कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 256 – विजय साहित्य
☆ पांडुरंग… ☆
☆
वारकरी पंथ ।
झाला एकरूप ।।
दावी निजरूप ।
पांडुरंग ।।१।।
*
युगे अठ्ठावीस ।
वाहे चंद्रभागा ।।
अंतरात जागा ।
पांडुरंग ।।२।।
*
माळ वैजयंती ।
हात कटीवर ।।
शोभे रमावर ।
पांडुरंग ।।३।।
*
संत सज्जनांची ।
पुण्यमयी ठेव।।
आशिर्वादी पेव।
पांडुरंग ।।४।।
*
वैष्णवांचा मेळा ।
करीतसे वारी ।।
कैवल्य कैवारी ।
पांडुरंग ।।५।।
*
हरिनाम मुखी।
सदा घेत जाऊ ।।
जीवनात पाहू ।
पांडुरंग ।।६।।
*
कविराज वाणी ।
चिंतनात रंग।।
जोडीला व्यासंग ।
पांडुरंग ।।७।।
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





