श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ चराचर… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
पोटापुरती मिळते आहे
मजला साधी भाजी भाकर
*
भ्रष्टाचारी भंपकतेचा
नाही शोधत मी तर बर्गर
*
जगलो आहे निर्मळ जीवन
पण बापाचा बनलो चाकर
*
कष्टकरी मी आहे सत्वर
प्रेमच केले भू मातेवर
*
घेत विसावा झोपत आलो
आधाराला होते छप्पर
*
शांत सुखाची होती जादू
डोईवरचे हसरे अंबर
*
दुसरी काही नाही आशा
मजला माझा स्वर्गच वावर
*
मुबलक सजले अवती भवती
अमृत भरले सुंदर निर्झर
*
आहे जपली प्राणपणाने
संस्कारांची भरली घागर
*
आनंदाने जगता जगता
दोस्तच बनले सर्व चराचर
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





