मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वामी विवेकानंदांवरचे पुस्तक मला का लिहावेसे वाटले – सौ.अंजली दिलीप गोखले – अभिनंदन + संपादकीय निवेदन ☆

सूचना/Information

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ.अंजली दिलीप गोखले 

🪻 अभिनंदन 🪻

आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री अंजली गोखले यांनी लिहिलेले  “हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते स्वामी विवेकानंद” हे माहितीपूर्ण पुस्तक ‘विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी, मराठी प्रकाशन विभाग’ यांनी नुकतेच प्रकाशित केले आहे.

आपल्या समूहातर्फे अंजलीताईंचे मनःपूर्वक खूप अभिनंदन आणि यापुढील त्यांच्या अशाच समृद्ध साहित्य-सेवेसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा. 💐

🌸🌼🌸

आजच्या मनमंजुषा सदरात वाचू या.. ‘ हे पुस्तक का लिहावेसे वाटले ‘ याबद्दलचे अंजलीताईंचे मनोगत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

🪷 मनमंजुषेतून 🪷 

☆ स्वामी विवेकानंदांवरचे पुस्तक मला का लिहावेसे वाटले… ☆ सौ.अंजली दिलीप गोखले ☆

स्वामीजींच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेनेच या पुस्तकाचे लिखाण पूर्णत्वाला जाऊ शकले.

ऑटोबायोग्राफी ऑफ योगी परमहंस योगानंद या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद करताना स्वामी विवेकानंदांचा संदर्भ आला.

अमेरिकेतील एका छोट्या गावामध्ये सहा सात वर्षाची मुले खेळत असतात. जवळच छोटासा टॅंकअसतो. थोडावेळ खेळ झाल्यानंतर मुलांची दंगामस्ती, त्यानंतर भांडणे होतात. एक मुलगा आपल्या लहान भावाला पाणी भरलेल्या टॅंक मध्ये ढकलून देतो. तो मुलगा बु डायला लागतो आणि त्याच क्षणी त्याचे लक्ष आकाशाकडे जाते. तिथे त्याला झगझगता प्रकाश दिसतो आणि त्यामध्ये एक आश्वासक चेहराही दिसतो. त्याचवेळी पाण्यामध्ये त्याच्या हाताला एक काठी लागते आणि मित्र त्याला ओढून घेतात आणि त्याचा जीव वाचतो..

त्यानंतर जवळजवळ दहा वर्षांनी तो मुलगा आपल्या आईबरोबर शिकागो येथे चाललेला असतो. त्यात वेळी त्याला समोर तसाच झुक झुकता प्रकाश पुन्हा दिसतो आणि तोच आश्वासक चेहरा असलेली व्यक्ती पण दिसते. तो त्यांच्याकडे जायचे ठरवतो तेवढ्यात ती व्यक्ती पायऱ्या चढून एका मोठ्या हॉलमध्ये जाते. तोही त्या हॉलमध्ये जातो आणि पाहतो तो हॉल गच्च भरलेला असतो आणि त्या ठिकाणी जागतिक धर्म परिषद भरलेली असते.

केशरी फेटा आणि अंगभर केशरी कपनी घातलेली ती व्यक्ती म्हणजे भारतामधून आलेले स्वामी विवेकानंद होते. त्यांचे भाषण संपल्यानंतर तो त्यांना शेक हँड करून यावे असे मनाशी ठरवतो. त्यांच्या जवळून जाताना त्याच्या मनात येते की आपल्याला असे मोठे गुरु पाहिजेत. यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळावे. तो जवळ गेल्यावर स्वामीजी त्याच्याकडे पाहून त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले,, ” अरे मी तुझा गुरु नाही. तुझ्या पुढील आयुष्यामध्ये जे तुला चांदीचा पेला देतील, ते तुझे गुरु असतील.”

25-30 वर्षांनी त्या व्यक्तीला, भारतातूनच आलेल्या परमहंस योगानंदानी चांदीचा पेला दिला.

.. हा प्रसंग वाचल्यानंतर मी थक्क होऊन गेले. अशा द्रष्ट्या, दैवी शक्ती लाभलेल्या स्वामीजींची आपण पूर्ण ओळख करून घ्यावी, त्यांचे विचार समजून घ्यावेत, असे मी नक्की केले. आणि त्यांची पुस्तके वाचण्याचा सपाटा सुरू केला. अशी मोठी पंधरा-सोळा पुस्तके वाचल्यानंतर सोप्या भाषेत स्वामीजींवर पुस्तक लिहिण्याचे मी ठरवले आणि त्यातून तयार झाले हिंदुत्वाचे विश्व प्रवक्ते स्वामी विवेकानंद  हे स्वामीजींवरील पुस्तक.

…. स्वामीजींच्या आईने भगवान शंकराकडे आणि जशा सुपुत्राची मागणी प्रार्थनेने केली केली, तसेच होते स्वामीजी. त्यांच्यातले सद्गुण ओळखून वडिलांनी जसे मार्गदर्शन केले तसेच घडले स्वामीजी.

…. सद्गुरु रामकृष्ण परमहंस यांनी आपल्या पट्ट शिष्याला ओळखून, त्याला प्रेमाने आपलेसे करून, आपल्या ज्ञानाची ओंजळ पुरती रिकामी करून त्याला जशी झळाळी दिली, तसे तेज:पुंज बनले स्वामीजी.

…. आपल्या गुरुदेवांच्या इच्छेप्रमाणे आयुष्यात फक्त त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी झटले स्वामीजी.

…. आपल्या मातृभूमी बरोबर सगळ्या जगाच्या हितासाठी झटले स्वामीजी.

…. ” हे विश्वची माझे घर ” म्हणत ज्ञानदेवांचे पसायदान आचरणात आणून आपल्या आयुष्याची 

 अक्षरशः आहुती दिली ती स्वामीजींनी.

…. फक्त भारतातच नाही तर अमेरिका इंग्लंड येथेही हिंदुध्वज रोवून तो ध्वज फडकवला तो स्वामीजींनी.

 अशा स्वामीजींचे सर्व पिढीला आदर्श असेच आहे.

म्हणूनच – – 

“हिंदुत्वाचे विश्व प्रवक्ते स्वामी विवेकानंद” हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे आणि आचरणात आणावे असे मला मनापासून वाटते.

© सौ. अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – सुश्री अर्चना सुरेश देशपांडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री अर्चना सुरेश देशपांडे

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री अर्चना देशपांडे यांचा “मोगरा फुलला” हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 💐💐

आजच्या व उद्याच्या अंकातील जीवनरंग सदरात वाचू या याच संग्रहातील त्यांची कथा – “नवं नातं”… दोन भागात.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – श्रीमती सुरेखा कुलकर्णी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्रीमती सुरेखा कुलकर्णी

🌸 अ भि नं द न 🌸

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती सुरेखा कुलकर्णी यांचा ‘नंदादीप’ हा काव्यसंग्रह वल्लरी प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केला आहे.यापूर्वी त्यांचा एक प्रातिनिधिक व एक काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे.

त्यांच्या साहित्यिक वाटचालीबद्दल ई अभिव्यक्ती (मराठी) परिवारातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! 💐💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ ।। छत्तीसगढ़ के प्रसिद्ध कवि पद्मश्री डॉ सुरेन्द्र दुबे जी का दुखद निधन – भावपूर्ण श्रद्धांजलि ।।   ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🍁।। छत्तीसगढ़ के प्रसिद्ध कवि पद्मश्री डॉ सुरेन्द्र दुबे जी का दुखद निधन – भावपूर्ण श्रद्धांजलि ।। 🍁 

छत्तीसगढ़ की माटी से लेकर विश्व मंच तक अपनी विशिष्ट एवं हास्य-व्यंग्य की कविताओं से पहचान बनाने वाले महान कवि पद्मश्री डॉ. सुरेन्द्र दुबे जी के निधन का समाचार अत्यंत दुखद है।आपका जन्म 8 जनवरी सन 1953 को छत्तीसगढ़ राज्य के दुर्ग जिले में बेमेतरा गाव में हुआ था। आप पेशे से एक आयुर्वेदिक चिकित्सक भी रहे। आपको भारत सरकार द्वारा 2010 में भारतीय नागरिक पुरस्कार पद्मश्री से सम्मानित किया गया था। आपको  “काका हाथरसी पुरस्कार” से भी सम्मानित किया गया था। 

🙏🌹 ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से प्रसिद्ध कवि पद्मश्री डॉ सुरेन्द्र दुबे जी को विनम्र श्रद्धांजलि 🌹🙏

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ प्रकाशन संबंधी महत्वपूर्ण सूचना 📖 ☆ सम्पादक मंडल ई-अभिव्यक्ति ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

📖 प्रकाशन संबंधी महत्वपूर्ण सूचना !! 📖

कुछ अपरिहार्य कारण से सोमवार 30 जून, मंगलवार 1 जुलाई और बुधवार 2 जुलाई तीन दिनों के लिए ई-अभिव्यक्ति का प्रकाशन बंद रहेगा। 

इसके अलावा, हर महीने के पाक्षिक अवकाश 28 तारीख को ई-अभिव्यक्ति का प्रकाशन नियमित रूप से होगा। 

आप सभी का इसी प्रकार स्नेह, प्रतिसाद और सहयोग अपेक्षित है।

– संपादक मंडल 

ई-अभिव्यक्ति 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मन पाखरू पाखरू… + संपादकीय निवेदन – सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

🪻 अभिनंदन 🪻

आम्ही सिद्ध लेखिका, कोकण विभाग, यांच्यातर्फे, ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके स्मृतीदिनानिमित्त राज्य स्तरीय अष्टाक्षरी काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे यांच्या कवितेस लक्षवेधी रचनेचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.

त्याबद्दल ई-अभिव्यक्ती (मराठी) परिवारातर्फे त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

🌸🌸🌸🌼🌼🌸🌸🌸

आजच्या अंकात वाचूया ही पुरस्कार प्राप्त कविता मन पाखरू पाखरू…

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? कवितेचा उत्सव ? 

मन पाखरू पाखरू… ☆ श्रीमती उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

(आम्ही सिद्ध लेखिका कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्य स्पर्धा…  लक्षवेधी रचना पुरस्कार प्राप्त कविता)

 मन पाखरू पाखरू,

 पळभर भुईवर!

 जाते आभाळा भेटाया,

 पंख पसरून वर! … १

 *

 मन पाखरूच असे,

 पंख फुटता उडते!

 त्याची झेप ही अफाट,

 नभ अपुरे पडते! … २

 *

 मन पाखराप्रमाणे,

 करी सर्वत्र संचार!

 नाही लागे थांग त्याचा,

 त्याचे उडणे अपार! .. ३

 *

 मन अधीर अधीर,

 क्षणभर एका ठायी!

 विचारांच्या झोपाळ्यात,

 मंद मंद झोका घेई! .. ४

 *

 असे मनाचे पाखरू,

 इवलासा जीव त्याचा!

 दिसे त्याचा हा स्वभाव,

 स्वच्छंदाने जगण्याचा! … ५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ तीन दिवस अंक बंद असल्याबद्दल महत्वाची सूचना!! 📖 ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

💐 संपादकीय निवेदन 💐

📖 तीन दिवस अंक बंद असल्याबद्दल महत्वाची सूचना!! 📖

कृपया सर्वांनी नोंद घ्यावी – – 

काही अपरिहार्य कारणामुळे सोमवार दि. ३०/६/२५, मंगळवार दि. १/७/२५ आणि बुधवार दि. २/७/२५ असे तीन दिवस अभिव्यक्तीच्या दैनिक अंकाचे प्रकाशन बंद रहाणार आहे.

तसेच दर महिन्याच्या २८ तारखेला जी पाक्षिक सुट्टी घेतली जाते, ती या जून महिन्यात घेतली जाणार नसून शनिवार दि. २८/६/२५ रोजी अंक नेहेमीप्रमाणे प्रकाशित होईल.

सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

– संपादक मंडळ

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – श्रीमती दीप्ती कुलकर्णी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्रीमती दीप्ती कुलकर्णी

💐 अ भि नं द न 💐

तितिक्षा इंटरनॅशनल मार्फत मातृदिन,छ.संभाजीराजे दिनआंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त तीन काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या तीनही काव्य स्पर्धांत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांना काव्य द्वितीयउत्कृष्ट चारोळी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे त्यांचे मन :पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ ।। ।। वरिष्ठ पत्रकार स्मृतिशेष सर्वदमन पाठक जी की तृतीय पुण्य तिथि पर सादर स्मरण एवं श्रद्धांजलि ।। ☆ साभार – श्री यशोवर्धन पाठक ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🍁।। वरिष्ठ पत्रकार स्मृतिशेष सर्वदमन पाठक जी की तृतीय पुण्य तिथि पर सादर स्मरण एवं श्रद्धांजलि ।। 🍁 साभार – श्री यशोवर्धन पाठक 🍁

आज श्री यशोवर्धन पाठक जी के मंझले भैया एवं भोपाल के वरिष्ठ पत्रकार स्मृतिशेष सर्वदमन पाठक जी की तृतीय पुण्य तिथि है।अपने गृहनगर जबलपुर में दैनिक नवभारत, नवीन दुनिया, युगधर्म, देशबंधु, हितवाद, ज्ञानयुग प्रभात में पत्रकारिता कार्य करने के बाद उन्होंने भोपाल में दैनिक भास्कर, नयी दुनिया और जागरण में पत्रकारिता कार्य किया था।भोपाल में उन्हें पत्रकारिता की पाठशाला के रूप में संबोधित और सम्मानित किया जाता था। उन्हें पत्रकारिता कार्य के दौरान गणेश शंकर विद्यार्थी पत्रकारिता सम्मान और हुकुम चन्द नारद पत्रकारिता सम्मान जैसे अनेक उच्च स्तरीय सम्मान से सम्मानित किया गया था।

श्री पाठक जी को पत्रकारिता का जूनून अपने पूज्य पिता स्व पंडित भगवती प्रसाद जी पाठक से मिला था। वे एक सुप्रसिद्ध पत्रकार और शिक्षा विद थे। उन्होंने भी 1951 में एक अखबार सही बात का संपादन और प्रकाशन किया था।

आदरणीय श्री सर्वदमन जी पाठक का जन्म 20 नवम्बर 1950 और स्वर्गवास 22 जून 2022 को हुआ था ।

पुण्य तिथि के अवसर पर सादर स्मरण के साथ विनम्र प्रणाम🌹🙏

साभार – श्री यशोवर्धन पाठक

पूर्व प्राचार्य, राज्य सहकारी प्रशिक्षण, संस्थान, जबलपुर

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमती यास्मिन शेख – वय ??? फक्त शंभर वर्षे… – सुश्री शोभना आगाशे ☆ संपादकीय निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्रीमती यास्मिन शेख

💐 अ भि नं द न 💐

श्रीमती यास्मिन शेख … काल दि. २० जून … श्रीमती यास्मिनजी यांनी काल वयाची शंभरी पार केली. त्यांना ई-अभिव्यक्ती साहित्य मंचाकडून आदरपूर्वक प्रणाम आणि मनःपूर्वक असंख्य शुभेच्छा. 

मराठी भाषेबद्दल, विशेषतः व्याकरणाबाबत त्यांना खूप आत्मीयता आहे हे तर सर्वज्ञातच आहे. त्या संदर्भात त्यांनी केलेल्या आणि अजूनही करत असलेल्या कामाचा  अल्पसा आढावा प्रस्तुत करत आहोत. 

पूर्व प्रकाशित आलेख 

👉  मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वैय्याकरणी यास्मिन शेख ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

👉  मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ व्याकरणाच्या रुक्षतेतील काव्य :: यास्मिन शेख – लेखक : श्री मुकुंद संगोराम ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर☆

आजच्या अंकात वाचूया सुश्री शोभना आगशे ची प्रस्तुती वय ??? फक्त शंभर वर्षे….

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ वय ??? फक्त शंभर वर्षे… ☆ प्रस्तुती – सुश्री शोभना आगाशे ☆

श्रीमती यास्मिन शेख नेहमीच म्हणतात, ‘भाषेला धर्म नसतो. ज्या राष्ट्राने तुम्हाला आसरा दिला, ज्याने तुमची स्वतःची ओळख पटवून दिली, त्या राष्ट्राची भाषा हीच मातृभाषा असते.’

कागदोपत्री, वैचारिक किंवा वैज्ञानिक लेखनासाठीची मराठी ही प्रमाण भाषाच असली पाहिजे याबद्दल त्या आग्रही आहेत. भावभावना पोहोचवण्यासाठी बोली भाषा अवश्य असावी; पण त्यामध्येही इंग्रजी शब्दांचा वापर टाळला पाहिजे, याबाबतीत त्या ठाम आहेत. मराठीच्या दुर्दशेसाठी आपण सारेच कारणीभूत आहोत असे त्या मानतात. त्यावरच्या उपायांचा सतत पाठपुरावा त्यांनी केला. व्याकरणावरील त्यांची पुस्तके ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्द लेखनकोश’ आदर्श मानली जातात. अतिशय रूक्ष वाटणारा हा विषय त्यांनी सहजतेने उलगडून सोपा केला. त्याबद्दल विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

आजही तेवढ्याच जोमाने त्यांचे लेखन-वाचन सुरू आहे. वर्तमानपत्रात व्याकरणाचे सदर लिहितात. ‘अंतर्नाद’ मासिकात व्याकरण सल्लागाराच्या भूमिकेत भरीव कामगिरी करून उच्चतेचा एक मापदंड प्रस्थापित केला आहे. मुद्रिते तपासताना सकारात्मक राहून सतत कार्यमग्न राहणे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून देणे हे त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य असावे. आज वयाची शंभर वर्षे पार करताना शरीराबरोबरच त्यांच्या प्रसन्न, नम्र मनाचेही कौतुक वाटते. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि तीक्ष्ण अफलातून स्मरणशक्ती यांची दैवी देणगी त्यांना लाभल्याचे पुन्हा पुन्हा जाणवते. स्वतःच्या हाताने लिहिण्यातील आनंद त्यांना अनेक वर्षे लाभो. त्यांनी हाती घेतलेली ही व्याकरणाची दिंडी घराघरांत जावो आणि यास्मिन शेख यांना नव्या उमेदीने जगण्याचे बळ देवो.

दि. २० जून … श्रीमती यास्मिनजी यांनी वयाची शंभरी पार केली. त्यांना हार्दिक शुभेच्छा. 💐🙏

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares