रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ही जलपर्णी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वृत्त : शुभगंगा (८+८+६=२२)+ उद्धव(२+८+४=१४))

☆

ही जलपर्णी भासतसे मनहरणी

मनमोही ही जलपर्णी ||ध्रु||

 

कोणी म्हणती ही आहे बहु भयहारी

अन् जीवन संपवणारी 

पण ऐका जन हो आहे ही गुणकारी

जल शुद्ध शुद्ध करणारी ||१||

 

जांभुळलेल्या पुष्पांभवती हे सादर 

ते मोरपिस जणू सुंदर 

ही फुलवंती शोभतसे मनहारी

पर्णावर शोभा सारी ||२||

 

गढुळले पहा जलाशयाचे पाणोठे 

ही उगवत जाते तेथे

पाण्यावरती पखरण घालत फिरणारी

जांभळी जांभळी न्यारी ||३||

 

जलवेली या नावे कोठे ओळखती

जलकुंभी नामे गणती

निर्माण किती कलाकृती करणारी

पान खोड जादुगारी ||४||

☆

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted