त्यांच्या भानगडीत जास्त पडू नये. सारखं टोकू नये. त्यांच्या खर्चावर लक्ष देऊ नका. नवीन जनरेशन आपल्या पेक्षा हुषार आहे, ते आपलं मॅनेज करतील पढे लिखे बुद्धु. असं कोणी म्हणायला नको असेल तर आपल्या पैशाचे व्यवस्थापनही व्यवस्थित करायला हवच. नटसम्राट चे उदाहरण मात्र लक्षात असू द्यावे.

नवीन जगात वावरताना रोजच्या नवनवीन होणार्या frauds बद्दल जागरूक रहाव लागेल.

घराबाहेरील जगाशी पण वागताना पुन्हा लक्षपूर्वक माईंडसेट तयार करावा लागेल.

तेथे तर वेगवेगळ्या लोकांशी संबंध येणार आहे. बोलण्यापेक्षा ऐकण्याचे काम केले तर समोरच्या व्यक्तीला समजणे सोपे होते. समजदार व्यक्ती खूप ज्ञानी आणि मुर्ख व्यक्ती समोर शांत बसतो. भाजीवाला, रिक्षा चालकांनी हुज्जत घालण्यापेक्षा त्याला चार पैसे जास्त दिले तर हरकत नाही. कोणाचे काही चांगलं दिसलं तर कौतुक करायची सवय लावावी. त्यांना तर आनंद होतोच, आपल्याला पण चांगलं वाटतं.

लोकांना माझी गरज आहे की नाही माहीत नाही पण मला लोकांची गरज आहे.

हा एक विचार मनात ठेवला तर सर्वांबरोबर सहज जमत.

जेष्ठ नागरिक संघ, वाचक मंच, आपल्या आवडीनुसार यांचे सदस्यत्व घेतले तर आपोआपच चार लोकांशी ओळख होते, तुम्हाला पण तुमच्या सुप्त इच्छा पूर्ण करायची संधी मिळते. यासर्व गोष्टींमध्ये स्वतः पूढाकार घ्यावा लागतो.

एकंदरीत वाढत्या वयाबरोबर ज्येष्ठत्व तर आपोआपच मिळत, श्रेष्ठत्व मिळवायला स्वतः चे प्रयत्न करावे लागतात. मानसिक स्वास्थ्यासाठी पण हे गरजेचे असते.

म्हणतात ना,

संसार को बदलने की कोशिश मत करो, स्वयं को बदलो.

रस्त्यावर दगड असले तर आपण रस्त्यावर कार्पेट नाही टाकत, पायात चपला घालतो.

तुमच्या आयुष्यात आनंदी राहण्याची जबाबदारी तुमची स्वतः ची आहे. आपल्या आयुष्याची किल्ली दुसऱ्याच्या हातात कधीच देऊ नये.

आपल्या मनात, सवयीत, वागणुकीत असे विचार ठेवले तर सहजच

हे आजोबा आपले ज्येष्ठत्व छान सांभाळतात. मी पण म्हातारा झालो की असंच वागणार. असे comments नक्की मिळतील.

You will set an example for others.

सिर्फ सूरज के निकलनेसेही सवेरा नहीं होता।

विचारों के बदलनेसे भी नया दिन / नया दौर शुरू होता है।

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments