सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
✒️ प्रा. सुनंदा पाटील ✒️
🌺 अ भि नं द न 🌺
आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री सुनंदा पाटील यांना मुंबईस्थित ‘सर्वद फाउंडेशन‘ या प्रसिद्ध संस्थेतर्फे “ स्टार लेखिका “ हा सन्मानजनक पुरस्कार नुकताच प्राप्त झालेला आहे. सुनंदाताई या कवयित्री, कादंबरीकार, कथालेखिका आणि गझलकार म्हणून साहित्यक्षेत्रात परिचित आहेत. ‘गझलनंदा‘ या नावाने गेली ५० वर्षे त्या गझल-लेखन करत आहेत.
या पुरस्काराबद्दल सुनंदाताईंचे आपल्या सर्वांतर्फे हार्दिक अभिनंदन, आणि यापुढील अशाच उत्तम आणि यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.💐
आजच्या ‘ मनमंजुषा ‘ सदरात वाचूया त्यांचा एक छान लेख.
संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती मराठी
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈





