सुश्री मंजिरी येडूरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ निसर्ग ☆ सौ. मंजिरी येडूरकर

मज दावितो निसर्ग, रोज वेगळेच भास

शाळाच भरवितो जणू, ऋतूंचीच खास

*

येता वसंत कोकिळ, खुलवितसे शिवार

येईल पानोपानी, फुलवेलींना बहार

*

बेचैन होतसे मी, ग्रीष्मातल्या झळांनी

बसलाय शुष्क चातक, चोचीस फुलवोनी

*

चैतन्य देई वर्षा, नटली वसुंधरा ती

उघडे निळा पिसारा, मन मोर नाचताती

*

आकाश स्वच्छ होता गीत रंगले खगांचे

शरदात पांघरते, नभ वस्त्र चांदण्यांचे

*

बोचऱ्या हिवाचा, नको पहाटेस स्पर्श

हेमंत येई घेऊनि, शेकोटीचा ग हर्ष

*

अति रुक्ष पानगळ, शिशिरात होतसे ती

अंकुर नाही डोई, तरी वृक्षास नाही भिती

*

वाट पाहतो हा, उरी घेऊनि मनिषा

येईल पुन्हा वसंत, बहरेल माझी आशा

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments