श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “सावली सोडून जाते तेव्हा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… हे बघ पाहतेस ना तू.. आता माझ्याच हाती काही उरलं नाही… आणि तसं म्हणशील तर सकाळपासून ते या उतरणीच्या वेळेपर्यंत माझ्या छायेचं छत्र धरून होतो तुझ्या तनावर नि मनावर… तोलून धरला होता मी उंच शेंड्यावर नि शाखा शाखांवर, केली होती पानांची पत्रावळ त्या तळपत राहणाऱ्या रवीचे धगधगते उन झेलून… चटके देऊन देऊन मला त्याने ठिकठिकाणी भाजून काढले तरी मी एक ब्र काढला नाही मुखातून… त्याची शक्ती किती अफाट होती तोलून धरलं वरच्या वर त्याला.. तरी मुठीत धरलेल्या वाळूने घटृट मुठीतून वाट काढावी तशी सुळकन वाळूची धार ओघळून जायची अगदी नकळत.. आणि मग हाताच्या पंजावर काही वाळूचे कण तसेच चिकटून बसायचे… कधी तो हात झाडला जातोय आणि आपण मुक्त होतोय याची वाट पहात… तसा रवीच्या किरणांनी माझ्यासोबत किल्ला लढवताना कुठेतरी कमजोर दुबळ्या बाजूने खिंडार पाडलं नि तेथून त्यांनी मग आपल्या सोनसळी किरणांनी मारा सुरु केला… पाना पानांनी त्या सोनसळीला अडवयाचा खूप प्रयत्न केला पण त्यात पानांच्या ढालीची छिन्न विछिन्न चाळणच झाली… तुझ्या पर्यंत कमीत कमी आच बसावी हि तडफड तडफड होत होती जीवाची… पण अखेर मी थकलो गं पण तो नाही… मग झुकावं लागल मला त्याच्या पुढे अगदी नाईलाज झाला तेव्हा… नंतर त्याचाही जोर ओसरला जेव्हा तो उतरणीकडे झुकू लागला… पण त्यावेळी माझ्या त्या सावल्या हळूहळू मला सोडून देत देत तूझ्यापासूनही लांब लांब होत गेल्या…

हट्टी मन ते पुन्हा पुन्हा त्या आठवणींना मोजत बसतं… चिंतनात मिटलेल्या डोळ्यासमोर सारापट उलगडून दाखवतं… हे माझे, ते माझे आणि आणि मी सुद्धा त्यांचीच,. साथ दिली घेतली क्षणाची जी नव्हती कधीच आपली.. फक्त एकटेपणाची धवल शाल ती ऊजेडात आली आणि कायमची साथीला राहिली..

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments