जयश्री पाटील

 

? कवितेच्या उत्सव ?

☆ घे भरारी… ☆  जयश्री पाटील ☆

सांगतोना ग वारसा आपण सावित्रीचा

मग का विसर पडतो तुला तिच्या कर्तुत्वाचा

*

शिकलोना ग आपण विज्ञान शाळेमध्ये

नाही का ग घेतले ज्ञान तर्कशास्त्रामध्ये

*

सिक्सथ सेन्स असतो म्हणतात ना ग स्त्रीयांना

कुठे हरवतो तो भोंदू बाबांच्या पाया पडताना

*

सत्ता अधिकार पैसा असते का मर्यादा त्याला

स्वत्व गमावून हे सारे हवे आहे का ग तुला

*

शक्तीचा जागर करतो ना ग आपण नवरात्रात

दाखव सामर्थ्य दृष्टांशी खंबीर होऊन लढण्यात

*

मती नको ग तुझी ठेवू कुठे तू गहाण

कर जरासा नेहमी एक विचार महान

*

मुलगा हवा म्हणून नको नादी कोणाच्या लागू

दबावाला कोणाच्याही तू नको कधी बळी पडू

*

दत्तक पुत्र घेऊनी लढली लक्ष्मी रणांगणी

सावित्री ही झिजली समाजसेवा करूनी

*

छत्रपती शाहू सयाजी होते दत्तक पुत्र

रयतेसाठी त्यांनीच धरले सुधारणेचे छत्र

*

सायासाने मिळाला आहे स्त्रियांना मोकळा श्वास

घे भरारी सोडून दे तू तो अंधश्रद्धेचा बंदीवास

 

© जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted