नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ अशीही प्रचिती … ☆ नीलांबरी शिर्के ☆
☆
इवल्या इवल्या पोरांनाही
कळू लागलंय आता
फूल तिचा माईक झाला
स्टॅन्डसह पुढे येता!!
*
टक टक करून खात्री
करून घेतेय ध्वनीची
आजू बाजूचेच शिकती पोरं
प्रचिती येते इथे त्याची!!
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈






