सुश्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ८ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
आजच्या आठव्या भागात गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपल्या नावाची नोंद करणाऱ्या दुर्गा
१) ज्योती आमगे – वजन आणि उंची सर्वात कमी .. म्हणजे अपवादात्मक असणारी मुलगी .. ह्या नागपूरच्या मुलीने 18 वर्षाची असताना हा विक्रम नोंदवला. त्यावेळी तिचे वजन 11.2 पाउंड होते व उंची 24.7 इंच होती.
२) कलामंडलम हेमलता — या केरळच्या महिलेने सहा जानेवारी २०११ रोजी मोहिनीअट्टम या प्रकारचे नृत्य १२३ तास १५ मिनिटे सलग सादर केले. (सिंगल डान्स मॅरेथॉन)
३) ताशी व नुंगशी मलिक — डेहराडून मधील या जुळ्या बहिणींनी वयाच्या 23 व्या वर्षी एव्हरेस्ट सर केले, सात खंडातील सात सर्वोच्च शिखरे सर केली, व उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर स्कीईंग केले.
अशाप्रकारे एक्सप्लोरर्स ग्रँड स्लॅम व थ्री पोल्स चॅलेंज पूर्ण करून ग्रीनिज बुक मध्ये स्थान पटकावले.
४) कल्पना बालन–तामिळनाडूची ही सर्वात जास्त म्हणजे ३८ दात असणारी एकमेव महिला ठरली.
५) प्रीती मस्के –ही पुण्याची असून २२ दिवसात सुवर्ण चतुर्भुजावर सायकल चालवणारी वेगवान महिला ठरली… (सुवर्ण चतुर्भुज म्हणजे दिल्ली ते कोलकत्ता ते मुंबई ते चेन्नई ते दिल्ली असा महामार्गाचा चौकोन एकूण ६०००कि.मी. चा)
६) मिशेल काकडे–४७ वर्षीय पुण्याच्या महिलेने सुवर्ण चतुर्भुज पायी चालत १९३ दिवस १ तास ९ मिनिटात सर्वात जलद पूर्ण केला.
७) सुफिया सुफी— दिल्लीच्या या महिलेच्या नावावर बरीच रेकॉर्ड्स आहेत.
१.सुवर्ण चतुर्भुज धावत तिने ११० दिवस २३ तास २४ मिनिटात पूर्ण केला.
२.काश्मीर ते कन्याकुमारी सर्वात जलद ८७ दिवस २ तास १७ मिनिटात धावली.
३.२०१८ या एका कॅलेंडर वर्षात सगळ्यात जास्त अंतर मॅरेथॉन पळाली.
४.मनाली ते लेह पायी ४८५ किमी अंतर ६ दिवस १२ तास ६ मिनिटात पूर्ण केले.
५.उत्तर ते दक्षिण (ॲक्रॉस कतार) २०० किलोमीटर अंतर ३० तास ३१ मिनिटात पूर्ण केले.
८) आलिया सिद्दिकी –चेन्नईच्या या सोळा वर्षीय महिलेने ४ मिनिट ४७ सेकंदात अबॅकस गणित सोडवण्याचा विक्रम केला.
९) श्रेया देशपांडे— या पाच वर्षाच्या मुलीने २७ कार्सच्या खालून, ४८.२ मीटर अंतर स्केटिंग करत पार केले.
१०) लता टंडन-– मध्य प्रदेशातील रेवा येथील पाक कुशल महिलेने न थांबता ८७ तास ४५ मिनिटे खाद्य पदार्थ बनविले.
११) स्मिता श्रीवास्तव –प्रयागराज च्या या महिलेने सगळ्यात लांब केस असण्याचा विक्रम केला आहे. तिच्या केसांची लांबी ७ फूट ९ इंच आहे. १४ वर्षाची असल्यापासून ४६ वर्षाची होईपर्यंत तिने एकदाही केस कापले नाहीत.
१२) लैबा बासित— या बारा वर्षाच्या लेखिकेने ‘order of the galaxy’ हे पुस्तक सलग तीन भागात प्रकाशित करून सर्वात तरुण लेखिकेचा मान मिळवला आहे .
१३) नंदिनी अग्रवाल –या मध्य प्रदेशातील मुरेना शहरातील महिलेने १९ व्या वर्षी सीए ही पदवी प्राप्त करून सर्वात कमी वयाची सीए होण्याचा मान मिळवला आहे.
१४) पुलपाका सुनीता –आंध्र प्रदेशच्या या गायिकेने गेल्या ६० वर्षात सहा पेक्षा जास्त भाषांमध्ये सोलो,ड्युएट, कोरस बॅक्ड व शीर्षक गीते अशी एकूण १७६९५ गाणी गाण्याचा विक्रम केला.
१५) विजया निर्मला— हैदराबादच्या रहिवासी असणाऱ्या तमिळ सिनेमा मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री, निर्माता व दिग्दर्शक महिलेने २००२ पर्यंत सर्वात जास्त म्हणजे ४४ पूर्ण वेळेच्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.
१६) रोशना दिलीफ –या केरळमधील कोझिकोडच्या मुलीने M.A.Yusuf या प्रसिद्ध उद्योजकाच्या जीवनावर ‘द बिलियन डॉलर जर्सी’ या नावाच्या कथेची कार्टून स्ट्रीप तयार केली आहे. २०२२ चे ४३० मीटर लांबीच्या कार्टून स्ट्रीप चे तिने रेकॉर्ड केले व २०२१ चे ४०४ मीटर लांब कार्टून स्ट्रीपचे स्वतःचेच रेकॉर्ड मोडले.
१७) जान्हवी जिंदाल— चंदिगडच्या या मुलीने अठरा वर्षाखालील गटात एकाच वेळी स्केटिंग मध्ये पाच रेकॉर्डस् केली.
- एका चाकावर 360 डिग्री स्पिन, 30 सेकंदात 42 स्पीनस्
- एका चाकावर 360 डिग्री स्पिन, एका मिनिटात 72 स्पिनस्
- Consecutive एका चाकावर 360 डिग्री स्पिन ,32 स्पिनस्
- Slalom 20 cones on two wheels, 8.85 seconds.
- 360 degree rotations on in line skates, in 30 seconds 27 spins.
१८) जेसिका –तामिळनाडूच्या या मुलीने हेड स्टॅन्ड स्थितीत असताना एका पायावर हुला हुपच्या सर्वाधिक २१३ प्रदक्षिणा एका मिनिटात करून विक्रम नोंदविला.
– क्रमशः भाग ८
☆
संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈










