नीलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ तापल्या धरेला… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
उन्हात तापल्या धरेला
हवा थोडासा शिडकावा
थकल्या भागल्या जिवा
आपुलकिचा स्पर्श हवा!!
*
थोड्या शिडकाव्याने ती
आनंदीत होते येते भरून
मनातुन सुखावते जेंव्हा
आभाळ येते गच्च भरून!!
*
वाहू लागतात आजुबाजूला
शितल सुखावह मंद वारे
फुलून येतात तिच्या देही
स्पर्शोत्सुक गात्र सारे!!
☆
© नीलांबरी शिर्के
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈



