श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ कोण्या एकाची जीवनगाथा… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

“कही दूर जब दिन ढल जाए… “

ही ओळ कानावर पडली आणि मला आनंद सिनेमा आठवला…

राजेश खन्ना आणि त्याचा अजरामर संवाद…!

“जिंदगी बडी होनी चाहिए.. 

लंबी नहीं…!! “

विचार केला तर सहा शब्दांचा संवाद, पण त्यात साऱ्या जन्माचं सारं…

मध्ये एक वाक्य वाचनात आले…

 

येणारा पुढील प्रत्येक श्वास म्हणजे वाढदिवस…

त्या दिवशी हे गीत आठवले नाही, पण हे गीत ऐकल्यावर ते वाक्य आठवले…

जिंदगी बडी करायची असेल तर आयुष्यातील प्रत्येक श्वासाचे मोल जाणले पाहिजे…

विश्वास आहे तो पर्यंत श्वास आहे…

त्याचा आपल्यावरील विश्वास संपला की तो आपले श्वास संपवतो…

ज्याप्रमाणे क्षणा क्षणाने आयुष्य बनते, तसे श्वासा श्वासाने जीवन बनते असे म्हणता येईल…

प्रत्येक श्वास आणि प्रत्येक क्षण आनंदानें व्यतित करता आला तर…

सर्व महान व्यक्तींनी हेच सुचविले आहे…

– — मी जगायला सुरुवात केली…

….. एक पथिक.

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted