सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
डॉ. शैलजा करोडे
💐 अ भि नं द न 💐
मराठी भाषा विभाग , महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ, मुंबई, यांच्या अनुदानातून जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळाने आयोजित केलेल्या ‘ ग्रामीण युवा साहित्य संमेलन’ या दोन दिवसीय संमेलनात आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. शैलजा करोडे यांच्या ” निशिगंध ” या ललित लेख संग्रहास ” उत्कृष्ट ग्रंथ ” पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. डॉ. शैलजा करोडे यांचे हे २५ वे पुस्तक आहे.
तसेच, ‘ समाज चिंतामणी प्रतिष्ठान, जळगाव ‘ आयोजित दुसऱ्या अखिल भारतीय online साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून शैलजाताईंना आमंत्रित केले गेले आहे.
या दुहेरी सन्मानाबद्दल ई-अभिव्यक्ती (मराठी) परिवारातर्फे शैलजाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि त्यांच्या यापुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !💐💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







