उज्वला सुहास सहस्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ अकल्पित… ☆ उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
☆
पावसाच्या रिमझिम धारा.
अकाली भिजवती सृष्टीला!
कोणता हा ऋतू साजरा.
हिवाळा की पावसाळा!
*
झिमझिमती रात्र सारी.
ओल्या थंडी ची गंमत न्यारी!
शेकोटी ची ऊबही नाही!
आगळी सृष्टी द्रुष्टीस दिसे ही!
*
ऋतुचक्रातील बदल हा.
अचंबित करी मनाला!
मनाप्रमाणे ऋतुचक्र ही.
बदलते का क्षणाक्षणाला!
☆
© उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈




