श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
😅🕺होस्ट आणि गेस्ट 🕺😅 श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
मला वाटलं म्हणून सांगतोय
नाही पटलं तर ठेवा मनांत,
पण पटलं असेल मनापासून
सांगून टाका सकल जनांत!
*
आपलं सगळ्यांचं आयुष्य
ही आहे एक कठीण “टेस्ट”
म्हणून जास्त विचार करणं
खरं तर आहे अगदीच “वेस्ट”
*
लहान तोंडी मोठा घास घेऊन
करतो सगळ्यांना “रिक्वेस्ट”
प्रत्येकाशी तुम्ही प्रेमाने वागा
हे होईल बघा सर्वात “बेस्ट”
*
डोक्यात असुदे कायम तुमच्या
वर बसलाय सर्वांचा “होस्ट”
आपण सगळेच मर्त्य मानव
चार दिवसांचे उपरे “गेस्ट! “
चार दिवसांचे उपरे “गेस्ट! “
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





