शोभा जोशी
वाचताना वेचलेले
☆ “संवाद…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆
☆
संवाद कुठे हरवले?
इकडे तिकडे शोधून पाहिले
नाही कुठे सापडले…
अरेच्चा!
हे तर मोबाईलमध्ये
जाऊन बसले.
बोटांना काम मिळाले
तोंडाचे काम कमी झाले
शब्द मुके झाले
मोबाईलमध्ये लपून बसले
‘हाय‘ करायला मोबाईल
‘बाय‘ करायला मोबाईल
GM करायला मोबाईल
GN करायला मोबाईल
शुभेच्छांसाठी मोबाईल
‘भावपूर्ण श्रद्धांजली‘
साठीही मोबाईल
खरेदीसाठी मोबाईल
विक्रीसाठी मोबाईल
नाटक, सिनेमांची
तिकिटं मोबाईलवर
बस, ट्रेन, विमानाची
तिकिटं मोबाईलवर
शाळा, कॉलेजची
फी मोबाईलवर
डॉक्टरांची फी
मोबाईलवर
वेळच नाही येत आता
दुस-यांशी बोलण्याची
बोलता बोलता
चेह-यावरचे भाव टिपण्याची
वेगवेगळ्या ‘इमोजी‘
धावून येतात मदतीला
दुधाची तहान
ताकावर भागवायला
आता शब्द कानांना सुखावत नाहीत
आता शब्द ओठांवर येत नाहीत
आता शब्द कोणी जपून ठेवत नाही
आता शब्द-मैफल कुठे भरतच नाही
मोबाईलवरील संवादाला अर्थ नाही
प्रत्यक्ष संवादातील मौज इथे नाही
आभासी जगातले संवादही आभासी
अशा संवादांचा आनंद नाही मनासी
या आभासी संवादांना
मूर्त रूप कधी मिळेल का?
नक्की सांगा माणूस खरंच
हृदयापासुन संवाद साधेल का..?
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






