मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ गणेश स्तवन ☆ – डॉ. रवींद्र वेदपाठक

डॉ. रवींद्र वेदपाठक

(प्रस्तुत है डॉ रवीन्द्र वेदपाठक जी की सुधाकरी काव्य रचना गणेश स्तवन . यह कविता मन स्पर्शी साहित्य मंच द्वारा आयोजित राज्यस्तरीय *सुधाकरी* काव्य रचना स्पर्धा के लिए  भी समर्पित है.)

 

☆  गणेश स्तवन ☆

 

नमो नमः आद्या ! नमो वेद पाद्या !!

चतुर्दश विद्या ! अनंताय !! १ !!

 

नमो शूर्पकर्णा ! नमो एकदंता !!

लंबोदरवंता ! गणेशाय !! २ !!

 

नमो शिवपुत्रा ! पार्वती नंदना !!

मुषक वाहना ! हेरंबाय !! ३ !!

 

शमीपत्र प्रिया ! दुर्वांकूर भाळी !!

शेंद्र गंड स्थळी ! अमेयाय !! ४ !!

 

तप्त हेम वर्णी ! सिंदुरवदनी !!

कृष्ण पिंगाक्षणी ! गजास्याय !! ५ !!

 

नागबंद कटी ! फरश तो करी !!

चंद्रबिंब शिरी ! सुमुखाय !! ६ !!

 

ललित लाघवी ! शतशब्द ब्रम्ही !!

गणाधिश स्वामी ! सर्वज्ञाय !! ७ !!

 

ब्रह्मसुखानंद ! शोभे लंब शुंड !!

करी विघ्न खंड ! करूणाय !! ८ !!

 

चतुर्भुज रूपा ! नमो विघ्नांतका !!

सर्वे सुखात्मका ! आनंदाय !! ९ !!

 

नित्य निराकार ! निर्गुण आकार !!

त्रिगुण साकार ! निरामय !! १० !!

 

प्रथम स्मरण ! साष्टांगी नमन !!

चरण वंदन ! शरण्याय  !! ११ !!

 

© डॉ. रवींद्र वेदपाठक

तळेगाव.

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 15 – सहवास……! ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।  मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ। पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजितजी की कलम का जादू ही तो है!  निश्चित ही श्री सुजित  जी इस हृदयस्पर्शी रचना के लिए भी बधाई के पात्र हैं। हमें भविष्य में उनकी ऐसी ही हृदयस्पर्शी कविताओं की अपेक्षा है।  श्री सुजित जी द्वारा डेढ़ दिन के गणपति जी  में स्वर्गीय पिता की डेढ़ दिन तक छवि देखना और उनके साथ रहने की कल्पना ही अद्भुत है. ऐसा सामंजस्य कोई श्री सुजित जी जैसा संवेदनशील कवि ही कर सकता है. प्रस्तुत है श्री सुजित जी की अपनी ही शैली में  हृदयस्पर्शी  कविता   “सहवास …! ”। )

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #15☆ 

 

☆ सहवास…! ☆ 

 

दर वर्षी मी घरी आणणा-या गणपतीच्या

मुर्तीत मला माझा बाप दिसतो

कारण…!

मी लहान असताना माझा बाप जेव्हा

गणपतीची मुर्ती घेऊन घरी यायचा

तेव्हा त्या दिवशी

गणपती सारखाच तो ही अगदी….

आनंदान भारावलेला असायचा

आणि त्या नंतरचा

दिड दिवस माझा बाप जणू काही

गणपती सोबतच बोलत बसायचा…

माझ्या बापानं केलेल्या कष्टाची आरती

आजही…

माझ्या कानातल्या पडद्यावर

रोज वाजत असते

आणि कापरा सारखी त्याची

आठवण मला आतून आतून जाळत असते

आज माझा बाप जरी माझ्या बरोबर नसला

तरी..,त्याच्या नंतर ही गणपतीची मुर्ती

मी दरवर्षी घरी आणतो

कारण.. तेवढाच काय तो

बापाचा..!

आणि

बाप्पाचा..!

दिड दिवसाचा सहवास मिळतो..!

 

© सुजित कदम, पुणे 

मो.7276282626

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ ☆ मानाचा मुजरा ! – मातोश्री बहिणाबाई चौधरी यांची १३९वी जयंती ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है.  आज उनकी प्रस्तुति है आदरणीया बहिणाबाई  के १३९वें जन्मदिवस पर विशेष प्रस्तुति.)

श्रीमती उर्मिला उद्धवराव इंगळे जी  के ही शब्दों में – 

-बहिणाबाई. या निरक्षर-अशिक्षित माऊलीने दारी आलेल्या ज्योतिषाला सुमारे १०० वर्षांपूर्वी हे खणखणीत सत्य सोप्या पण परखड भाषेत सुनावलं.

डोके(बुध्दी नाही म्हणत)गहाण ठेवून भविष्यादि अंधश्रध्दांपुढे सपशेल शरणागती पत्करणारी आजची तथाकथित थोर  उच्चविद्याविभूषित मनुक्षे बघतांना या माऊलीची थोरवी लख्ख होऊन समोर येते.

ह्या माउलीने शंभर वर्षांपूर्वी व्यक्त केलेली खंत आजही कायम आहे.

दंडवत माय !

स्मृतींना विनम्र अभिवादन ! !

 – श्रीमती उर्मिला उद्धवराव इंगळे

☆ मानाचा मुजरा !☆

(खानदेशकन्या मातोश्री बहिणाबाई चौधरी यांची आज १३९ वी जयंती.)

नको नको रे ज्योतिषा

माह्या दारी नको येऊ,

माह्य दैव मले कळे

माह्या हात नको पाहू.

 

धनरेषांच्या च-यांनी

तळहात रे फाटला,

देवा तुह्याबी घरचा

झरा धनाचा

आटला.

 

नशिबाचे नऊ ग्रह

तळहाताच्या रेघोट्या,

बापा नको मारू थापा

अशा उगा ख-या खोट्या.

-बहिणाबाई

 

प्रस्तुति – 

©®उर्मिला इंगळे, सातारा

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात # 15 – माझ्यानंतर ……. ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  उनकी ह्रदय स्पर्शी कविता माझ्यानंतर …….अर्थात मेरे बाद…. .  

मैंने सुश्री प्रभा जी की  पिछली कविता के सन्दर्भ में लिखा था कि वे जानती हैं  – समय गहरे  से गहरे घाव भी भर देता है. हम कल रहें या न रहें यह दुनिया वैसे ही चलती रहेगी और चलती रहती है.   इस कविता में उन्होंने अपने भविष्य की परिकल्पना की है.  उस परिकल्पना को न तो मैं नकारात्मक सोच में परिभाषित कर पा रहा हूँ और न  ही सकारात्मक.   क्योंकि, कल हमारा न होना तो शाश्वत सत्य है.  शायद, सुश्री प्रभा जी नहीं जानती कि उनके प्रकाशक और पाठक उनकी रचनाएँ  उनके मोबाईल / डायरी और जहाँ कही भी रखी हों , उन्हें जरूर ढूंढ लेंगे . आपकी ग़ज़लों को गायिका  आपकी गजलों को स्वर देकर अमर कर देंगी. आपके  परिवार की वो महत्वपूर्ण तथाकथित सदस्या “घुंघराले बालों वाली पोती/नातिन” उन्हें पुनः नवजीवन देने का सामर्थ्य रखेंगी. 

आपका एक एक पल अमूल्य है . आप नहीं जानती जो रचना संसार  रच रही हैं , वह साहित्य नहीं  इतिहास रचा जा रहा  है.  २०१७ की कविता अपने आप में इतिहास है. यात्रा जारी रहनी चाहिए….. . आपकी संवेदनशील कवितायें पाठकों में संवेदनाएं जीवित रखती हैं. 

सुश्री प्रभा जी का साहित्य जैसे -जैसे पढ़ने का अवसर मिल रहा है वैसे-वैसे मैं निःशब्द होता जा रहा हूँ। हृदय के उद्गार इतना सहज लिखने के लिए निश्चित ही सुश्री प्रभा जी के साहित्य की गूढ़ता को समझना आवश्यक है। यह  गूढ़ता एक सहज पहेली सी प्रतीत होती है। आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 15 ☆

 

☆ माझ्यानंतर ……☆

 

कोणीच वाचणार नाहीत माझी कवितेची पुस्तके ……

डायरीतली कविता राहील पडून….

एमिली डिकिन्सन च्या

कवितांसारखी कुणी आणणार नाही प्रकाशात !

 

मोबाईल मधेही असतीलच काही कविता  …..

त्यांचा कोणी शोध घेणार नाही ….

 

गायकाने दर्दभ-या

आवाजात गायलेली

माझी गजल ऐकणारही

नाही कोणी …..

 

जिवंतपणी मला नाकारणारे ,

का कवटाळतील मला

मृत्यूनंतर ????

 

कुणी घालू नये हार

माझ्या फोटोला ,

पिंडाला कावळा

शिवतो की नाही

हे ही पाहू नये,

याची तजवीज मी आधीच करून ठेवलेली असेल—

देहदानाने !

 

माझी स्मृतिचिन्हे फोटोंचे अल्बम

धूळ खात पडून राहतील काही दिवस

नंतर नामशेष होतील !

 

संपून जाईल माझे

खसखशी एवढे अस्तित्व  —

 

पण माझ्या नातवाला

होईल कदाचित

एक कुरळ्या केसाची मुलगी —-

 

आणि ती मी च असेन !!

 

© प्रभा सोनवणे,  

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ महापूर ☆ – डॉ. रवींद्र वेदपाठक

डॉ. रवींद्र वेदपाठक

(प्रस्तुत है डॉ रवीन्द्र वेदपाठक जी की एक  सामयिक मराठी कविता  “महापूर”।) 

☆  महापूर ☆

 

संथ संत कृष्णामाई

झाली भलती अधीर

आली पाहुणा घेवून

नाव त्याचे महापूर……..!! १ !!

 

व्याकुळला ओला जीव

जणू गायीचा हंबर

सांज बुडता बुडता

कासावीस ते अंबर……..!! २ !!

 

दंश भिनला देहात

रानी पेटले काहूर

वाहणाऱ्या वेदनेची

हुळहुळे हूरहूर………!! ३ !!

 

मनस्विनी कृष्णामाई

छेडी दुःखाची लहर

संधिकाळी आक्रोशतो

ऊरी जीवांचा कहर……..!! ४ !!

 

मानवाच्या काळजात

जागविले देवघर

मनोमनी पालविले

चैतन्याचे औदुंबर………!! ५ !!

 

© डॉ. रवींद्र वेदपाठक

तळेगाव.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #15 – अमृताचा गोडवा * ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज साप्ताहिक स्तम्भ  – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक सामयिक एवं सार्थक कविता “अमृताचा गोडवा”।)

 ☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 15☆

 

? अमृताचा गोडवा ?

 

गोडकंठी सूर अन् शब्दातही शालीनता

मधुरताही शरण येते रसिकतेची मान्यता

 

पाहडी आवाज होता रागही तो पाहडी

सप्तसूरांचे कबीले अन् पहाटे सांगता

 

संतही रंगून जाती कीर्तनाच्या संगती

आळवीताना प्रभूला त्यात वाटे धन्यता

 

सात सूरांचे हजारो राग झाले या इथे

वर्ज होतो सूर कोणी ना तरीही खिन्नता

 

कान माझे पीत होते अमृताचा गोडवा

मैफिलीचे काय वर्णू केवढा हा राबता

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

ashokbhambure123@gmail.com

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ रंजना जी यांचे साहित्य #-14 – कविता /चारोळी – सांजवात ☆ – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे।  आज  प्रस्तुत है संध्या -वंदना पर आधारित कविता/चारोळी – “सांजवात। )

 

? साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य #- 14? 

 

? कविता/चारोळी -सांजवात  ?

 

सांजवातीचा प्रकाश

जिजाऊनीं सार्थ केला।

शिवबांच्या संस्कारात

महाराष्ट्र उजळला।

 

सांजवात लावूनिया

जपू थोर परंपरा ।

देऊ संस्कार शिदोरी

ज्ञान विज्ञान उद्धारा।

 

बीज संस्काराचे पेरू

सांजवातीच्या साक्षीने।

ज्योत ज्ञानाची पेटवू

विज्ञानाच्या सोबतीने।

 

घरोघरी प्रकाशावी

सद्विचारी सांजवात।

धुरा देशाची पेलण्या

संस्कारीत हवे हात।

 

©  रंजना मधुकर लसणे✍

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ श्री गणेश चतुर्थी विशेष ☆ चिंतामणि चारोळी आणि गौराई ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. उनकी  श्री गणेश चतुर्थी के शुभ अवसर पर  श्री गणेश जी और गौरी जी की दो सामयिक रचनाएँ  चिंतामणि चारोळी आणि गौराईअष्टाक्षरी छंद कविता के स्वरुप में प्रस्तुत हैं.)

 

एक 

☆ चिंतामणि चारोळी ☆

श्री गणेशा गणेशा

झाले तुझे आगमन

मूर्ती पाहून तुझीरे

तृप्त जाहले हो मन !!१!!

तुझे होता आगमन

आम्हा होई ब्रह्मानंद

घरदार उत्साहात

होई सर्वांना आनंद !!२!!

तुझ्यासाठी बघ केले

किती सुरेख मखर

त्यात बैसवुनी तुला

म्हणू आरती सुस्वर !!३!!

तुला वाहण्यासाठीच

पत्री फुले सुवासिक

तुला फाया अत्तराचा

तूच आहेस रसिक !!४!!

तुझ्या आरतीला बघ

सारे कसे गोळा झाले

नेवैद्यासाठी मोदक

उकडीचे बघ केले !!५!!

गूळ नारळ घालून

केले सारण तयार

वेलदोड्यांचा मसाला

झाले मोदक सुंदर!!६!!

मोदकाच्या सारणात

खूप खुलून सुंदर

किती दिसते मोहक

काश्मीरचे ते केशर !!७!!

गणेशाला वाहताती

एकवीस दुर्वाजुडी

शमी माका जाईजुई

तुला केवडा आवडी !!८!!

माका आहे रसायन

मूत्रपिंडाचा आजार

त्वचारोग विंचूदंश

प्रभावी या रोगांवर!९!!!

तुला आवडती फुले

मधुमालती सुंदर

सांधेदुखी कमी होई

फुफ्फुसांचे ते आजार !!१०!!

हा केवडा सुवासिक

सागराच्या काठावर

थायरॉईड घशाच्या

गुणकारी रोगांवर !!११!!

बेलपत्र शंकरांचे

आहे औषध छान ते

पोटातील जंतांवर

उष्णता कमी करीते!!१२!!

रुई मांदार प्रसिद्ध

अहो हत्तीरोगावर

अति उत्तम औषध

कुष्ठरोगावर फार !!१३!!

तुला आवडे आघाडा

फुले जाईची हो खास

निळी गोकर्ण रंगाची

तुझी आवड विशेष!!१४!!

फुले हादगा देखणी

लागे भाजी छान त्यांची

जीवनसत्वे अनेक

हीच ओळख फुलांची !!१५!!

 

दोन

गौराई ☆

आल्या आल्या गौरीबाई

स्वागत करा हो खास

बसायला द्या हो पाट

करा त्यांची उठबस !!१६!!

दारी सुंदर रांगोळी

काढुनिया ठिपक्यांनी

करा आगत स्वागत

घरच्या सुवासिनींनी!!१७!!

वाजवीत चला घंटा

द्यावे मुलींच्या हातात

निरांजन तबकात

त्यात घाला फुलवात !!१८!!

हळदी कुंकाचा मान

त्यांना देऊनिया छान

त्यांचे करुनी औक्षण

करा त्यांचा हो सन्मान !!१९!!

आल्या गौराई गौराई

हाती कडे पायी तोडे

पैंजणाची रुणझुण

पहा वाजती चौघडे !!२०!!

आल्या गौराई गौराई

नाकी नथ ती सुंदर

कानी बाळी ती बुगडी

शालू नेसल्या सुंदर!!२१!!

गळा साजाचं डोरलं

झुमझुम कंकणांची

ध्वनि मधुर नादात

ओढ माहेर घरची !!२२!!

आल्या गौराई गौराई

त्यांची पाऊले सोन्याची

करा त्यांना लिंबलोण

करा आरास घराची !!२३!!

आल्या गौराई गौराई

भरजरी शालू त्यांना

नेसवा नीटनेटके

ओटी सुंदर भरा ना !!२४!!

ओटीत गं त्यांच्या घाला

जरी खण व नारळ

लवंग नि वेलदोडे

हळकुंडे व तांदूळ!!२५!!

गौराबाईंना आवडे

माका आघाडा मरवा

शमी दुर्वा बेलपत्री

आणि केवडाही हवा!!२६!!

पत्री सगळी औषधी

दुर्वा उष्मा कमी करी

दातांसाठी आघाड्याचा

उपयोग होई भारी !!२७!!

आल्या आल्या हो गौराई

करा नेवैद्य पोळीचा

चला पुरण शिजवा

भात वासाच्या साळीचा !!२८!!

करा पुरणाचे दिवे

त्यांना औक्षण कराया

हळद कुंकू लावुनी

त्यांचा सन्मान कराया !!२९!!

थाट हळदी कुंकाचा

होई सप्तमी दिवशी

गोड मिठाई फळांची !

खेळण्यांची रास खाशी !!३०!!

झाल्या प्रसन्न गौराई

देती तुम्हा आशीर्वाद

लाभो ऐश्र्वर्य सर्वांना

नांदो घरात आनंद !!३१!!

©®उर्मिला इंगळे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ श्री गणेश चतुर्थी विशेष ☆ चिंतामणी चारोळी ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्री गणेश चतुर्थी विशेष

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(प्रस्तुत है श्री गणेश चतुर्थी के शुभ अवसर पर वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी द्वारा रचित  चिंतामणी चारोळी .)

 

☆ चिंतामणी चारोळी☆

 

गौरीपुत्रा विनायका

तूच बुद्धीची देवता

तूच हेरंब गणेशा

तूच ऐश्र्वर्य प्रदाता !!६!!

 

सिध्दी विनायका राजा

आशीर्वादे एकदंता

बुद्धी लाभते सर्वांना

अशी आहे हो वदंता !!७!!

 

तूच सत् चिदानंदा

तूही गुणत्रयातीता

तूहीच आनंदमया

तुम्ही वाङमय असता!!८!!

 

तूही ब्रह्मचि असता

ज्ञान आहात तुम्हीच

तुम्हीच हो ब्रह्मानंदा

आनंदकंदा तुम्हीच !!९!!

 

सर्व सर्वांचे ऐकावे

म्हणूनी कान सुपाचे

सोंड वाकुडी करुनी

खाता मोदक तुपाचे !!१०!!

 

तुज म्हणे लंबोदर

बरे वाईट पोटात

सर्वांचे सामाऊनिया

घेतसे तू उदरात !!११!!

 

तूच असे विघ्नहर्ता

तूच असे सुखकर्ता

लोक तुज ओळखती

तूच असे दु:खहर्ता!!१२!!

 

तुझी असे स्थूलतनु

तूच गजेंद्र वदन

तूच शैलसुतासुत

तूच असे गजानन !!१३!!

 

तूच चिन्मय अससी

तुज आवडे जास्वंद

तूच भक्तांना देतसे

सुंदर शुभाशीर्वाद !!१४!!

 

श्री गणेशाला नमन

वेदातील तत्वज्ञान

तूच आहेस रे ब्रह्म

तूच करिसी रक्षण !!१५!!

 

तू आहेस शब्दमय

सत्यमय ब्रह्ममय

सार अद्वैत जगाचे

तूचि तू विज्ञानमय !!१६!!

 

तू सर्व आकाशमयी

तूच वायू जल भूमी

योगी ध्यायती तुजसी

सर्व विद्यांचा तू स्वामी!!१७!!

 

तूचि उत्साहवर्धक

एकदन्त चार हात

रंग लाल मोठे पोट

पाश अंकुश हातात !!१८!!

 

व्रातपती गणपती

लंबोदर प्रजापती

शिवसूत विघ्ननाशी

तू असे वरदमूर्ती !!१९!!

 

अथर्वशीर्षाचे फळ

जो करितो अध्ययन

धर्म मोक्ष अर्थकाम

त्यास न बाधेल विघ्न !!२०!!

 

अभिषेक करणारा

वक्ता उत्तम होईल

चतुर्थीचा उपवास

विद्यावान तो होईल !!२१!!

 

असे आहे सांगितले

त्याच अथर्व ऋषींनी

करा दुर्वांनी हवन

होई तोचि बुद्धिमानी !!२२!!

 

करा दुर्वांनी हवन

होई कुबेर श्रीमंत

देई हजार मोदक

फळ मिळेल इच्छित !!२३!!

 

तूप समिधा हवन

त्याला मिळेल सर्वही

जो जाणतो रहस्य हे

तो होईल सर्वज्ञही !!२४!!

 

भाळावर तो शेंदूर

दिसतो शोभायमान

तूच की रे स्थूलतनु

तूच गजेंद्र आनन !!२५!!

 

!!ॐ!!

 

©®उर्मिला इंगळे

दिनांक:२-९-१९

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 14 – वासरू……! ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।  मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ। पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजितजी की कलम का जादू ही तो है!  निश्चित ही श्री सुजित  जी इस सुंदर रचना के लिए भी बधाई के पात्र हैं। हमें भविष्य में उनकी ऐसी ही हृदयस्पर्शी कविताओं की अपेक्षा है। ऋण के बोझ तले दबे किसान को आत्महत्या करने से रोकने के लिए इससे बेहतर हृदयस्पर्शी कविता नहीं हो सकती ।  काश कोई उस किसान को उसके पुत्र/पुत्री की मनोव्यथा से अवगत करा सके।  प्रस्तुत है श्री सुजित जी की अपनी ही शैली में  हृदयस्पर्शी  कविता   “वासरू…! ”। )

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #14☆ 

 

☆ वासरू…! ☆ 

 

कसं सांगू

आजकाल शाळेत जायची सुद्धा

भिती वाटायला लागलीय…

जेव्हा पासून

माझ्या मित्राच्या बानं

कर्जापाई आत्महत्या केलीय ना

तेव्हापासून तर . . .

जरा जास्तच…,

शाळा सुटल्यावर कधी एकदा घरी येऊन

बापाला पाहतेय असं होत..

अन् बापाच्या कुशीत शिरल्यावर

काळजीचं भूत एकाएकी गायब होतं….

खरंच सांगतो बा मला

काहीच नको देऊ…

आणि आम्हाला सोडून बा . . .

तू कुठंच नको जाऊ….

दोन दिवस झाले बा. . . मी

कासरा दप्तरात घेऊन फिरतोय….

अन् तुझ्यासाठी जीव माझा

आतून हुंदके देऊन रडतोय…

बा.. तू समोर असलास ना

की भूक सुध्दा लागत नाही

अन् तुझ्या काळजीने

रात्र रात्र झोप सुध्दा

लागत नाही…..

काही झालं तरी बा…

आत्महत्ये सारखा विचार तू

डोक्यामध्ये सुध्दा आणू नको…

आणि तुझं हे वासरू

तुझ्यासाठी झुरतय इतकं

विसरू नको. . . !

 

© सुजित कदम, पुणे 

मो.7276282626

 

Please share your Post !

Shares