image_print

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 87 ☆ मी मराठी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 87 ☆ ☆ मी मराठी ☆ मी मराठी तू मराठी मातृभाषा ही मराठी घेउया रे शपथ आपण जागवूया ही मराठी   हो मुकुंदानेच केला श्रीगणेशा हा मराठी ग्रंथ पहिला साक्ष ठेवी आपल्यासाठी मराठी   चक्रधर स्वामी कवीश्वर आद्य दैवत हे मराठी पद्य ग्रंथांचा गणेशा आणि पाया ते मराठी   ज्ञानियांची ज्ञानभाषा आपुली आहे मराठी घेउनी सौंदर्य फिरते आज जगती ही मराठी   व्याकरण हे सोबतीला गाठते उंची मराठी चिन्ह देती अर्थ त्याला शोभते त्याने मराठी   घालते खेटेच आहे राज दरबारी मराठी खंत ही अभिजात नाही होत का अजुनी मराठी   © अशोक श्रीपाद भांबुरे धनकवडी, पुणे ४११ ०४३. ashokbhambure123@gmail.com मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८ ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈...
Read More

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मैत्र ☆ श्री शरद कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ मैत्र ☆ श्री शरद कुलकर्णी☆  व्यक्त हो, मुक्त कर, मनात भरून आल्या मेघांना, कोंडलेल्या वादळांना, थिजलेल्या वीजांना, बंदिस्त पावसाला. माझ्या भरभरून मजकूराच्या पत्रावर ओघळू दे,बंद पापणीतला- एक तरी थेंब. वाहून जाऊ दे शब्दशब्द. असंबद्ध सैरभैर कविता. नाहीतरी मन म्हणजे काय.. न लिहीलेल पत्र, किंवा अव्यक्त मैत्रच ना ?   ©  श्री शरद कुलकर्णी मिरज ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈...
Read More

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 37 ☆ दिस सर्वे सारखे नसतात… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 37 ☆  ☆ दिस सर्वे सारखे नसतात… ☆ रडणे लहानपणी शोभते पडणे लहानपणी शोभते... रडता लहानपणी अश्रू पुसल्या जातात पडता लहानपणी उचलण्या हात पुढे येतात... डोळ्यांत अश्रू, बालपणीच शोभतात मोठेपणी त्यास, षंढ सर्वे समजतात... बालपणी पडता, प्रत्येक जण हळहळतो मोठेपणी पडता, अव्हेर तो सतत होतो... बालपणी रडता, चॉकलेट मिठाई मिळते मोठेपणी रडता, आहे ते पण सरते... लहानपणी पडता, मायेची फुंकर सुखावते मोठेपणी पडता, अडगळ वाटायला लागते... सांगायचे इतकेच, दिस सर्वे सारखे नसतात सुकोमल हाताला सुद्धा, रट्टे-घट्टे पडतात...   © कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री. श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005 मोबाईल ~9405403117, ~8390345500 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈...
Read More

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जन्म…. ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई  ☆ कवितेचा उत्सव ☆ जन्म…. ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆  (निसर्ग विज्ञान कविता) वाऱ्याने  जेव्हां टरफल  उघडलं 'बी'ला  दिसलं आभाळ  निळं   बाहेरचं जग सुंदर इतकं.- 'बी'ने कधी पाहिलंच  नव्हतं.   मातीने   प्रेमाने कुशीत  घेतलं उन्हाने  उबदार पांघरुण घातलं   चिमुकल्या ओठानी पाणी  पिऊन 'बी'बाळ चटकन झोपी गेलं   दुसरे दिवशी जाग  आली तेव्हां  शेपटी फुटलेली   तिसरे  दिवशी जादूने शेपटीचीच मान  झाली   उगवलं झाड, झालं उंच कोणी म्हणालं 'ही तर चिंच ' फांदीच्या टोकाला उगवला चिंचेचा आकडा वाटोळा   चिमुकल्या 'बी'ची झाली होती आई ती नव्या बाळाला जन्म देई   श्रीमती मीनाक्षी सरदेसाई  मो. – 8806955070 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈...
Read More

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्ञान विज्ञान… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ कवितेचा उत्सव ☆ ज्ञान विज्ञान... ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆   शतक उगवले एकविसावे युगानुयुगे सरली विज्ञानाच्या विकासाने मनास मने येऊनी भिडली....   जग हे बंद मुठीत व्हाट्सएप्प , फेस बुक ट्विटर, इन्स्टाग्रॅम सारे कसे एका क्षणांत.....   तू कुठे अन् मी कुठे पर्वा नाही कशाची फेस टाईम करता करता अनुभूति प्रत्यक्ष भेटीची....   पत्रे होती लिहिली आम्ही करण्या वास्त पुस्त उत्तर  मिळता मिळता गेले किमान सात दिन मस्त.....   आता कसे सगळेच फास्ट कुठेही असा जगाच्या पाठीवर वैज्ञानिकांच्या प्रयत्नांनी मानव पोहोचला मंगळावर....   ©  सुश्री अरूणा मुल्हेरकर डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए. ≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈...
Read More

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी मातृभाषा ☆ सौ. मुग्धा कानिटकर

☆ कवितेचा उत्सव ☆ माझी मातृभाषा ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆  माझी मातृभाषा  आहे  थोर  मराठी जीवलग वाटते मज  सदा मराठी   कानी अंगाई नादावे  मांडीवरी मराठी मुखीअभंग ओव्या  आईच्या मराठी हाती वृत्तपत्र पित्याच्या असे  मराठी जगरहाटी शिकवे  घरी सोपी   मराठी माझी मातृभाषा आहे थोर  मराठी जीवलग वाटते मज सदा मराठी   चिऊ काऊच्या गोष्टी गोड शैशवी मराठी भावरंगी रंगलो कथां मधून  कौमार्यी मराठी व्यक्तीस खुलवे सौरभ यौवनी मराठी जीवनी वाटे संगत  सोबती   मराठी माझी मातृभाषा आहे  थोर  मराठी जीवलग वाटते मज  सदा मराठी   भाऊरायाच्या छंदात डोकावते हळूच मराठी बन्धुराजाच्या पत्रांतून करे हितगुज मराठी परदेशीभावाशी संवादते मराठी भगिनीस  साहित्य प्रेमी करे मराठी माझी मातृभाषा आहे  थोर  मराठी जीवलग वाटते मज सदा मराठी   सुसंस्कृत लाभले सुंदर माहेर मराठी परप्रांतीय सासरचे सुद्धा बोलती मधाळ मराठी गप्पांत भान हरपती मित्र-मैत्रिणी  मराठी ऋणानुबंध जुळताना अडसर नसते मराठी माझी मातृभाषा  आहे थोर  मराठी जीवलग वाटते मज सदा मराठी   हाती असू देत अक्षरवाॾ.मय मराठी गात राहू   सुरेल नवीजुनी गाणी मराठी भावी पिढीला ज्ञानविज्ञान देईल मराठी ठेवू अभिमान भाषेचा होऊन पाईक मराठी माझी मातृभाषा आहे   थोर  मराठी जीवलग वाटते मज  सदा मराठी © सौ. मुग्धा कानिटकर २७/०२/२०२१ सांगली फोन 9403726078 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈...
Read More

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मराठी माय ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक  ☆ कवितेचा उत्सव ☆ मराठी माय ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆  चक्रधरांच्या लीळा भावतरंग मनीचे ज्ञानेशाच्या ओव्यात तत्त्वज्ञान गीतेचे ! चांगदेवाची गुरु होई मुक्ताई ! दासी नामदेेवाची झाली जनाई ! नाथांचे भारुड जनावरी गारुड मनाचे ते अंगणी भक्ती बापुडी ! तुकयाची गाथा इंद्रायणीकडे आवलीचे साकडे काळ्या विठूला ! दासबोध दासांचा कल्याण लेखक मनाचे ते श्लोक चिंतनाचा ओघ! एका मराठी दिनी सांगणे काय काय जन्मभरी पुरे मराठी माय !   © श्रीमती अनुराधा फाटक ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈...
Read More

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ॠण दुधाचे विसरू नका.. ☆ श्री रवींद्र देवघरे “शलभ’

☆ कवितेचा उत्सव ☆ ॠण दुधाचे विसरू नका..☆ श्री रवींद्र देवघरे "शलभ' ☆ मराठमोळ्यांची पोशिंदी, माझी मराठी मायबोली. ज्ञानोबाची परंपरा, अमृताने जोपासली. गाठी शिवबाची शिबंदी तिच्या वात्सल्यात वाढली. परि  वाघिणीची दृष्ट, मायेच्या दुधाला लागली. नाती मातीची - भाषेची, जगी ओळख लाभली. ऋण दुधाचे विसरू नका, विनवी मराठी माऊली.   © श्री रवीन्द्र देवघरे "शलभ' नागपूर. मो  9561117803. ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈...
Read More

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मायबोली मराठी.. ☆ सुश्री सुषमा गोखले

☆ कवितेचा उत्सव ☆ मायबोली मराठी.. ☆ सुश्री सुषमा गोखले ☆  मायबोली मराठी बोलीन सहर्षे सन्मान पालखीत मिरवीन कौतुके ज्ञानदेवीची आण, गौरव तिचा राखीन मेधा धृती मतीने रक्षेन प्राणपणाने राज्यभाषा  मराठीचा येवो उत्कर्षकाल जगद्वंद्य होऊनी राहो चिरंतर... सर्वात्मक श्रीहरीचा कमलकर राहो मस्तकी, मायमराठीवर ! सुषम. © सुश्री सुषमा गोखले शिवाजी पार्क – दादर मो. 9619459896 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈...
Read More

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी मराठी… ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी  ☆ कवितेचा उत्सव ☆ माझी मराठी... ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆   सदैव  माझ्या ओठी माझी माय मराठी   लेई शब्द पैठणी  जरतार त्यावरी घाले शब्दालंकार   सात्विक सालस नार वेळी होई ती धारदार   मुकुट तिचा एकार,ओकार, इकार कधीतरी रफार   पायी रुणझुणती उकार, बिन्दी भाळी अनुस्वार   कधी अर्ध,कधी पूर्णविराम कधी स्वल्प,कधी प्रश्न चिन्ह   कर्मणि,कर्तरी,प्रयोग, भावे भूत, वर्तमान,भविष्य, काळासवे   ज्ञानेश्वर आद्य उपासक समर्थ,तुका,नाथ पूजक राजा शिवबा असे रक्षक   अभंग,भजन,प्रवचन कीर्तन, चर्चा, भाषण   कथा, कादंबरी, कहाणी लोकगीत, पोवाडा, लावणी   भारूड, नाटक, नाट्यछटा, एकपात्री, विडिओ,सिनेमा   कित्येक पैलू आईचे या वाणी तोकडी वर्णाया   लेकरे अमाप,क्षेत्रे तिची मोठी वर्णू किती,मती माझी थिटी   माझ्या मराठीची अशीच ऐट विचारू नका तिचा थाटमाट   दर बारा कोसी भिन्न हिचा अवतार तरी एक असे ही माझी म्हराठ्ठी नार   © सौ. शशी नाईक-नाडकर्णी फोन  नं. 8425933533 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈...
Read More
image_print