मराठी साहित्य – कविता ☆ छत्रपति शिवजी जयंती विशेष – शिवबा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।   आज प्रस्तुत है छत्रपति शिवजी जयंती के अवसर पर विशेष कविता  “शिवबा… ।)

 

☆ छत्रपति शिवजी जयंती विशेष – शिवबा… ☆

 

मला बी गडावर येऊ द्या की रं

राजांचंं दर्शन घेऊ द्या की…

 

शिवबाचं गुणगान गाऊ द्या की रं

श्रद्धेनं फुलं ही वाहू द्या की…

 

स्वराज्याचं स्वप्न पाहू द्या की रं

रयतेचं राज्य हे येऊ द्या की…

 

त्या तलवारीची धार पाहू द्या की रं

मला बी लढाया जाऊ द्या की…

 

रक्ताचं दान मला देऊ द्या की रं

कडू हे हलाहल पेऊ द्या की…

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 37 – गझल – ………. आले चांदणे! ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  उनकी  एक प्यारी सी ग़ज़ल “……. आले चांदणे!.  सुश्री प्रभा जी की  यह गजल चन्द्रमा की चाँदनी को जीवन  दर्शन से जोड़ती हुई प्रतीत  होती है। चन्द्रमा अमावस्या से प्रारम्भ होकर पूर्णिमा  के पूर्ण चन्द्रमा तक अपनी कलाओं  और आकार से हमारे जीवन से सामंजस्य बनाये रखता है।  सुश्री प्रभा जी ने इस सामंजस्य को अपनी ग़ज़ल में बेहतरीन तरीके से एक सूत्र में पिरोया है। इस अतिसुन्दर  ग़ज़ल  के लिए  वे बधाई की पात्र हैं। उनकी लेखनी को सादर नमन ।  

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 37 ☆

☆ गझल – ………. आले चांदणे! ☆ 

 

मध्यरात्री जन्मताना घेऊन आले चांदणे

गर्द काळ्या त्या तमाला भेदून  आले चांदणे

 

जन्म जेथे जाहला त्या गावात माझा चांदवा

त्याच गावी  आठवांचे ठेवून आले चांदणे

 

ती किशोरी धीट स्वप्ने गंधाळली तेजाळली

मी दुपारी तप्त सूर्या देवून आले चांदणे

 

नेहमी मी मोह फसवे हेटाळले या जीवनी

संशायाचे बीज का हो पेरून आले  चांदणे

 

दूषणे सा-या जगाची सोसून मी तारांगणी

पौर्णिमेने ढाळलेले वेचून  आले चांदणे

 

जीवनाचे गीत गाता आसावरी झंकारली

आर्ततेचे सूर सारे छेडून  आले चांदणे

 

तारकांचा गाव  आता देतो “प्रभा” आमंत्रणे

शुभ्र साध्या भावनांचे  लेवून  आले चांदणे

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य ☆ कविता ☆ माझी कर्मभूमी… . . !   ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। आज प्रस्तुत है  उनके फेसबुक पेज से साभार एक भावप्रवण कविता माझी कर्मभूमी… . . ! )

 ☆  माझी कर्मभूमी… . . !   ☆

माझी कर्म भूमी,  संस्काराचा गाव,

मानव्याचे नाव, देऊ त्याला. . . . . !

 

वागायचे कसे ,  बोलायचे कसे

दिसायचे कसे,  शिकविले. . . . !

 

अनुभव देई ,  रोज नवे धडे

तारतम्य घडे,  जीवनात .. . . !

 

नको बडेजाव,  नको  अभिमान

व्यर्थ गुणगान,  श्रीमंतीचे. . . !

 

स्वातंत्र्याधिकार ,  आहे  प्रत्येकास

व्यक्ततेची आस, कर्तृत्वात. . . . !

 

मायाजाल  देई,  विकारांचे जल

तिथे कर्मफल ,  जन्मा येई. . . . !

 

कर्मभूमी माझी, माझा परीवार

स्वार्थाचा विचार  घात करी. .. . . !

 

मती आणि गती,  विचारांचे  जाते

माणसाशी नाते ,  जोडलेले. . . . !

 

कुटुंबास हवा ,  आधाराचा हात

कर्तव्याची बात, चुको नये. . . !

 

कर्मभूमी देई,  पद, पैसा, किर्ती

आदर्शाची मूर्ती,  स्मरणात. . . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होत आहे रे # 22 ☆ लोकमान्य हास्य योग संघ वर्धापनदिन ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

लोकमान्य हास्य योग संघाच्या बावीसाव्व्या वर्धापन दिनानिमित्त

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है।  श्रीमती उर्मिला जी के    “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है उनके द्वारा रचित लोकमान्य हास्य योग संघ, पुणे  के बावीसवें स्थापना दिवस पर एक कविता  “लोकमान्य हास्य योग संघ वर्धापनदिन”।  कविता का प्रकार – मुक्तछंद है। ई- अभिव्यक्ति की और से लोकमान्य हास्य योग संघ, पुणे को बावीसवें स्थापना दिवस पर हार्दिक शुभकामनायें।)  

☆0 साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 21 ☆

☆ लोकमान्य हास्य योग संघ वर्धापनदिन ☆

!!श्रीराम!!
!!श्रीगणेशाय नमः!!
!!श्रीशारदायै नमः!!
!! श्री गुरवे नमः!!
कवितेचा प्रकार : मुक्तछंद
चाल:- कविवर्य भा.रा.तांबे यांच्या “सायंकाळची शोभा “या कवितेतील ..
“पिवळे तांबुस ऊन कोवळे ,पसरे चौफेर..ऽऽ”
या चालीवर.
लोकमान्य हास्ययोग संघाच्या आम्ही नित्य इथे जमुनी ऽऽ
हा हा हो हो उगाच नाही करीत साऱ्याजणी !!१!!
व्यर्थ न जमतो येथे आम्ही फक्तचि हसण्याला ऽऽ
खेळ खेळुनी शिकतो आम्ही सुंदर जगण्याला !!२!!
खेळ खेळतो फुगे फुगवितो पतंगही उडवितो ऽ ऽ
मस्त काटाकाटी करुनिया गंमतचि पाहतो !!३!!
दोहन करितो दो हातांनी दूध पिऊनी टाकितो ऽ ऽ
ताक घुसळुनी लोणी काढुनी गट्टमचि करितो !!४!!
फू फू आवाज करीत आम्ही गालचि ते फुगवुनी ऽ ऽ
फुफुसातली नको ती हवा देतो टाकुनी !!५!!
स्वच्छ मोकळा श्वास घ्यावया तयार होतो आम्ही ऽऽ
वारकरी होऊनी नाचतो रिंगण ते करुनी !!६!!
राग लोभ अहं मद मत्सर हे शत्रू असती सहा ऽऽ
बिघडविती आरोग्य कसे ते सर्वांनी हो पहा!!७!!
त्या शत्रूंना पळविण्यासचि एकचि उपाय ऽऽ
हास्यसंघामध्ये येऊनी त्यांना करा बाय बाय ,!!८!!
हास्यसंघात नियमित येता चेहरा होई गोजिरा ऽऽ
सारे मिळुनी वर्धापन दिन आज करु साजरा !!९!!
” लोकमान्य हास्य योग संघाचा विजय असो !”

©️®️उर्मिला इंगळे, सतारा

दिनांक:-१६-२-२०२०

मो. 9028815585
 !!श्रीकृष्णार्पणमस्तु !!

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – समाजपारावरून साप्ताहिक स्तम्भ ☆ पुष्प पंचवीस # 25 ☆ समर्पित. . . . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं ।  इस साप्ताहिक स्तम्भ के माध्यम से वे किसी न किसी सामाजिक  व्यवस्था के बारे में चर्चा करते हैं एवं हमें उसके निदान के लिए भी प्रेरित करते हैं।  आज प्रस्तुत है श्री विजय जी की एक  भावप्रवण कविता  “समर्पित. . . . !”।  आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  )

☆ समाजपारावरून साप्ताहिक स्तम्भ ☆ पुष्प  पंचवीस # 25 ☆

☆ समर्पित. . . . !☆

 

आधी होता वानर

मग झाला नर.

कधी सुर तर कधी  असूर

कधी यक्ष तर कधी किन्नर.

माणसा ही सारी तुझीच रूप.

तुला जन्मजात मती लाभलेली.

तू आर्य, तर कधी  अनार्य

टोळ्याटोळ्यातून रहाताना

घातलेस स्वतःला जातीचे कुंपण.

तू कधी संत,कधी महंत

कधी राजा,तर कधी, महाराजा

कधी  राष्ट्रपुरुष ,तर

कधी समाज पुरूष .

स्वतः घडलास

देश घडवलास.

ज्ञानी झालास

शिक्षणाचा प्रसार केलास.

कलेतून  आकारत गेलास

क्रिडेतून साकारत गेला

ज्ञानातून जगत गेलास

माणसा  तू  सतत

संस्कारातून शिकत गेला.

कार्य कर्तृत्व घडवीत गेला.

पद, पैसा,  प्रसिद्धी

क्षणोक्षणी जोडत गेला .

नी पैसा पैसा जोडताना

माणूस पण हरवीत गेला.

माणसानच आणली लोकशाही

लोकांनी लोकांसाठी. . .

आपलाच माणूस निवडून दिला

आपल्याला लोक ठरवून

लोकसत्ताक प्रतिनिधी झाला.

माणसा  अजूनही हव्या आहेत

मुलभूत गरजा, जगण्यासाठी.

आज स्वातंत्र्यानंतरही.. .

इथलं *बाई माणूस* सहन करत

अन्याय, अत्याचार,  बलात्कार.

इथ माणूस सुरक्षित हवाय

की  आरक्षित

प्रश्न आहे  अनुत्तरीत.

माणूस. . . माणूस. ..माणूस

माणूस  असा?

माणूस तसा ?

उत्तर नको प्रश्नांकीत. . !

माझीच कविता

माझ्यातल्या माणसाला समर्पित. . . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 34 – असंच काहीसं…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील  एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजितजी की कलम का जादू ही तो है!  आज प्रस्तुत है  परमपूज्य माँ के स्नेह प्रेम पर आधारित एक भावप्रवण  एवं संवेदनशील  कविता “असंच काहीसं…!”)

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #34☆ 

☆ असंच काहीसं…! ☆ 

 

मायेला हाँस्पिटल मध्ये

एडमिट केल्यापासून

तिच्या पासून दूर जावं

असं वाटतच नाही

कारण…,

जरा अवघडलेले पाय

मोकळे करायला

म्हणून मी बाहेर पडावं

अन् नेमकं .. .

तेव्हाच मनात येतं…

मी लहान असताना

आजारी पडल्यावर

माझ्या उशाशी बसणारी

माझी माय….,

क्षणभर जरी मला

दिसेनाशी झाली ना…,

तरी मी किती घाबरायचो

कावराबावरा व्हायचो.. .

अन् मायेला हाक मारायचो….

ती हातातलं काम सोडून

पुन्हा माझ्या जवळ

येऊन बसायची…

आज.. क्षणभर जरी मी

तिच्यापासून दूर झालो

आणि.. . . .

तिचंही असच काहीसं

झालं तर.?

मी अवघडलेल्या पायांनी तसाच

मागे फिरतो…

मायेच्या हाकेला ओ देण्यासाठी…!

 

© सुजित कदम, पुणे

7276282626

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #36 – चंद्र पौर्णिमेचा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण कविता “चंद्र पौर्णिमेचा।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 36☆

☆ चंद्र पौर्णिमेचा ☆

 

माझ्या नभातला हा तारा कसा निखळला

आकाश फाटले अन् टाकाच हा उसवला

 

ओल्या बटा बटातुन गंगा कुठे निघाली

केसातुनी तुझीया पारा कसा निथळला

 

हिरव्या चुड्यात किणकिण नाजूक  मनगटांवर

येता वसंत दारी मुखडा तुझा उजळला

 

होतेस विश्व माझे सारेच तू उजळले

ही पाठ फिरवता तू अंधार हा पसरला

 

हा भेटण्यास येतो मज चंद्र पौर्णिमेचा

या लक्ष तारकांनी मांडव पुन्हा सजवला

 

रात्रीत या कळीचा विस्तारला पदर अन्

श्वासात गंध माझ्या होता इथे मिसळला

 

केवळ तुझ्याचसाठी झालो तुषार मीही

ओल्या मिठीत तूही मग देह हा घुसळला

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 34 – ससेभाऊ असे नका धावू ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज  प्रस्तुत है  आपकी एक भावप्रवण  बाल कविता  “ससेभाऊ असे नका धावू”  जो निश्चित ही आपको खरगोश और कछुवे की दौड़ याद दिला देगा। )

☆ साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य # 34☆ 

 ☆ ससेभाऊ असे नका धावू

 

ससेभाऊ ससेभाऊ असे नका धावू।

धिम्या कासवाशी कधी पैज नका लावू।।धृ।।

 

केस शाणदार तुमची चाल डौलदार।

क्षणार्धात लावाल ,  झेंडा अटके पार।

गर्वाचा फूगा पुन्हा नका फुगू देवू।।१।।

 

थट्टा अशी  दुबळ्यांची बरी नाही राव।

लोभ.. आळसाला जरा म्हणा चले जाव।

गाजर पाहून ध्येयाला ठेंगा नका दावू।।२।।

 

सातत्याला तोड नसे, ठेवा जरा ध्यानी।

चालढकल, टंगळ मंगळ नका मनमानी।

जिंकाल पुन्हा मनी असे खचून नका जाऊ।।३।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य ☆ कविता ☆ प्रेम असे. . .  प्रेम तसे. . . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। आज प्रस्तुत है  एक प्रेम से परिपूर्ण भावप्रवण  कविता प्रेम असे. . .  प्रेम तसे. . . ! )

 

 ☆  प्रेम असे. . .  प्रेम तसे. . . ! ☆

 

सुख आणि दुःख जणू, दोघे प्रेमाचे सोबती

दुःख तुझ्या आभासात, सुख  आपल्या सांगाती.

 

प्रेम लाजाळूचे झाड, वर्षावात कोमेजते

विरहाच्या चटक्याने, पुनः नव्याने फुलते.

 

प्रेम जळणारी वात, प्रेम तेवणारा दिवा

तेलवात करणारा, हात सदा हाती हवा.

 

प्रेम सोसाट्याचा वारा, प्रेम सुगंधी बहर

पिढ्या पिढ्या चालू आहे, त्याचा लहरी कहर.

 

प्रेम कधी दूरध्वनी, तर कधी चलभाष

कसा साधावा संवाद, सांगे आपलाच श्वास.

 

प्रेम गजर्याची भाषा, प्रेम तळहात रेषा

अंतराने अंतराची, घ्यावी जाणूनीया दिशा.

 

प्रेम गुलाबाचे फूल, प्रेम संसाराची चूल

कल्पनेने वास्तवाची, करू नये दिशाभूल.

 

प्रेम मौनाचा कागद, प्रेम आसवांची शाई

मने जुळण्याआधीच, नको वाचायची घाई.

 

प्रेम असे, प्रेम तसे , दोन डोळ्यातले ससे

नजरेने नजरेला, सांग शोधायचे कसे?

 

प्रेम सृजनाच लेणं, प्रेम संस्काराच देणं

भावनांच जाणिवांशी , अविरत देणं घेणं.

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होत आहे रे # 20 ☆ गंध प्राजक्ताचा ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है।  श्रीमती उर्मिला जी के    “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है उनके द्वारा रचित एक और लग्न गीत “गंध प्राजक्ताचा”। आज भी पिछली  पीढ़ियों ने विवाह संस्कार तथा अन्य सामाजिक कार्यक्रमों में गीतों के माध्यम से विरासत में मिले संस्कारों को जीवित रखा है। हम श्रीमती उर्मिला जी द्वारा रचित इस लग्न गीत  के लिए उनके आभारी हैं। निश्चित ही यह गीत आवश्यक्तानुसार परिवर्तित कर भविष्य में विवाह संस्कारों में  नववधू के गृह प्रवेश के समय में गाये जायेंगे।

विगत 1-2-2020 को उनके पौत्र चिरंजीव अवधूत जी का विवाह सौ प्राजक्ता के साथ संपन्न हुआ। इस सुन्दर लग्न गीत की रचना  उन्होंने  सौ प्राजक्ता के गृह प्रवेश की परिकल्पना करते हुए रचित किया था। इस अतिसुन्दर रचना के लिए श्रीमती उर्मिला जी की लेखनी को नमन।)  

☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 20 ☆

☆ गंध प्राजक्ताचा ☆

माझी नातसून आली

आली सोन्याच्या पावली

पावलाने ओलांडून

माप घरात ती आली !!१!!

 

लावा हळद नि कुंकू

तिला औक्षण करुनी

गृहप्रवेश करुया

सगळ्यांनी आनंदुनी !!२!!

 

आली थाटात प्राजक्ता

शालू नेसुनी हिरवा

भरजरी पैठणीचा

रंग खुलतो बरवा !!३!!

 

जरीकाठी  नऊवारी

खुले तिच्या अंगावरी

दिसे कशी गोडवाणी

माझी सुंदर नवरी !!४!!

 

शकुनाच्या गं पाऊली

आनंदाने घरी आली

सत्वगुणी तुझं येणं

मांगल्याच्या गं पावली !!५!!

 

माझी आली नातसून !

तिचे करुया स्वागत !

तिच्या आगमने होई !

घरा आनंदी आनंद  !!६!!

 

झुले सुखाचा हिंदोळा

हिंदोळा गं तिच्या  मनीं

आई-बाबांची लाडकी

लाडकी गं त्यांची  सोनी !!७!!

 

माझ्या अवधूतसंगे

आनंदाची पखरण

व्होवो तुझ्या जीवनात

बांधू सुंदर तोरण !!८!!

 

माझ्या सुरेख अंगणीं दरवळला प्राजक्त

त्याने आसमंत सारा  झाला मंद सुगंधित !!९!!

 

©®उर्मिला उद्धवराव इंगळे

दिनांक:- १-२-२०२०

!! श्रीकृष्णार्पणमस्तु !!

Please share your Post !

Shares