सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
राधिका भांडारकर
💐 अ भि नं द न 💐
१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य-संमेलनांतर्गत ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ पुणे आयोजित, आणि ‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्था नियोजित ‘राज्यस्तरीय कथालेखिका नांदी संमेलना’साठी एक ‘स्त्री-वादी’कथास्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.
आणि आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट ही की या कथास्पर्धेतील निवडक कथांमध्ये आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका / कवयित्री सुश्री राधिका भांडारकर यांच्या कथेची निवड करण्यात आलेली आहे.
आणि या कथेविषयी “ उत्कृष्ट कथालेखनातून सर्जनशीलतेचा प्रत्यय देणारी कथा “ असा विशेष अभिप्राय आयोजक संस्थेने राधिकाताईंच्या कथेला दिला आहे.
आपल्या सर्वांतर्फे राधिकाताईंचे मनःपूर्वक खूप अभिनंदन आणि त्यांच्या यापुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.
आजच्या अंकात वाचूया त्यांची ही सन्मानप्राप्त कथा – उंबरठ्यापलीकडे.
💐 हार्दिक अभिनंदन! 💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈






