श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ उच्च अभिलाषा… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
अंतरी मनाला अक्षरे फुटली
उत्फुर्त या शब्दांचे भानच सुटले
कवणे उधळीत स्वैर भावकल्प
लेखणी दौडता प्रतिभेत नटले.
*
प्रेमळ क्षणांना पंक्तितच बांधून
सुख-दुःखाला चिंतनात साधता
कविता झाली जगण्यावरची व्यथा
आयुष्य होई काव्य ज्ञान शोधता.
*
नभ कधी डोळ्यांतील घन मोती
अक्षरातून झाली दिव्य निर्मीती
चिंतन लहरी ज्या आत्मविवेकी
जसा समुद्र प्रवाह तीर ख्याती.
*
कवी न राहिला शब्दांचा जरी आता
पैलतीरी एक तेजोमयाची गाथा
अंतर्ज्ञानी चैतन्य कविता-कविता.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





