सुश्री मीनाक्षी सरदेसाई

(वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। कई पुरस्कारों/अलंकारों से पुरस्कृत/अलंकृत सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी का जीवन परिचय उनके ही शब्दों में – “नियतकालिके, मासिके यामध्ये कथा, ललित, कविता, बालसाहित्य  प्रकाशित. आकाशवाणीमध्ये कथाकथन, नभोनाट्ये , बालनाट्ये सादर. मराठी प्रकाशित साहित्य – कथा संग्रह — ५, ललित — ७, कादंबरी – २. बालसाहित्य – कथा संग्रह – १६,  नाटिका – २, कादंबरी – ३, कविता संग्रह – २, अनुवाद- हिंदी चार पुस्तकांचे मराठी अनुवाद. पुरस्कार/सन्मान – राज्यपुरस्कारासह एकूण अकरा पुरस्कार.)

अब आप सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी के साप्ताहिक स्तम्भ – मीनाक्षी साहित्य को प्रत्येक बुधवार आत्मसात कर सकेंगे । आज प्रस्तुत है आपकी एक  मूल एवं विडंबन कविता  किचनेशा .

☆ साप्ताहिक स्तम्भ – मीनाक्षी साहित्य – किचनेशा – ☆

(ही कविता पूर्वींची आहे. तेव्हा कीचनमध्ये गँसची शेगडी नि लाल सिलेंडर म्हणजे महद्भाग्य वाटायचं. आधी गँस मिळवण्यासाठी नंबर नि नंतर तो महिन्याला मिळणे हेही कौतुकाचं.आता मा. पंतप्रधानानी गँस झोपड्यांमध्येही पोचवला, पण त्या काळात ? वाचुया कविता.” किचनेशा “)

विडंबन कविता —किचनेशा—

किती दिवसांनी तुला पाहिले गँसा

प्रिय माझ्या  रे  किचनेशा    ।।

तू गेल्याचा अजुनी आठवे दिवस

लावला हात कर्मास

पाहुणे  घरी  आले होते खास

मज आठवला  विघ्नेश

भोवती स्टोव्ह ते जमले

ते फरफरले, फुरफुरले

तोंडास लागले  काळे

मग रोजच रे असली अग्नि परिक्षा

प्रिय माझ्या      ।।

 

मूळ कविता—-

 

संदेश तुला कितीतरी पाठवले

नाही का ते तुज कळले?

की कोणि तुला मधुनच भुलवुन नेले?

मी येथे तिष्ठत बसले

भाकरी  नीट भाजेना

कुकरची  शिटी  होईना

झाली बघ दैना दैना

का विरहाची दिलीस असली शिक्षा

प्रिय माझ्या   ।।

 

आणि एके दिवशी  —

दूरात तुझा लाल झगा झकमकला

जिव सुपाएव्हढा झाला

मी लगबगले, काही सुचेना बाई

महिन्याने दर्शन  होई

ओटा धुतला, स्वच्छ शेगड्या केल्या

कौतुके तुला मी पुसला

ज्योत तुझी निळसर हसली ,

मुखकलिका माझी खुलली

महिन्याची शिक्षा सरली

मनमुक्त अता फिरेन मी दाहिदिशा

प्रिय माझ्या रे किचनेशा   ।।।।

 

© मीनाक्षी सरदेसाई

‘अनुबंध’, कृष्णा हास्पिटलजवळ, पत्रकार नगर, सांगली.४१६४१६.

मोबाईल  नंबर   9561582372, 8806955070

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments