image_print

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || अमृतभूमी || ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे  कवितेचा उत्सव  ☆ || अमृतभूमी || ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆  भारत आमची देवभूमी उभ्या जगात अमीट ठसा कर्तृत्वाने सदैव जपूया देशभक्तीचा घेतला वसा ||   इतिहासाच्या पानापानांत शौर्य भक्तीची झुंजार वाणी दऱ्या-खोर्‍यातूनी घुमतसे स्वतंत्रतेची मंगलगाणी ||   स्वातंत्र्यास्तव किती झुंजले रक्त सांडले प्राण अर्पिले बली वेदीतून आकारा ये स्वतंत्रतेचे शिल्प साजिरे ||   ज्ञान-विज्ञान संपन्नतेचा थोर वारसा असे लाभला शिखरे गाठून कर्तृत्वाची देऊ झळाळी या वैभवाला ||   जन्म लाभला पवित्र देशी भाग्य आपुले हे अविनाशी तिच्या प्रगतीचे होऊ भोई यश पताका नेऊ आकाशी ||   ही भारतभूच्या स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी पर्वणी  आसेतू हिमाचल गर्जती सुरेल मंगल यश गाणी || सुरेल मंगल जय गाणी ||   © सौ.ज्योत्स्ना तानवडे वारजे, पुणे.५८ ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...
Read More

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बरे नाही… ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील  कवितेचा उत्सव  ☆ बरे नाही… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆  (रंगराग) बेगडी रिवाजाना पाळणे बरे नाही देवळात देवाना शोधणे बरे नाही   बेरक्या पुढा-यांंची भाषणे किती खोटी नेहमी दिमाखाने बोलणे बरे नाही   बिघडले असे स्वार्थी सोयरे कसे माझे सारखे मला त्यानी फसवणे बरे नाही   मागच्या रिवाजांची मांडणी पुढे झाली जातपात आताही नोंदणे बरे नाही   कोणत्या चुका आम्ही मागच्या पुढे केल्या दाखवा समाजाला टाळणे बरे नाही   झाड सावली देते सारखी कुणाला ही निंदकाला टाळायला सांगणे बरे नाही    © श्री तुकाराम दादा पाटील मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३ दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६ ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...
Read More

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 97 – पडवी ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम   साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #97  ☆ पडवी ☆ हल्ली शहरात आल्या पासून गावाकडंची खूप आठवण येऊ लागलीय गावाकडची माती गावाकडची माणसं गावाकडचं घर अन् घरा बाहेरची पडवी घराबाहेरची पडवी म्हणजे गावाकडचा स्मार्टफोनच...! गावातल्या सर्व थोरा मोठ्यांची हक्काची जागा म्हणजे घराबाहेरची पडवीच...! जगातल्या प्रत्येक गोष्टीवर इथे चर्चासत्र रंगतं आणि कोणत्याही प्रश्नावर इथे हमखास उत्तर मिळतं दिवसभर शेतात राबल्यावर पडवीत बसायची गंमतच काही और असते.. अन् माणसां माणसांमध्ये इथे आपुलकी हीच खासियत असते पडवीतल्या गोणपाटावर अंग टाकलं की , आपण कधी झोपेच्या आधीन होतो हे कळत सुध्दा नाही पण शहरात आल्या पासून , ह्या कापसाच्या गादीवर क्षण भर ही गाढ झोप लागत नाही...! घराबाहेरचं सारं जग एकाएकी अनोळखी वाटू लागलंय.... अन् ह्या चार भितींच्या आत आज.. डोळ्यांमधलं आभाळं देखील नकळतपणे भरून आलंय कधी कधी वाटतं ह्या शहरातल्या घरांना ही गॅलरी ऐवजी पडवी असती तर आज प्रत्येक जण स्मार्टफोन मधे डोकं खुपसून बसण्यापेक्षा पडवीत येऊन बसला असता... आणि खरंच गावाकडच्या घरासारखा ह्या शहरातल्या घरानांही मातीचा गंध सुटला असता....!   © सुजित कदम संपर्क – 117,विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30 मो. 7276282626 ≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...
Read More

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रजासत्ताक दिन …. ☆ श्री रवींद्र सोनावणी

श्री रवींद्र सोनावणी  कवितेचा उत्सव  🇮🇳 प्रजासत्ताक दिन …. 🇮🇳 श्री रवींद्र सोनावणी ☆  जन्मलो देशात त्याचे नाव हिंदुस्थान आहे  फडकतो डौलात अमुचा तो तिरंगा प्राण आहे   भिन्न भाषा वेशभूषा संस्कृतीने एक आम्ही प्राणाहूनीही प्रिय आम्हा आमची ही हिंदभूमी   गतिमान हे विज्ञानयुग आम्ही इथे आहोत राजे  चिमटीत धरतो विश्व  अणुशक्तीत आमुचे नाव गाजे   दूत आम्ही शांतीचे आम्हा नको कधीही लढाई मनगटे पोलादी परि ना मारतो खोटी बढाई   आहेत आम्हाला समस्या त्या आम्ही पाहून घेऊ सदनात आमुच्या दुष्मनांनो तुम्ही नका चोरुन पाहू   रक्षिण्या स्वातंत्र्य येथे वीरता बेबंद आहे रक्तामध्ये एल्गार अन श्वासामध्ये जयहिंद आहे   © श्री रवींद्र सोनावणी निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५ मो. क्र.८८५०४६२९९३ ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...
Read More

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भारतमातेची आरती .. ☆ डाॕ संगीता गोडबोले

 डाॕ संगीता गोडबोले   कवितेचा उत्सव  🇮🇳 भारतमातेची आरती.. 🇮🇳  डाॕ संगीता गोडबोले  ☆  जय देवी जय देवी जय भारतमाता नतमस्तक तुज चरणी गाऊ तव गाथा   हिमालयासम गिरिवर रक्षण तव करिती स्वर्गही त्यागुन उतरे नंदनवन  भूवरती गंगा सिंधु कावेरीसह कितिक ते जलधी वर्षा  ग्रीष्मादि  ऋतू तुझीच समृद्धी   विविध तरुलता कथती  सुरस तव  कथा जय देवी जय देवी जय भारतमाता   त्यागमूर्त जणु भगवा  तव हाती साजे यशगाथा पुत्रांची विश्वभरी गाजे भाषा अठरा षट् शास्त्रे अन् पुराणेही अठरा जगती विज्ञानाच्या ..तू लखलखता तारा जयतु जन्मभू गर्जे हृदय मम सदा   जय देवी जय देवी जय भारतमाता   © डाॕ संगीता गोडबोले कल्याण .   ≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...
Read More

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 118 ☆ मनस्विनी ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 118 ☆ मनस्विनी ☆ (कन्यादिन-२४ जानेवारी) मला हवी होती  एक मुलगी, माझ्या सारख्याच  चेह-या मोह-याची, माझी झालेली प्रत्येक  कुचंबणा टाळू शकणारी, माझ्या बुजरेपणाचा, भित्रेपणाचा लवलेशही नसणारी, एक तेजस्विनी हवी होती मला, माझी अनेक अधुरी स्वप्नं, सत्यात उतरवणारी सत्यवती, मी हरलेले क्षण जिंकून घेणारी अपराजिता हवी होती मला ! माझ्या पोटी जन्मायला हवी होती, मी मनात जपलेली मनस्विनी ! (अनिकेत-१९९७  मधून---१९९४ साली लिहिलंय...) © प्रभा सोनवणे “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011 मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...
Read More

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अमृतक्षण सौख्यधन ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले  कवितेचा उत्सव  ☆ अमृतक्षण सौख्यधन ☆ श्रीशैल चौगुले ☆ सज्ज झाले गाव राष्ट्रभक्ती स्वभाव सोहळ्याचे ते क्षण अमृतमहोत्सवी.   स्वातंत्र्यात भारत तिरंगा अविरत फडकतो सतत सत्य-आहिंसा-शांती.   मानवतेचा ध्यास गांधीजीचा हव्यास सुखी प्रजेत घास  गुलाममुक्ती नांदी.   संतविचारी चाले समृध्दीची पाऊले विरांचा ईतिहास प्रजासत्ताक राज्य.   धन्य-धन्य आहुती पंचभूतात ख्याती भारत माता कि जय ! जीवन युगांना देती.   © श्रीशैल चौगुले ९६७३०१२०९० ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...
Read More

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वंदन करूया भारत भू ला… ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर  कवितेचा उत्सव  ☆ वंदन करूया भारत भू ला... ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆  वंदन करुया भारतभूला प्रिय अमुच्या या जन्मभूमीला //धृ//   प्रणाम अमुचा भुमातेला रक्षण कर्त्या क्रांतिविरांना टिळक, नेहरु, गांधी यांना वंदन करुया नेताजींना //1//   नांदती येथे आनंदाने हिंदू मुस्लिम बंधुत्वाने राहती सारे एकोप्याने लढती पहा ते सामर्थ्याने //2//   वारसा आम्हा संस्कृतीचा इतिहास पहा दिव्यत्वाचा शौर्य, पराक्रम शूर शिवबाचा मंत्र मिळाला स्वातंत्र्याचा //3//   मान आम्हाला हिमालयाचा तसा जिव्हाळा जलधारांचा रक्षक आहे सामर्थ्याचा सुजलाम सुफलाम भारतभूचा //4//   डौलत आहे सदा आमूचा तिरंगी झेंडा सन्मानाचा सदैव उन्नत माथा अमूचा मनी असू द्या भाव क्रांतीचा //5//   © श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606 संपर्क – 9420738375 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈...
Read More

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 122 ☆ रानमेवा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 122 ☆ रानमेवा ☆ पंख मनाला फुटावे मला जाता यावे गावा माझी प्रार्थना येवढी स्वीकारावी माझ्या देवा   माझं माहेर हे खेडं त्याचं मनाला ह्या वेड माझ्या सोबत वाढलं सोनचाफ्याचं ते झाड किती दूर गेलं तरी मनी गंध आठवावा   काट्यातली पाय वाट होती नागिनी सारखी काटे टोचती पायाला तरी होते त्यात सुखी त्याच धुळीच्या वाटेचा मला वाटतोय हेवा   थाटमाट शहराचा माया ममतेला तोटा लेप चेहऱ्यावरती आत मुखवटा खोटा अशा खोट्या सौंदर्याचा मला मोह कसा व्हावा   किती दिसाचे ते अन्न सांगा असेल का ताजे ? रोज खातात मिठाई शहरातले हे राजे  रोज दिवाळी साजरी त्यात नाही रानमेवा   © अशोक श्रीपाद भांबुरे धनकवडी, पुणे ४११ ०४३. ashokbhambure123@gmail.com मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८ ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...
Read More

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देह आणि मन.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे  कवितेचा उत्सव  ☆ देह आणि मन.... ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆  मनाचा शिंपला,     विचारांचा मोती!   तेजस्वी सुंदर ,     पहाट समयी !    वाटते ते जग,   अगाध अतर्क्य!  तुझेच हे रूप,     करितसे सार्थ!     आत्मा आणि तूच,      आवरण देही !    मनाच्या संपुटी,      नांदतच राही!   © सौ. सुहास उज्वला सहस्रबुद्धे वारजे, पुणे (महाराष्ट्र) ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...
Read More
image_print