मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अक्षर स्पर्श… ☆ सुरेखा चिखलकर ☆

सुरेखा चिखलकर

? कवितेचा उत्सव ?

☆ अक्षर स्पर्श… ☆ सुरेखा चिखलकर ☆

नजरेचा स्पर्श व्हावा

अक्षरांनी जन्म घ्यावा,

जणू क्षणांच्या साखळ्या

कागदावर विसावा…

​उघडावी पांघरूण

पानं ओठी हसू देई,

जणू दडलेलं दुःख

पानांनी हलकं होई…

 *

​दीर्घ विरहानंतर

वितळून जावे ओझं,

मनातील पानात या

जतन केलेले गूज…

 *

​काटे वेळेचे मोजले

दिस-रात्र सोबतील,

अक्षरांना गंध आला

शब्द पुन्हा फुलतील…

 🙏 

© सुरेखा महिपती चिखलकर

गोटखिंडी, तालुका वाळवा

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कल्पवृक्ष… ☆ प्राची अभय जोशी ☆

प्राची अभय जोशी

?️? चित्रकाव्य ?️?

? कल्पवृक्ष… ? प्राची अभय जोशी ☆

 प्राजक्त भामेच्या दारचा

 हळूवार अलगद उमलला

*

त्याचा पसाभर सडा मात्र

 रुक्मीणीच्या अंगणी सांडला..

*

प्राजक्त वेचला कितीही ढिगाने

 तरी तो काट्यावर नाही तोलला 

*

त्याच्या नाजूकपणाचा त्याने

 कधीच बाजार नाही मांडला…

*

प्राजक्त असा असावा अंगणी

 कृष्णाच्या कथेची अशी महती

*

त्याच्या फुलण्या उमलण्यातच

 श्रीकृष्णाची दडलेली भक्ती…

*

प्राजक्ताचा असा सुवासिक वृक्ष

 त्याचे खरे स्थान तर स्वर्गातच 

*

इंद्रदेवाचे आहे हे तेरावे रत्न

 स्वर्गीय आनंदाचा निखळ स्त्रोत

*

प्रत्येकाच्या मनी वसलेला मात्र

 हा एक कल्पवृक्ष 

 हा एक कल्पवृक्ष…

©  प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पारिजातक… ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पारिजातक... ? शालिनी जोशी 

 पारिजातक पुष्प लहान

 परी असे कीर्ति महान 

*

 त्रिलोकांचा प्रवास तरुला 

 समुद्रमंथनातून इंद्र वनाला

*

 श्रीकृष्णाने भूलोकी आणिला

 सत्यभामेचा स्त्री हट्ट पुरविला

*

 शुभ्र पाकळ्यात सुगंध साठा 

 केशरी रंग खुले नाजूक देठा

*

कळ्या रात्रीच्या चांदण्या झाडावर 

 सकाळी केशरी पांढरा सडा भूवर

*

 भरल्या तबकी खुले मोहकपण

 हात न लावता जपा कोमलपण

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पहाट… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पहाट… ☆ राधिका भांडारकर ☆

(उद्धव वृत्त २-८-४)

 दिनमणी अंबरी येतो

विहगांचा कलरव होतो

राऊळी घंटा घुमते

ती पहाट सुंदर असते..

*

 ते दव पाती ओघळते

भासती जणू मोती ते

दाटते धुकेही शिखरी

ती वाट दिसेना नजरी..

*

 केशरात न्हाते प्राची

किरणे हिरण्यगर्भाची

दिन नवा आणतो आशा

 तिमिरातुनी ने प्रकाशा ….

*

 गोठ्यात गाय हंबरते

पाडसे सडांशी लुचते..

अंगणी फुलसडा सांडे

वृंदावनी तुळस नांदे

*

ही पहाट ऊर्जा देते

मज ध्येयापाशी नेते

ते थकणे सारे नुरते

 मन पुन्हा एकदा स्फुरते

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अल्पायुषी कारवी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? अल्पायुषी कारवी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत (वर्ण संख्या १६, यति ८ व्या अक्षरावर))

सप्तवर्ष तप हिचे आठव्यात येती फुले 

अल्पायुषी कारवी ही पश्चिम घाटात खुले ||ध्रु||

*

निळ्या जांभळ्या रंगाची पठार व्यापत जाते

आकाशाशी जीव जडे मातीशी अतूट नाते

माळ कारवी साजरी कळ्या फुलांवर डुले 

अल्पायुषी कारवी ही पश्चिम घाटात खुले ||१||

*

जांभुळली फुलराणी एकदाच फुलणारी

नीलमणी अंगावर पानासंगे झुलणारी

फनेलच्या आकाराची नाजूकशी कानडुले 

अल्पायुषी कारवी ही पश्चिम घाटात खुले ||२||

*

थंडीमध्ये लपेटली भुमीने शाल बरवी 

कोणी म्हणती बकरा कोणी टोपली कारवी

हिच्या रूपाची मोहिनी मम् काव्यातून झुले

अल्पायुषी कारवी ही पश्चिम घाटात खुले ||३||

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – पावसाचा पदन्यास – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – पावसाचा पदन्यास – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

झाडे दुतर्फा रंगीत 

साज खुलतो रस्त्याचा 

पडणाऱ्या जलधारा 

भास जाहला तळ्याचा ||

*
पाणी जाहले रंगीत 

शोभिवंत प्रतिबिंब 

वेडावुनी झेपावती 

वेगे नाचणारे थेंब || 

*

टपटप लयबद्ध 

आले नाचऱ्या अंगाने 

नक्षी मोहक खुलते 

जळावरी या नृत्याने ||

*

चित्र देखणे रेखिले 

निसर्गाने सौंदर्याचे 

न्याहाळीता अदाकारी 

भान हरपे मनाचे ||

*

पावसाचा पदन्यास

मन चिंब चिंब होई 

लय लाभते मनाला 

आनंदाने गाणे गाई ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३२३ ☆ मुखवटा… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३२३ ?

☆ मुखवटा ☆  प्रभा सोनवणे ☆

सखी, तू जेव्हा उतरवून ठेवशील,

तुझा मुखवटा,

आणि पाहू शकशील–

स्वतःचं खरं प्रतिबिंब,

तेव्हाच पुन्हा भेट मला ….

मनाच्या पारदर्शकतेसह!

खूप जवळच्या मैत्रीत,

जाणून असतो आपण,

एकमेकींना,

अगदी “नस नससे वाकीफ”!

 

मग तुझी झाकपाक कशासाठी ?

आयुष्याच्या सांजवेळी,

मांडायचा असतो—

लेखाजोखा,

एकमेकींच्या साक्षीने,

जगलेल्या क्षणांचा !!

 

पण तुझी सगळ्यांवरच–

आगपाखड!

 स्वतःच्या खऱ्या प्रतिमेकडे,

जेव्हा पाहू शकशील,

धीटपणे—

 

तेव्हाच ये ऐसपैस गप्पांसाठी,

खऱ्या आठवणींच्या

झाडाखाली!!!

तो पर्यंत—-

शांतच राहू दोघीही !!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ अनमोल नाते… ☆ जयश्री पाटील ☆

जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

अनमोल नाते… ☆  जयश्री पाटील ☆

येताच या जगी तू आनंद फार झाला

सर्वांग सुंदर आई शब्द बहाल झाला

 *

लाभताच मातृत्व हे धन्य मी जाहले

अलौकिक नात्यात अलगद गुंतून गेले

 *

हातात घेताच तुजला गगन ठेंगणे झाले

रूप तुझे पाहता मी स्वतःच विसरून गेले

 *

कुशीत घेता तुजला वाटे स्वर्ग जणू लाभला

इवल्याशा ओठात तुझ्या अमृत पान्हा झरला

 *

दिवस रात्र जणू काही समसमान झाले

सभोवती तुझ्या माझे सारे विश्व सामावले

 *

मिठीत विसावता तुझे बाळरूप गोजिरे

फिके वाटती मज आकाशातील चंद्र तारे

 *

अनमोल तू खास तू फक्त माझे बाळ तू

मानवाच्या निर्मितीतला माझाच गर्व तू

 *

विरल्या प्रसव वेदना तोडली जरी नाळ

जोडली आहे काळजाची काळजाशी नाळ

  

© जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३३४ ☆ भिडले लोचन… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३४ ?

☆ भिडले लोचन… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

कसे अचानक जलधारांनी घिरले लोचन

आनंदाची वर्षा होता झरले लोचन

*

जे दिसले ते ह्या डोळ्यांना मृगजळ होते

फसवे पाणी फसवत होते फसले लोचन

*

चंद्र सूर्य अन् कुणीच साक्षी नव्हते तेव्हा

या प्रेमाचे केवळ साक्षी ठरले लोचन

*

मूक युद्ध हे दोघांमध्ये चालू होते

तेव्हा तेव्हा प्राणपणाने भिडले लोचन

*

दोघांचेही दुःख सारखे होते तरिही

तुझेच केवळ सहजपणाने रडले लोचन

*

डोळ्यांमधले सुख पाहू मी नाही शकलो

ओठांवरती ओठ ठेवता मिटले लोचन

*

शृंगाराची ती श्रीमंती उधळत गेली

असा अचानक धनाढ्य झालो हसले लोचन

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ☆ ईश्वरी ऋण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ ईश्वरी ऋण... ☆ श्रीशैल चौगुले ☆

आम्ही ईश्वराचे ऋणी

जन्मा व्हावे सद्गुणी

सत्संगी भाव ध्यानी

नित्य जप मनो-मनी.

भिन्न नाम रुपे एक

कर्म सत्वे भुत प्राणी

ऐसे पुण्य ना त्रैलोकी

भुलोकी भक्त सृजनी.

  

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares