श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२७
☆ घरात वादळ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
नाही अंगण नाही कर्दळ
हद्दपार ही झाली बाभळ
*
जुन्या घराचे झाले टॉवर
कॉलनीतही नाही वर्दळ
*
वारा इथला शांत भासतो
प्रत्येकाच्या घरात वादळ
*
शहरासाठी गाव सोडले
प्रदूषणाने येते भोवळ
*
डोळ्यांमधले हट्टी अश्रू
पुसले त्याने सारे काजळ
*
पक्षी सारे उडून गेले
पहा ओस ही झाली ढाबळ
*
डोंगर माथी वर्षा होता
दऱ्या दऱ्यातुन निघती ओघळ
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



