श्री प्रमोद वामन वर्तक 

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? एक दिसाचे आयुष्य तरी… ? श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

रंग माझा शुभ्र पांढरा 

देठ छोटा गर्द भगवा.

परिसीमा नाजूकतेची

सुगंध वाटे हवा हवा!

*

मला आणिले श्रीहरीने 

या धरेवर स्वर्गातुनी.

सत्यभामा रुक्मिणीचा 

रंगला वाद मजवरुनी!

*

खुडत नाहीत मजला 

जातो सडा टिपला.

होता अर्पण प्रभूचरणी 

जन्म सार्थकी लागला!

*

रस माझा बहुउपयोगी 

मात करी हृदरोगावर.

होता कोरडा खोकला 

पळवी त्यास तो सत्वर!

*

एक दिसाचे आयुष्य 

घेते आनंदाने जगून.

जगतांना साऱ्या जगा 

जाते बरेच शिकवून!

जाते बरेच शिकवून!

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted