श्री प्रमोद वामन वर्तक
चित्रकाव्य
वेडी वल्ली..
श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
अंगापेक्षा बोंगा जड
पण हौस बघा बाळाची,
उंची एवढी बॅट घेऊन
पोज चेंडू टोलवायची!
*
खेळा पुढे भान नाही
आहोत आपण नग्न,
झाले जणू जन्मताच
याचे क्रिकेटशी लग्न!
*
सांगे चमक डोळ्यातली
टाकला जरी बाउन्सर,
ही क्रिकेटची वेडी वल्ली,
लगेच मारेल सिक्सर!
*
आहे भविष्य उज्वल
याच खेळाचे भारतात,
बाकी मैदानी खेळ मग
अशाने मागे पडतात!
अशाने मागे पडतात!
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





