मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ त्रिपुरसुंदरी अष्टकम् ॥ – रचना : जगद्गुरु आदि शंकराचार्य ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ त्रिपुरसुंदरी अष्टकम् ॥ – रचना : जगद्गुरु आदि शंकराचार्य ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

कदम्बवनचारिणीं मुनिकदम्बकादम्बिनीं 

नितम्बजित भूधरां सुरनितम्बिनीसेविताम् ।

नवाम्बुरुहलोचनामभिनवाम्बुदश्यामलां 

त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये ॥ १॥

*

कदम्बवनवासिनीं कनकवल्लकीधारिणीं 

महार्हमणिहारिणीं मुखसमुल्लसद्वारुणीम् । 

दयाविभवकारिणीं विशदलोचनीं चारिणीं 

त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये ॥ २॥

*

कदम्बवनशालया कुचभरोल्लसन्मालया 

कुचोपमितशैलया गुरुकृपालसद्वेलया ।

मदारुणकपोलया मधुरगीतवाचालया 

कयाऽपि घननीलया कवचिता वयं लीलया ॥ ३॥

*

कदम्बवनमध्यगां कनकमण्डलोपस्थितां 

षडम्बुरुहवासिनीं सततसिद्धसौदामिनीम् ।

विडम्बितजपारुचिं विकचचंद्रचूडामणिं 

त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये ॥ ४॥

*

कुचाञ्चितविपञ्चिकां कुटिलकुन्तलालंकृतां 

कुशेशयनिवासिनीं कुटिलचित्तविद्वेषिणीम् ।

मदारुणविलोचनां मनसिजारिसंमोहिनीं 

मतङ्गमुनिकन्यकां मधुरभाषिणीमाश्रये ॥ ५॥

*

स्मरप्रथमपुष्पिणीं रुधिरबिन्दुनीलाम्बरां 

गृहीतमधुपात्रिकां मदविघूर्णनेत्राञ्चलां ।

घनस्तनभरोन्नतां गलितचूलिकां श्यामलां 

त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये ॥ ६॥

*

सकुङ्कुमविलेपनामलकचुंबिकस्तूरिकां 

समन्दहसितेक्षणां सशरचापपाशाङ्कुशाम् ।

अशेषजनमोहिनीमरुणमाल्य भूषाम्बरां 

जपाकुसुमभासुरां जपविधौ स्मराम्यम्बिकाम् ॥ ७॥

*

पुरंदरपुरंध्रिकां चिकुरबन्धसैरंध्रिकां 

पितामहपतिव्रतां पटपटीरचर्चारताम् ।

मुकुन्दरमणीमणीलसदलंक्रियाकारिणीं 

भजामि भुवनांबिकां सुरवधूटिकाचेटिकाम् ॥ ८॥

*

॥ इति श्रीमद् शंकराचार्यविरचितं त्रिपुरसुन्दरीअष्टकं ॥

*

भावानुवाद … 

*

कदम्बविहरी ऋषीमुनि जिच्या पदा सेविता

जगा जिंकिले जिने असुन विश्व नीयंत्रिता

त्रिनेत्रि त्रयदेवि पद्मनयना जगा धारिणी

शिवास अति लाडकी शरण पातलो पद्मिनी ॥१॥

*

कदम्ब रहिवासिनी कनकवल्कले धारिणी

महामणि धरी सुरेख मुख ब्रह्म देहांगिणी

करूण धनदायिनी अमल नेत्र तेजस्विनी

शिवास अति लाडकी शरण पातलो पद्मिनी ॥२॥

*

निवासिनि वनी कदम्ब धनभार वक्षांवरी

नगासम विशाल वक्ष गुरुची कृपा सागरी

मधूर लहरी जिभेवर अरूण  भालावरी

सुरक्षि सकला जणू कवच दाट कायेवरी ॥३॥

*

कदम्ब वनि जाशि हेमवलयांकिता होउनी

षडम्बु कमलवासिनी सततसिद्ध सौदामिनी

सुशोभित सरोज तेज तुज चंद्रचूडामणी  

शिवास अति लाडकी शरण पातलो पद्मिनी ॥४॥

*

उरोज वरती विणा कुरळ कुंतला शोभुनी

विसाव कुश लेटुनी कुटिल बुद्धिची द्वेषिणी

मधाळ नयना अरूण  मनजास  संहारिणी

नमीत गजसाधु आश्रय मधूर संभाषिणी ॥५॥

*

प्रिया सुमन आद्य बिंदु रुधिरा सुनीलांगणी

मधूर मधुपात्र हाति फडके जिची पापणी

विशाल घन उन्नत स्तन बटा  वरी लोंबती

त्रिलोचन कलत्र आश्रयि पदा तुझ्या लागती ॥६॥

*

गळा सजविती  रुधीर कुसुमाम्ल गुंफीयले

करात  शरचाप अंकुश धरी नयन तोषले

समस्त जन मोहुनी तिज फुले वसन अर्पिती 

विधी जप करोनिया स्मरण पार्वती जागृती ॥७॥

*

पुरंदर पुरंध्रिका प्रिति चिकूर आभूषण

पितामह-पतिव्रता फडफडे पटा भूषण

गळावर उमेचिया बहुत मौक्तिके शोभुन

शिरी मणि मुकूट रूपवतिसी भजू पूजन ॥८॥

*

॥ इति श्रीमद् शंकराचार्यविरचित निशिकान्त भावानुवादित त्रिपुरसुन्दरीअष्टक संपन्न ॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३०२ ☆ पाळ तोच वारसा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३०२ ?

☆ पाळ तोच वारसा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

मोहजाळ भोवताल पोसलेस माणसा

सर्व राहते इथे नको करूस लालसा

*

रूप देखणे तरी अशांत चंद्र वाटतो

टाळतोय नेत्र धूर्त पाहतोय आरसा

*

मोह टाळ चादरीत मागतोस काय तू

ओंजळीत दान घे पुरेल एवढा पसा

*

वादळात का तुला असे उदास वाटते

दाखवून दे जगास तू कुठे असा तसा

*

दान धर्म पुण्य कर्म सागतात धर्म हे

त्यातलाच पंथ एक थोर होय खालसा

*

माणसास या इथे गुलाम तू करू नको

नेक काम कर असेच पाळ तोच वारसा

*

ठेच लागली म्हणून थांबणे नको इथे

वागणे असेच ठेव वाहतो झरा जसा

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रद्धा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रद्धा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

नासा’चा नि भक्तीवासाचा

तसा कसलाही भेद नाही श्रध्देत

एक विज्ञानात बोलतो, दुसरा ज्ञानात

देव सर्वत्रच कर्तव्याचे ठेवीत असतो भान

जसा अंतरी नाचतो आनंद

सौख्यभरे

तसा अप्रत्यक्ष दर्शनार्थी’मिडीया’

माध्यमातून

फक्त आपण क्रियेत रहावे

आळवत भक्ती अंतरंग,

कधी अभंगात, ध्यानस्थी

तर कधी पुजा-पाठ नि त्याच्याच नामजप अथवा नामघोषात.

उमटतात अक्षरे ग्रथातील प्रत्येक

पानात

कधी अध्यात्म अध्याय होऊन,

तर कधी वेबसाईटवर ऐप्सद्वारे,

जिथे न दिसतो, तिथेच वसतो

अवकाशात फिरतो भौतिकातून,

आप तेज वायू पृथ्वी आकाश व्यापून

धरतीवर पुन्हा मुर्ती स्तब्ध

कधी मंदिर-मठ नि आश्रमातून

घंटानादात संत नि आधुनिक

संशोधकांच्या दैववादात.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ श्री जगद्धात्री स्तोत्रम् ॥ ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ श्री जगद्धात्री स्तोत्रम् ॥ ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

आधाररूपे चाधेये धृतिरूपे धुरन्धरे । 

ध्रुवे ध्रुवपदे धीरे जगद्धात्रि नमोऽस्तु ते ॥ १॥ 

*

शिवाकारे शक्तिरूपे शक्तिस्थे शक्तिविग्रहे । 

शाक्ताचारप्रिये देविजद्धात्री नमोस्तु ते ॥२॥ 

*
जयदे जगदानंदे जगदेकप्रपूजिते । 

जय सर्वगते दुर्गे जगद्धात्रि नमोऽस्तु ते ॥ ३॥ 

*
सूक्ष्मातिसूक्ष्मरूपे च प्राणापानादिरूपिणि । 

भावाभावस्वरूपे च जगद्धात्रि नमोऽस्तु ते ॥ ४॥ 

*
कालाधिरूपे कालेशे कालाकालविभेदिनि । 

सर्वस्वरूपे सर्वज्ञे जगद्धात्रि नमोऽस्तु ते ॥ ५॥ 

*

महाविघ्ने महोत्साहे महामाये वरप्रदे । 

प्रपञ्चसारे साध्वीशे जगद्धात्रि नमोऽस्तु ते ॥ ६॥ 

*
आगम्ये जगतामाद्ये माहेश्वरि वराङ्गने । 

अशेषरूपे रूपस्थे जगद्धात्रि नमोऽस्तु ते ॥ ७॥ 

*
तीर्थयज्ञा -तपोदान-योगसारे जगन्मयि । 

त्वमेव सर्वं सर्वस्थे जगद्धात्रि नमोऽस्तु ते ॥ ८॥ 

*
दयारूपे दयादृष्टे दयार्द्रे दुःखमोचनि । 

सर्वापत्तारिके दुर्गे जगद्धात्रि नमोऽस्तु ते ॥ ९ ॥ 

*
आगम्यधाम-धामस्थे महायोगीशहृत्पुरे । 

अमेयभावकूटस्थे जगद्धात्रि नमोऽस्तु ते ॥ १०॥ 

*
॥ इति श्रीजगद्धात्रीस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

 *

☆ मराठी भावानुवाद  ☆

*

ब्रह्मांडाचा आधार संतोषी अतीत आकलनाला

सृष्टीधारिणी शाश्वत नमन अचल जगद्धात्रीला ॥१॥

*

शिवाकारी शक्तीरूपी विग्रह शक्तीचा जिला

शाक्तानुष्ठान प्रिय नमन करीतो जगद्धात्रीला ॥२॥ 

*

विजयदात्री आनंददायी शक्ती अमोघ अर्चनेला

जय सर्वगते दुर्गे नमन त्या जगद्धात्रीला ॥३॥

*

प्राणापान प्राणवायु सूक्ष्मातिसूक्ष्म जीवनशक्तीला

भावाभावस्वभाव रूपिणी नमन अशा जगद्धात्रीला ॥४॥

*

सूक्ष्म कालखंडातुनी समस्त व्यापिलेस तू सृष्टीला

सर्वव्यापि सर्वरूपी सर्वज्ञ नमन स्वयंभू जगद्धात्रीला ॥५॥

*
उत्साह भ्रम वा बाधा अस्तित्व सदैव वर द्यायाला

शक्तिरूपिणी विराटपुरुषाची नमन विशाल जगद्धात्रीला ॥६॥ 

*

ब्रह्मांडमूल अनाकलनीय वरांगने माहेश्वरी तुजला

अशेषरूपी अनंतरूपी नमन सृष्टीक्रिडा जगद्धात्रीला ॥७॥

*

तीर्थ यज्ञ तपोदान योग सकलांच्या साराला

तूचि सर्व सर्वात तूहि नमन सर्वव्यापि जगद्धात्रीला ॥८॥

*
दयारूपी कारुण्यदृष्टी करुणाभाव हारी दुःखाला

सर्वशक्ती अधिष्ठाती नमन दुर्गादेवी जगद्धात्रीला ॥ ९ ॥

*

निकेत धामाला यावे योगी हृदयी निवासाला

शिखरी भावांच्या दिव्य नमन देवी जगद्धात्रीला ॥१०॥

*

॥ इति निशिकान्त भावानुवादित श्रीजगद्धात्रीस्तोत्र सम्पूर्ण ॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नमोस्तु दुर्गे ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ नमोस्तु दुर्गे ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

नारी शक्ती असते भारी 

देई प्रत्‍यय प्रसंगोत्‍पात,

तूच मायेचा असशी झरा 

किमया दाविसी विश्वात!*

होम करुनी अष्टमीला

तुझे स्तवन करती भक्त,

रात जागवुनी सारेजण

खेळती दांडिया मनसोक्त!

*

कधी होऊनि रणचंडीका 

करशी पाडाव दैत्याचा,

येता कोणी शरण तुजला 

उद्धार करशी त्याचा!

*

नऊ दिसाचे नऊ रंग 

शोभून दिसती तनुवरी,

तूच एक जगन्माता

साऱ्या विश्वाची संसारी!

*

अष्टभुजांनी सांभाळशी 

सकल विश्वाचा पसारा,

नमन करुनी आदिमायेस

करू साजरा दशमीला दसरा!

…करू साजरा दशमीला दसरा!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सारेच कर्मयोगी… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सारेच कर्मयोगी…? श्री आशिष  बिवलकर ☆

कर्मयोगी पहा | एका चौकटीत |

सर्व समर्पित | समाजासी ||१||

*

बाबा आणि माई | कुष्ठरोगी सेवा |

मानवता ठेवा | जीवनात ||२||

*

प्रकाशाची वाट | होती अवघड |

तिची धडपड | त्याच्या संगे ||३||

*

दिगंत आरती | आणि अनिकेत |

तत्पर सेवेत | वारसाने ||४||

*

हेमलकसात | प्रकल्प उभारी |

लोक बिरादरी | सेवाकार्य ||५||

*

वन्यजीव सेवा | आरोग्य शिक्षण |

कार्य विलक्षण | निस्वार्थाने ||६||

*

साधेपणा हाच | शोभे अलंकार |

नसे अहंकार | आमटेंना ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जाच… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ जाच… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

 

खेळ आहे माध्यमांचा

वास्तवाला टाळण्याचा

*

आत्मप्रौढी सांगणा-या

वीट आला भाषणांचा

*

गौरवाचे गीत गाता

तोल जातो लेखण्यांचा

*

बोलतो रेटून खोटे

प्रश्न नाही लाजण्याचा

*

हे कुठे स्वातंत्र्य आहे

डाव आहे कोंडण्याचा

*

ऐतखाऊ माणसाला

छंद नाही राबण्याचा

*

वारसा जपतोय आम्ही

जीवघेण्या श्वापदांचा

*

जाचणारा जाच आहे

भोगवादी भाकितांचा

*

राजवाड्याच्याच झाला

कोंडवाडा शापीतांचा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झेप घे आकाशी… ☆ सुश्री प्राची जोशी ☆

सुश्री प्राची जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ झेप घे आकाशी… ☆ सुश्री प्राची जोशी ☆

गुंतूनी नकोस होऊ,

तू तुलाच परकी सखे…

आस ही अंतरीची,

तुझ्या मनी अशी दिसे..

*

मन गुंतता होई गुंता,

कधीही न तो उलगडे…

कशी आणावी शांतता,

भावबंध हा मना जडे…

*

हो मोकळी तू अशी की,

हसले जणू चंद्र चांदणे...

मुक्त मनाने तूही मग,

पेलवतेस हे जिंकणे… 

 *

घे भरारी अशी गगनी,

गाठूनी तयांची शिखरे…

सखे डोळ्यांत तुझ्या ही

दिसे तुज प्रतिबिंब नवे…

*

बंध मोकळे झाले असे,

की खळखळणारा झरा…

सखे तुझी तूच आहेस,

एक अमूल्य आनंदाचा ठेवा…

*

तूच माता तूच दूर्गा,

तूच भवानी नी अंबिका…

शरण येती सर्व सत्याला,

सखे ठेव लक्षात आता…

*

खरंच हो मोकळी सखे,

झेप घे तू आकाशी…

स्वागता तुझ्या उभे आहे,

जग हात पसरूनी…

 जग हात पसरूनी…

©  सुश्री प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ देवी अन्नपूर्णा स्तोत्रम् ॥ – रचना : श्री आदिशंकराचार्य ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ देवी अन्नपूर्णा स्तोत्रम् ॥ – रचना : श्री आदिशंकराचार्य ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मराठी भावानुवाद

नित्यानंदकरी वराभ्यकरी सौंदर्यरत्नाकरी

निर्धूताखिलघोरपावनकरी प्रत्यक्षमहेश्वरी ।

प्रलेयाचलवंशपावनकरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलंबनकारी मातान्नपूर्णेश्वरी ॥१॥

*
नानारत्नविचित्रभूषणकरी हेमाम्बराडम्बरी 

मुक्ताहारविलम्बमानविलसद्वक्षोजकुंभान्तरी ।

कश्मीरागुरुवासिताङ्गुरुचिरा काशीपुराधीश्वरी 

भिक्षां देहि कृपावलंबनकारी मातान्न्पूर्णेश्वरी ॥२॥

*
योगानंदकरी रिपुक्ष्यकारी धर्मार्थनिर्ताकारी 

चंद्रार्कनलाभासमालाहरि त्रैलोक्यरक्षाकारी ।

सर्वैश्वर्यसमस्तावनचित्रकारी काशीपुराधीश्वरी 

भिक्षां देहि कृपावलंबनकारी मातान्नपूर्णेश्वरी ॥३॥ 

*
कैलासाचलकंदरालयकरी गौरी उमा शंकरी 

कौमारी निगमार्थगोचरकरी ॐकारबीजाक्षरी ।

मोक्षद्वारकपाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी 

भिक्षां देहि कृपावलंबनकरी मातन्नपूर्णेश्वरी ॥४॥ 

*

दृश्यादृश्यविभूतिवाहनकारी ब्रह्माण्डभांडोदरी 

लीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपाङ्कुरी ।

श्रीविश्वेष्मनःप्रसादनकरी काशीपुराधीश्वरी 

भिक्षां देहि कृपावलंबनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥५॥ 

*
उर्वीसर्वजनेश्वरी भगवती माताअन्नपूर्णेश्वरी 

वेणीनीलसमानकुन्तलहरी नित्यान्नदानेश्वरी ।

सर्वानंदकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी 

भिक्षां देहि कृपावलंबनकारी मातन्नपूर्णेश्वरी ॥६॥ 

*
अक्षान्तसमस्तवर्णनकारी शम्भोस्त्रिभावाकरी 

काश्मीरीआदिरात्रिजलेश्वरी त्रिलहरी नित्याङकुरा शर्वरी ।

कामकाङ्करी जनोदयकारी काशीपुराधीश्वरी 

भिक्षां देहि कृपावलंबनकारी मा तन्नपूर्णेश्वरी ॥७॥ 

*
देवी सर्वविचित्ररत्नार्चिता दाक्षायणि सुन्दरी 

वामे स्वपयोधरप्रियकारी सौभाग्यमाहेश्वरी ।

भक्ताभीष्टकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी 

भिक्षां देहि कृपावलंबनकारी मातन्नपूर्णेश्वरी ॥८॥ 

*
चंद्रार्कनलकोटिकोटिसदृशा चंद्रांशुबिम्बाधारी 

चंद्रार्ककाग्निसमानकुंडलधारी चंद्रार्कवर्णेश्वरी ।

मालापुस्तकपाशसाङकुशधारी काशीपुराधीश्वरी 

भिक्षां देहि कृपावलंबनकारी मातन्नपूर्णेश्वरी ॥९॥ 

*

क्षत्राणकरी महाऽभयकरी माता कृपासागरी 

साक्षणमोक्षकरी सदा शिवकरी विश्वेश्वरश्रीधारी ।

दक्षाक्रंदकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी 

भिक्षां देहि कृपावलंबनकारी मातान्नपूर्णेश्वरी ॥१०॥ 

*
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे ।

ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ॥११॥

*

॥इति श्रीआदिशंकराचार्य रचित देवी अन्नपूर्णा स्तोत्रम् संपूर्णम्॥

☆ 

भावानुवाद – 

*
अभयदायी लावण्याची रत्नाकर नित्यानंदकारी

घोर पीडा विषास स्पर्शे पावन करी प्रत्यक्ष महेश्वरी

हिमगिरीवंशा पवित्र केले काशीपुरी देवी ईश्वरी

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा माता अन्नपूर्णेश्वरी ॥ १॥

*
सुवर्णवसने शोभुन दिसती रत्ने विविध भूषयती

वक्षावरी रुळती मालामौक्तिक उरोजांमध्ये झळकती

सुगंधित काया करीत केशर अगरू काशीपुराधीश्वरी

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा माता अन्नपूर्णेश्वरी ॥२॥

*
वासनानाशकारी योगानंददायी धर्मअर्थनिष्ठाकारी

अग्नीसूर्यचंद्रभास तेजोलहर त्रिलोक रक्षणकारी

समृद्धीदायी कामनापूर्ती महादेवी काशीपुराधीश्वरी

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा माता अन्नपूर्णेश्वरी ॥३॥

*
गौरी उमा शंकरी कौमारी निवास कैलास नगावरी 

वेदान्त दिव्य बोध ज्ञान ज्ञात ॐकारबीजाक्षरी

कृपा करी मोक्षद्वार मुक्त करी काशीपुराधीश्वरी

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा माता अन्नपूर्णेश्वरी ॥४॥

*
दृश्य-अदृश्य दिव्य गुणधारिणी ब्रह्मांड धारी उदरी

सृष्टी दिव्य ऊर्जा स्रोत प्रकट दीप विज्ञान अंकुरी

विश्व चलनास्तव श्रीविश्वेश्वरकृपा काशीपुराधीश्वरी

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा माता अन्नपूर्णेश्वरी ॥५॥

*
सकल ईश्वरी साक्षात वसुधा माताअन्नपूर्णेश्वरी

नीलकुंतल तरंगती लहरी सदैव अन्नदानेश्वरी

सकलामोदकरी नित्य मंगलकरी काशीपुराधीश्वरी

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा माता अन्नपूर्णेश्वरी ॥६॥

*
समस्त वर्णाक्षरे तथा त्रिगुणशिव वास करी अंतरी

रक्तवर्णी त्रिजलदेवी त्रिलहरी नित्यांकुरी शर्वरी

भक्तकाम पूर्ण करी सकलोदय करी काशीपुराधीश्वरी

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा माता अन्नपूर्णेश्वरी ॥७॥

*
समस्त विविध रत्ने सजली दक्षराजकन्या सुंदरी

वाम स्वपयोधर अति स्वादिष्ट सौभाग्यदा माहेश्वरी

अभीष्टकारी भक्तांसी नित्य मंगल काशीपुराधीश्वरी

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा माता अन्नपूर्णेश्वरी ॥८॥

*
कोटी सूर्य चंद्र वन्ही सम तेज झळकते मुखावरी

अनल सूर्य चंद्रमा सम कुंडलधारी वर्णही चंद्रापरी

माला पुस्तक पाश अंकुशधरिले काशीपुराधीश्वरी

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा माता अन्नपूर्णेश्वरी ॥९॥

*
सामर्थ्य महाभयंकर असे माता कृपासागरी

साक्षात मुक्तीदा नित्य मंगलद विश्वेश्वर श्रीधरी

गर्वा नष्ट करी आरोग्यद काशीपुराधीश्वरी 

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा मातान्नपूर्णेश्वरी ॥१०॥

*
अन्नपूर्णे नित्यपूर्णे शिवशंकरकामिनी

ज्ञान-वैराग्य साध्य करण्या भिक्षेस दे भवानी ॥११॥

*

॥इति श्रीआदिशंकराचार्य निशिकान्त भावानुवादित रचित देवी अन्नपूर्णा स्तोत्र संपूर्ण॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “स्वामी तिन्ही जगाचा…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “स्वामी तिन्ही जगाचा…” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

स्वामी तिन्ही जगाचा.. त्याविण मीच भिकारी

शोधू कुठे तयाला.. बांधून पायी भिंगरी – –

*

राम कृष्ण विष्णू.. असती कितीक नावे

परि त्याचीच सगळी रूपे.. हे सत्य ना कुणा ठावे – –

*

अल्ला कुणी म्हणावे.. येशूही म्हणती कोणी

काही म्हणो कुणीही.. त्या पाहिले न कोणी – –

*

कैक म्हणती आहेच तो.. कुणा वाटते मुळीच नाही

श्रद्धेची ही का जाणीव नुसती.. कुणास कधी तो दिसतही नाही – –

*

त्यानेच निर्मिले विश्व.. हे सत्य सर्व मानती

अन त्यालाच करुनी मोहरा.. हे आपसात लढती – –

*

मला वाटती फोल.. या समजुतीच सगळ्या

तो कुठे ना कुठे आहे.. या कल्पनाच आगळ्या – –

*

असलाच जर कुठे तो.. आपल्या मनात असतो

सद्वृत्ती, सद्भाव अन् निरपेक्ष प्रेम पांघरतो – –

*

परि उमगत नाही आम्हा.. उगाच शोधत फिरतो

हातात असूनी कळसा.. वळसा जगास घालतो – –

*

रंग रूप कधी नसते त्याला.. केवळ ते ‘देवत्व’

का आकळे न कोणा.. ते निव्वळ एक ‘तत्व’ – –

*

ते निव्वळ एक ‘तत्व – –

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares