श्री मोहन निमोणकर
वाचताना वेचलेले
☆ “किंमत … मताची” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
एक उमेदवार मत मागण्यासाठी एका म्हाताऱ्याकडे गेला आणि 1, 000 रुपये धरून म्हणाला ” बाबाजी कृपया मला यावेळी मत द्या. “
बाबा जी म्हणाले:
” बेटा, मला पैसे नकोत पण तुला मत हवं आहे तर मला गाढव विकत घेऊन दे ! “
उमेदवाराला मते हवी होती, तो गाढव विकत घेण्यासाठी बाहेर पडला,
पण 40, 000 पेक्षा कमी किमतीचे गाढव सापडले नाही,
म्हणून परत आला आणि बाबाजींना म्हणाला:
” मला वाजवी किंमतीत एकही गाढव सापडले नाही, गाढवाची किंमत किमान 40, 000 आहे, म्हणून मी तुम्हाला गाढव देऊ शकत नाही पण मी 1, 000 देऊ शकतो ! “
बाबाजी म्हणाले:
” साहेब, मला आणखी लाजवू नका, तुमच्या नजरेत माझी किंमत गाढवापेक्षा कमी आहे,
जेव्हा गाढव 40, 000 पेक्षा कमी विकले जात नाही, तेव्हा मी 1, 000 ला कसा विकला जाऊ शकतो ! “
लेखक : अज्ञात
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈