सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री शोभना आगाशे

सुश्री मंजिरी येडूरकर

💐अ भि नं द न 💐

आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री सुश्री शोभना आगाशे आणि सुश्री मंजिरी येडूरकर यांनी एकत्रितपणे लिहिलेल्या “ गीतांजली – जशी भावली तशी “ या उत्कृष्ट काव्य संग्रहाला पुढील दोन पुरस्कार एकाच वेळी घोषित करण्यात आले आहेत हे सांगतांना विशेष आनंद होतो आहे. —–

१ ) नरेंद्र विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यातर्फे उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार. 

२ ) मासिक सारांश (मिरज) साहित्य पुरस्कार – २०२३ — विशेष साहित्यकृती पुरस्कार. 

💐 या दोन्ही प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी सुश्री शोभना आगाशे, आणि सुश्री मंजिरी येडूरकर या दोघींचेही आपल्या समूहातर्फे अतिशय मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

या दोघींच्या एका कवितेचा आस्वाद आज यानिमित्ताने घेऊ या… 

☆

मुरली घेऊन दर्‍याडोंगरी

सूर चिरंतन निर्मित जाशी

त्या रुपाचे चिंतन करता

माझे अंतर स्पर्शून जाशी …. 

☆

स्पर्शाने त्या पुलकित होते

शब्दातीत तुजसवे बोलते

तूच भारिसी चैतन्याने

तूच रिकामा आणि करिशी  …. 

☆

कलश मम हा देहस्वरूपी

पुनःपुन्हा या धरणीपाशी

अमर्त्य आत्मा वेष बदलुनी

काळोखातून येत प्रकाशी …. 

☆

माझी झोळी जरी तोकडी

दाता तू तर असीम असशी

युगे युगे तू देतचि जाशी

तरीही झोळीत जागा राही …. 

☆

अनंत मी याचक युगांचा

असशी तू दाता कल्पांचा…

☆

 – शोभना आगाशे 9850228658

 – मंजिरी येडूरकर  9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted