सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आनंदाने जगणं… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

आपण दोघं आपलं एक

मुलगा असो किंवा लेक

मनापासून संस्कार करू

बाहेरची दुनिया खोटी.. फेक!

*

जगणं आपलं निसर्गातलं 

रात्रीला केवळ घरटं आपलं

दाणे किडे हुडकण्यासाठी

रोजच पाहीजे बाहेर पडलं!

*
कोण कधी झडप घालेल

कोण कुठं जाळ पसरेल

विहरताना आभाळाखाली

सावधपणे पाहिजे राहिलं!

*
माणसापरी आपल्या जगी

कोणी कायम झटत नाही

पंख फुटता आयता कुणी

चोचीला चारा देत नाही!

*

कर बळकट पंख आपले

सावध विहरणं चालू ठेव

पक्षासारखं सुंदर जगणं 

मुक्त परिसरात संचारणं 

आनंदाने जग लक्षात ठेव!

*

आई बापाचे बोल बाळा

कायम लक्षात ठेऊन जग

जगणं आपलं भाग्य आहे

उघड्या डोळ्याने सारं बघ!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments