कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 256 – विजय साहित्य ?

☆ पांडुरंग…

वारकरी पंथ ।

 झाला एकरूप  ।।

दावी निजरूप  ।

पांडुरंग ।।१।।

*

युगे अठ्ठावीस ।

वाहे चंद्रभागा ।।

अंतरात जागा  ।

 पांडुरंग ।।२।।

*

माळ वैजयंती  ।

हात कटीवर ।।

शोभे रमावर  ।

 पांडुरंग  ।।३।।

*

संत सज्जनांची ।

 पुण्यमयी ठेव।।

आशिर्वादी पेव।

पांडुरंग  ।।४।।

*

वैष्णवांचा मेळा  ।

करीतसे वारी ।।

कैवल्य कैवारी ।

पांडुरंग  ।।५।।

*

हरिनाम मुखी।

सदा घेत जाऊ ।।

जीवनात  पाहू ।

 पांडुरंग  ।।६।।

*

कविराज वाणी ।

चिंतनात रंग।।

जोडीला व्यासंग  ।

पांडुरंग  ।।७।।

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments