मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मधुमासी तू धुंद मोगरा… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मधुमासी तू धुंद मोगरा… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

[वृत्त – सूर्यकांत (समुदितमदना), मात्रा- 8+8+8+1+2=27]

चैत्र बहरला तुझ्या रुपाने वसंत उत्सव घडे

मधुमासी तू धुंद मोगरा सुगंध मज आवडे||ध्रु||

*

मोहरताना वेलीवरती रूप देखणे वसे 

पानोपानी शुभ्र धवलसे जणू ठेवले ठसे 

वात येवुनी छेड छेडतो अत्तर फाया उडे

मधुमासी तू धुंद मोगरा सुगंध मज आवडे ||1||

*

गुंडूमलई कुणी मोतिया, वसई नाम तुजला 

हृद्यगंध मज सुखावणारा मदनबाणी सजला 

बटमोगऱ्यात गंध वेढतो वेलीवर सापडे

मधुमासी तू धुंद मोगरा सुगंध मज आवडे ||2||

*

ज्ञानेशाने अभंगातुनी मान दिला रे तुला

कवनांमधुनी तुला लाभला शब्द फुलांचा झुला

मकरंदाला तुझ्या चाखण्या मिलिंद बघ बागडे

मधुमासी तू धुंद मोगरा सुगंध मज आवडे ||3||

*

संनिध तुझीया देव देवता सुखावती साजरे

नवरी सजली फुलवंतीने रूप तिचे लाजरे 

वेलींवरच्या धुंद तारका चमचमणारे खडे 

मधुमासी तू धुंद मोगरा सुगंध मज आवडे ||4||

*

कुंतलात मी तुला माळले शोभा रे वाढली

कवितेमधुनी शब्दफुलांनी दृष्ट तुझी काढली

झिरमिर येता ग्रीष्माची सर रूप फुले तव् गडे 

मधुमासी तू धुंद मोगरा सुगंध मज आवडे ||5||

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अनोखी प्रेमकहाणी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? अनोखी प्रेमकहाणी… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

किती हिरवाईने सजली पायवाट 

कधी सरळसोट कधी कठीण घाट 

*

तिला खुणावे तो रहदारीचा रस्ता 

जिथे गलबलाट अन गोंगाट नुसता 

*

भूल पडली मग भोळ्या पायवाटेला 

गळामीठी घालू त्या हमरस्त्याला 

*

रस्त्यालाही आकर्षण त्या पायवाटेचे 

मनात असूनही पाय वळले ना त्याचे 

*

भोळी पायवाट मिलना आतुरली 

काट्या कुट्यातून चढ उतारांनी धावत सुटली 

*

दिसताच हमरस्ता बहु आनंदली

आतुरतेने घट्ट मीठी त्यास घातली

*

क्षणिक मिलन त्यांचे वाट सुखावली

रस्त्यास ना वेळ लगेच पुढे धाव हो घेतली

*

वेडी पायवाट तिथे स्तब्ध झाली

तिथे त्याची वाट पहात राहिली

*

पायवाट हमरस्त्याची अनोखी प्रेम कहाणी

सांगते सकल जना ही प्रेम दिवाणी

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सादर प्रणाम!! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सादर प्रणाम!! ? श्री आशिष  बिवलकर ☆

तीर्थ अंदमान | जिथे झाली सजा |

तिथे आता पूजा | क्रांतीसूर्या ||१||

*

मातृभूमी तुज | तन मन धन |

अर्पिले जीवन | सर्वार्थाने ||२||

*

सेल्युलर जेल |काळे पाणी शिक्षा | 

राष्ट्रयज्ञ दिक्षा | क्लेशदायी ||३||

*

अंधार कोठडी | रोज काथ्याकूट |

शिक्षेचा मुकुट | शिरावरी ||४||

*

फिरवून कोलू | तीस पौंड तेल |

शृंखलांचा वेल | देहावरी ||५||

*

राष्ट्रासाठी त्याग | तरी उपेक्षित |

गंधर्व शापित | विनायक ||६||

*

तात्याराव तुम्हां | सादर प्रणाम |

उपेक्षा विराम | शुभ दिनी ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कळतच नाही… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कळतच नाही… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

कळतच नाही मतदाराला

कोणता झेंडा घ्यावा हाती

नेम नाही उमेदवाराचा आता

कोणत्या पक्षात कोण जाती!

*

देशभक्ती अन देशप्रेम हे

उमेदवारा असते वा नसते

सत्ता मिळविणे अन भोगणे

प्राधान्य केवळ हेच असते!

*

मतदार आता शहाणा होवो

व्यक्ती नव्हे देशभक्ती पाहो

जाती, भाषा, धर्मापलीकडे

देशहिताचाच विचार होवो!

*

 जाती, भाषा, धर्मापलीकडे

 देशहिताचाच विचार होवो!!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ देखणी कर्दळी… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? देखणी कर्दळी… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

भावगीत- (वर्ण संख्या 14, यती 8 व्या अक्षरावर)

आज माझ्या परसात उमलली कळी

पोपटल्या पानामध्ये देखणी कर्दळी ||ध्रु||

*
सोनकिरणात हिचे रूप दिसे भारी

मोगऱ्याच्या शेजारीच बहरली सारी 

कुठे लाल लाल दिसे मधेच पिवळी 

पोपटल्या पानांमध्ये देखणी कर्दळी||1|| 

*
झिरमिर पावसात दवबिंदू सारे

पाकळीला झोका देती हलकेच वारे

गुलाबी रंगात तिची छबीचं कोवळी

पोपटल्या पानांमध्ये देखणी कर्दळी||2||

*

वसंतात हेमंतात शरदात येते

बारामाही फुलणारी औषधही देते

गणेशाच्या मुकुटास रक्तीम पाकळी

पोपटल्या पानांमध्ये देखणी कर्दळी||3||

*
देवकेली म्हणतात केळेफुल हिला

नैवेद्याच्या पानासाठी मानचं पहिला

हिला पाहताच माझ्या पडे गाली खळी

पोपटल्या पानांमध्ये देखणी कर्दळी||4||

*
गंध नाही तरीपण रंगाची झळाळी

शब्दांमध्ये गुंफताना आली ना नव्हाळी

पुष्पहार कवनाचा माउली सावळी

पोपटल्या पानांमध्ये देखणी कर्दळी||5||

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – जगणे व्हावे मंगलगाणे – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – जगणे व्हावे मंगलगाणे – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

दगडांच्या फटीत मिळाली 

जागा त्या बीजाला रुजायला 

आनंदाने तिथेच रुजले 

खुशीत लागले डुलायला ||

*
स्वधर्म नाही विसरले ते

रुजणे आणि फुलून येणे 

क्षणिक जीवनाचे सार्थक 

सौंदर्यासह सुगंध देणे ||

*
इवलासा जीव शिकवतो 

परिस्थितीवर मात करा 

जगणे व्हावे मंगल गाणे 

देवऋणाला सदैव स्मरा ||

*
प्रतिकुलता नको निराशा 

सर्वस्वाने लढत रहावे 

जिद्द शेवटी फळास येते 

इवल्या बिजा अनुसरावे ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ || मतीचे दिवाळे… || ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? || मतीचे दिवाळे… || ? श्री आशिष  बिवलकर ☆

कावीळीची बाधा | झालीय जयासी |

पिवळे तयासी | दिसे सर्व ||१||

*

दृष्टीदोष ऐसा | सारेचं पिवळे |

मतीचे दिवाळे | जगा लेखी ||२||

*

जगरहाटीचा | भुले व्यवहार |

ऐसा अहंकार | व्यर्थ सारा ||३||

*

अहंकार नासे | पूर्व पुण्यकर्म |

निंदा होई धर्म | आचरणी ||४||

*

शिव्या शाप रुपी | मुखातून वाणी |

विचारेना कोणी | स्थिती ऐसी ||५||

*

अविवेक बोल | येई ऐसे मुखी |

आप्त सखे दुःखी | तया परी ||६||

*

शहाण्यास असे | शब्दातून मार |

त्यागावा विचार | आत्मघाती ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ये फुली तू सदाफुली गं… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ये फुली तू सदाफुली गं… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

ए फुली तू सदाफुली गं 

फुलत रहा राणी

तुझ्या रुपावर भाळ-भाळले 

गाते बघ गाणी 

*

इथे तिथे तू माझ्या दारी 

आपोआप आली

नाही घेतली काळजी तरी 

बहरे तव् लाली

*

शुभ्र धवल आणि गोड गुलाबी

पाकळीत झाली 

निलवंती तू नभांगणाचे 

रंग जणू प्याली

*

सुगंध नाही तुला तरीपण 

औषध तव ठाई

तुझ्या रूपाने बहरत जावी

सारी वनराई   

*

पाच पाकळ्या तुझ्या साजऱ्या 

कधी जांभळ्या लाल

धरणी वरती जणू भासते 

फुलाफुलांची शाल 

*

कंच हिरव्या पानांमधुनी

डोकावून तू हसशी

कवितेमधली शब्द पाकळी

सदाफुली तू दिसशी 

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निळ्या ओळी आणि क्रूस ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ निळ्या ओळी आणि क्रूस ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

काही उतरता मनातलं

सरळ निळ्या ओळींवर,  

होतो एक कोपरा रिता

ठसठसणारा कागदावर !

*

मग वाटे मम मनाला

ते झाले हलके पिसापरी,

पडता बाहेर साऱ्या वेदना 

ज्या जपल्या होत्या उरी !

*

पण येई उगाच मनात 

विचार निळ्या ओळींचा,

होत असेल का त्रास

त्यांना माझ्याच वेदनांचा ?

*

पण विचार करता पटले 

जो तो भोग घेऊन जन्मतो,

वाटले जरी मजला वाईट 

जो तो आपला “क्रूस” वाहतो !

जो तो आपला “क्रूस” वाहतो !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ || डू नॉट डिस्टर्ब… || ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? || डू नॉट डिस्टर्ब… || ? श्री आशिष  बिवलकर ☆

चालून चालून | वाघोबा दमला |

झोपेत रमला | शांत आज ||१||

*
डू नॉट डिस्टर्ब | दिली आहे तंबी |

एक किमी लंबी | केली चाल ||२||

*

लबाड लांडगे | सगे सोबतीला |

कुटुंब कबीला | बछड्यांचा ||३||

*
वृद्ध हत्ती आला | डोलत डोलत |

अस्पष्ट बोलत | ‘फ’ची भाषा ||४||

*
वाघासंगे होते | कोल्हे कुत्रे ससे |

भोंगा नाही दिसे | नेहमीचा ||५||

*
बासनात गेला | भोंग्याचा गोंगाट |

नका लावू वाट | सर्कशीची ||६||

*
सुखी शांत निद्रा | वाघोबाचा थाट |

पहा आता वाट | उठायाची ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares