श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३४१
☆ काळाचा महिमा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
उभा ठाकला भिंतीवरती
कक्षेमधेच काटे फिरती
*
वेगेवेगे कुणी धावतो
कुणी असा का हळू रांगतो
*
सेंकदाचा वेग भयंकर
तोच चालतो येथे भरभर
*
पुढे सरकतो हा मिनिटाने
कधी न जमले यास धावणे
*
याला नसते कधीच घाई
तासानंतर हलतो बाई
*
काळाचा या महिमा भारी
त्याच्या सोबत दुनिया सारी
*
आनंदाने तिघे भेटले
अन बाराचे टोल वाजले
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





